नांदेड| येथील इतवारा भागातील संघसेननगर मधील हितेश संभाजी सितळे हा 25 वर्षीय तरुण दसर्यापासून बेपत्ता आहे.
संघसेननगरातील रहिवाशी संभाजी सितळे यांचा 25 वर्षीय मुलगा हितेश हा त्या भागातील केळी मार्केटमध्ये काम करतो. दसर्याच्या दिवशी नेहमीप्रमाणे काम करुन तो घरी आला. त्यानंतर दसरा पाहून येतो असे म्हणून तो बाहेर गेला. तेंव्हापासून आजपर्यंत तो घरी आलेला नाही.
त्याचे वडील संभाजी सितळे व अन्य नातेवाईकांनी त्याचा नांदेड शहर व जिल्ह्यात मित्रांकडे, नातेवाईकांकडे परंतु त्याचा तपास लागू शकला नाही. त्याची आई शिवकन्या सितळे यांनी इतवारा पोलीस ठाण्यात हितेश बेपत्ता होण्याबाबत फिर्याद दिली आहे.
हितेशची उंची साडेपाच फुट असून त्याचा रंग गोरा आहे. त्याच्या उजव्या हातावर आई असे गोंदलेले आहे. डाव्या कानात बाली असून ग्रे कलरची जीन्स पँट व काळा शर्ट आहे. त्याच्या बाबत कोणाला माहिती मिळाल्यास त्यांनी इतवारा पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहन पोलीसांनी केले आहे.