हिमायतनगर तालुक्यातिल श्रीक्षेत्र बोरगडी येथे चोरट्यांचा धुमाकूळ -NNL

अंदाजे ५ ते ६ लाखाचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे नागरिकांनी सांगितले 


हिमायतनगर, अनिल नाईक|
तालुक्यातील मौजे बोरगडी गावात दि.२६ रोजीच्या मध्यरात्रीला सात ते आठ जणांचा टोळके असलेल्या चोऱ्यांच्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. दोन - दोन करत एकाच वेळी ४ ते ५ घरात चोरटयांनी शिरकाव करून नागरिकांच्या घरातील सोने-चांदीचे दागिने, नगदी रक्कम पळविली आहे. तर एका घरात चोरटे शीरल्याचे समजल्याने शेतकरी उठला असता त्या शेतकऱ्यावर  चोरट्यांनी चाकूने हल्ला करून पळ काढला आहे. या घटनेने शेतकरी जखमी झाला असून, चोरटयांनी केलेल्या या कृत्यामुळे बोरगडी गावात दहशत निर्माण झाली असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करून सुरक्षा द्यावी अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात मागील २ महिन्यापासून चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ माजविला आहे. चोरटयांनी दुकानांना आता ग्रामीण भागातील शेकरयांच्या घराना लक्ष करत सामानाची नासधूस केल्याच्या करून अडसर आलेल्यांवर हल्ला करण्याच्या घाणा वाढू लागल्या आहेत. असाच प्रकार तालुक्यातील मौजे बोरगडी गावात दि.२६ रोजीच्या मध्यरात्रीला घडला आहे. येथे मध्यरात्रीला सात ते आठ जणांचा चोरट्यांच्या टोळक्यांनी गावात शिरून अनेक घरात धुमाकूळ घातला आहे. दोन - दोन करत एकाच वेळी ४ ते ५ घरात शिरून चोरटयांनी येथिल नागरिकांच्या घरातील सोने-चांदीचे दागिने, नगदी रक्कम पळविली आहे. एका घरात चोरटे शीरल्याचे समजल्याने युवा शेतकरी श्यामराव पांडुरंग फरकंडे हे उठले आणि रतन अडविण्याचा प्रयाण केला. दरम्यान चोरटयांनी उलट शेतकऱ्यास जबर मारहाण केली आणि चाकूने हल्ला करून पळ काढला आहे. 

या घटनेने शेतकरी जखमी झाला असून, चोरटयांनी केलेल्या या कृत्यामुळे बोरगडी गावात दहशत निर्माण झाली असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करून सुरक्षा द्यावी अशी मागणी गावकर्यांनी केली आहे. आर यापुढे चोरट्यांचा  बंदोबस्त करण्यासही पोलिसांवर विसंबून न राहता आता गावकऱ्यानाच एक पथक तैनात करून रात्रगस्त करण्याची वेळ येणार आहे. कारण हिमायतनगर पोलीस ठाण्यात तीन अधिकारी आहेत, परंतु पोलीस कर्मचाऱ्यांची सांख्य कमी आहे. असे असताना चोरी, लूटमारीच्या घटना घडत असल्याने नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास उडत चालला आहे. हि बाब लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हिमायतनगर शहर व तालुक्यात होत असलेल्या चोरीच्या घटनांना यावर घालण्यासाठी येथे अधिकचा पोलीस कर्मचारी वर्ग द्यावा आणि रात्रगस्तीत वाढ करून संशयी चोरट्याने ताब्यात घेऊन नागरिकांना सुरक्षा द्यावी अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.  

रात्रीला चोर आले होते त्यानि अनेक घरात चोरी करून सोने, चांदीचे दागिने आणि नगदी रक्कम लंपास केली आहे. एका ठिकाणी चोरट्याना अडविणाऱ्या शेतकऱ्यावर चाकूने मारहाण झाली आहे. शेतकऱ्याला हिमातनगर येथे रात्रीला उपचारासाठी आणून परत गावी नेले आहे. यासंदर्भात अद्यापही पोलीस गावात दाखल झाली नसल्याचे नागरिक भीतीचे वातावरण असल्याची माहिती माजी सरपंच संजय काईतवाड यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले आहे.

हिमायतनगर शहरात दि.२४ सप्टेंबर गणेशोत्सव काळात आलेल्या गणेश चतुर्थी दिनिच मध्यरात्रीच्या अज्ञात चोरटयांनी प्रसिद्ध इच्छापूर्ती श्री वरद विनायक मंदिराच्या बाहेर बसविण्यात आलेली सव्वा कुंटल वजनाची मजबूत अशी दान पेटी तोडून त्यातील देणगीची रक्कम पळविली होती. त्याचं दिवशी तालुक्यातील घारापुरी येथे चोरायणी दहशत पसरून दागिने लंपास केले. यानंतर पुन्हा दि.१२ सप्टेंबरला चोरटयांनी वरद विनायक मंदिराची दानपेटी फोडली. एवढंच नाहीतर बाहेर बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडले, मंदिराचे चैनेल गेटचे कुलूप फोडून सीसीटीव्हीच्या डेटा एकत्रित केल्या जाणारा डीव्हीआर बॉक्ससुद्धा पळविला. परंतु या चोरीच्या घटनेचा तपास थंडबस्त्यात पडला आहे. यामुळे पुन्हा चोरटयांनी चोऱ्या करण्यासाठी आता नागरिकांनाही लक्ष केल्याचे आजच्या बोरगाडी येथील घटनेवरून दिसते आहे.

हिमायतनगर शहरसह तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच दि.२७ रोजी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पांडुरंग तुप्तेवार यांच्या गोदामाचे कुलूप तोडून चोरटयांनी संपूर्ण शटर वाकवून भुसार साहित्य लंपास केले आहे. तर दि.२८ रोजी रात्रीला चोरटयांनी पोटा येथील भुसार व्यापाऱ्याच्या दुकानात चोरी करून पोलिसाना एक प्रकारचे आवाहन दिले आहे. या चोरीच्या घटनांमुळे तालुक्यात चोरटयांनी दहशत निर्माण केली असून, पोलिसांना तपस करता करता नाकेनऊ येत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी