वृक्ष व वन्यप्राण्यांचे संरक्षण करणे प्रत्येक माणसाचे प्रथम कर्तव्य - सहायक वनसंरक्षक श्रीनिवास लाखमावाड -NNL


शिवणी|
वन विभाग नांदेड व वनपरिक्षेत्र कार्यालय अप्पारावपेठ यांच्या वतीने ५ ऑक्टोबर रोजी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सप्ताहात जिल्हा परिषद हायस्कूल शिवणी येथे वन्यजीव सप्ताह निमित्त निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

या स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सहाय्यक वनसंरक्षक श्रीनिवास लखमावाड व अपारावपेट येथील वनपरिक्षेत्र अधिकारी आर.आर.चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद हायस्कूल शिवणी चे प्रभारी मुख्याध्यापक डी.एस.इंदूरवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक डी.ई.पांचाळ व शिवणी चे केंद्रप्रमुख एन.पी.पांचाळ सहशिक्षक जि.जि.तरटे हे होते. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन म्हणून सहायक वन संरक्षक श्रीनिवास लखमावाड यांनी उपस्थितांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वन्यजीव सप्ताह साजरा करण्याची आवश्यकता का आहे ? हे वन्यजीव कुणाला म्हणावे अशा प्रकारचे विविध प्रश्न विद्यार्थ्यांना विचारून त्यांना बोलते करून अन्नसाखळी टिकवून ठेवण्यासाठी वन्यजीव सप्ताहाचे आयोजन केल्या जाते हे सांगितले.

पुढे बोलताना म्हणाले की,कोरोना महामारीत गंभीर परिस्थिती मध्ये अनेक रुग्ण ऑक्सीजन न मिळाल्याने त्यांना जीव गमवावा लागला तर निसर्गाच्या कुशीत असलेले वृक्ष हे मानव व जीवजंतूस मोफत ऑक्सीजन देत असतात परंतु आपणास त्याचे महत्व वाटत नाही.तर कोरोना काळात कशा पद्धतीने जीवन जगावे हे प्रत्येकाने शिकले.तर संतांनी सुद्धा म्हंटले आहे.वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे,वृक्ष आहेत म्हणून मानव जिवंत आहे.जर पृथ्वीवरील  वृक्ष नष्ट झाले तर मानव जात नष्ट होण्यास वेळ लागणार नाही.करीता वृक्ष व वन्यप्राण्यांचे संरक्षण करणे प्रत्येक माणसांचे प्रथम कर्तव्य आहे.असे प्रतिपादन या वेळी केले.वनपरिक्षेत्र अधिकारी आर.आर.चव्हाण यांनी निसर्गाच्या कालचक्रात जीवन जगत असताना प्रत्येक जीव जंतूंना जगण्यासाठी आपापल्या परीने धडपड करावी लागते वन व वन्यजीव संगोपन करण्यासाठी प्रत्येक नागरिक व विद्यार्थ्याने एक झाड लावून त्यांचे संगोपन करावे असे आवाहन केले.

तसेच ज्या विद्यार्थ्यांचे झाड सर्वात उंच वाढेल त्या विद्यार्थ्याला त्यांच्यामार्फत योग्य ते पारितोषिक दिले जाईल अशी घोषणाही त्यांनी या वेळी केली डी.ई.पांचाळ सर यांनी विद्यार्थ्यांना आपला परिसर व आपले गाव स्वच्छ ठेवावा तसेच  प्रत्येक शिक्षक व विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात एक झाड लावून व त्यांचे संगोपन करून आपली आठवण या शाळेत कायमस्वरूपी ठेवावे असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.बी.मलगे तर आभार प्रदर्शन सचिन गवळी  यांनी केले कार्यक्रमात यशस्वीतेसाठी श्रीमती एच.एच. इनामदार मॅडम सुरेश पांचाळ व वनविभागाचे कर्मचारी वनरक्षक के.एस.तलांडे,के.जी.शिंगणे, एस.एस.वाघमारे एस.एम. कांबळे,किसन जाधव परिश्रम घेतले.

या कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप मार्गदर्शन करताना डी.एस.इंदूरवार सरांनी आपले विचार मांडले  चित्रकला व निबंध स्पर्धेत भाग घेऊन प्रथम क्रमांक वर्ग १० वीतली विद्यार्थी नी कु.सत्या पांचाळ,द्वितीय वर्ग ९ वा साक्षी चेपूरवार त्रितीय वर्ग ८ वा संजीवनी पांचाळ व वर्ग ७ वी प्रथम विजय औनूरवार, द्वितीय स्नेहा घोगुरवाड यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.तर चित्रकला स्पर्धेत प्रथम शेख रोहन,द्वितीय शेख नजिया,तर त्रितीय प्रियांश राठोड, यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी