अर्धापूर, निळकंठ मदने| बारड ता मुदखेड येथील युवक तुलसीदास बालाजी पुरी (वय 34) नांदेडला मोटरसायकल वरून जात असताना झालेल्या ट्रक अपघातात जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना ता. ६ बुधवारी १२ च्या सुमारास घडली आहे.
तुलसीदास पुरी आपल्या पत्नी सह खाजगी कामानिमित्त बारडहुन दुचाकी गाडी प्लॅटिना क्र गाडीवरून नांदेडला जात होते. आसना पुलाजवळ भरगाव वेगात येणाऱ्या ट्रकने क्र दुचाकीस समोरासमोर जोराची धडक दिल्याने तुलसीदास पुरी या युवकाचा जागीच दुर्दैवी अंत झाला आहे. या अपघातात पत्नी कल्पना तुलसीदास पुरी (वय २७) गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती कळताच गावावर शोककळा पसरली. अपघात घटनास्थळी गावातील युवक सूरज टिपरसे याने मित्राच्या साहाय्याने कल्पना पूरी यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघात घटनेमुळे बराचवेळ दोन्हीही बाजुची वाहतूक ठप्प झाली होती. संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी , महामार्ग पोलीस , घटनास्थळी दाखल झाले.