नवीन नांदेड। गोदावरी नदीला आलेल्या पूर व संततधार पावसामुळे ,धनेगाव येथील श्री गौतमेश्वर महादेव मंदिर परिसराला पाण्याचा वेढा पडला व मंदिराकडे जाणारा पूल ही पाण्याखाली गेला व त्यातच पाण्याचा प्रवाहाने ढासळल्याने भाविकांना जाण्या येण्यासाठी कसल्याही प्रकारची सुविधा नसू तात्काळ पुल दुरुस्ती करण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटणकर यांच्या कडे निवेदनाद्वारे पंचमगिर रावसाहेब महाराज यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
गोदावरी काठी असलेल्या तारातिर्थ धनेगाव येथील गोदावरीच्या पुरामूळे मंदिराला पाण्याचा वेढा पडल्यामुळे पूल पडलेला असून रस्ता बंद झाला असून एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना मठाचे रावसाहेब महाराज यांनी मागणी केली आहे.
मौजे धनेगाव ता.जि. नांदेड गोदावरी काठी असलेल्या आती प्राचीन श्री गौतमेश्वर महादेव मंदीर तारातिर्थ (प्रर्यटन स्थळ व तिर्थक्षेत्र) असून, गोदावरी नदीला आलेल्या पुराने व संततधार अतीवृष्टीच्या मुसाळधार पाण्यामुळे पूल पुर्णतः पडलेला असुन नासधूस झालेली आहे, या मुळे मंदीराला जाण्यासाठी भाविक भक्तांना कसल्याही प्रकारची व्यवस्था नसून लवकरात लवकर पूल दुरुस्ती किंवा नवीन करून देण्याची मागणी मठाचे बाळगीर पंचमगिर , तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब महाराज यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे,या निवदेनाचा प्रती मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व तहसीलदार नांदेड यांना देण्यात आल्या आहेत.