मंदिर कमिटीने केला सत्कार
हिमायतनगर| येथील भारतीय स्टेट बैंकेच्या शाखाधिकारी स्वप्नील आखाडे यांनी हिमायतनगर येथील नवसाला पावणाऱ्या माता कालिंका मंदिरास नवरात्रीच्या मुहूर्तवर भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी मंदिर कमिटीच्या वतीने त्यांचा शाळा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यंदा नवरात्रोत्सवाच्या शुभमुहूर्तावर शासनाने मंदिरे उघडे केली असून, त्यामुळे हिमायतनगर येथील कालिंका मंदिरात घटस्थापना व अलंकार सोहळ्याने नवरात्रोत्सवाची धूम सुरु झाली आहे. दररोज मंदिर समितीच्या वतीने या ठिकाणी देवी भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असल्याने शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त मंदिरात येत आहेत.
दरम्यान आज दि.१० रविवारी हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बैंकेच्या शाखाधिकारी स्वप्नील आखाडे यांनी मंदिरास भेट देऊन मातेचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर कमेटीचे अध्यक्ष - राजेंद्र रामदिनवार, उपाध्यक्ष - दिलीप पार्डीकर, सचिव - संजय मारवार, ज्ञानेश्वर पंदलवाड, शरद चायल, जीवन घोगरकर, शिवाजी भंडारे, आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.