खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने हिंगोली जिल्ह्यातील ५ प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळाल्या रुग्णवाहिका -NNL


हिंगोली, दिनेश मुधोळ|
राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री तसेच मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे हिंगोली जिल्ह्याला ५ रुग्णवाहिका मिळाल्या आहेत.

हिंगोली जिल्ह्यात २५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रांना १४ वर्षांपूर्वी मिळालेल्या रुग्णवाहिका अतिशय जुनाट, कालबाह्य झाल्यामुळे वेळोवेळी रस्त्यातच नादुरुस्त होत होत्या. यामुळे रुग्णसेवेमध्ये मोठा अडथळा येत होता. या बाबीकडे खासदार हेमंत पाटील यांनी गांभीर्याने लक्ष देऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे व मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे हिंगोली जिल्ह्याला २५ रुग्णवाहिका मिळाव्या अशी मागणी केली होती.

त्यांच्या या मागणीला यश येऊन नुकत्याच हिंगोली जिल्ह्यातील पोत्रा, डोंगरकडा, पांगरा शिंदे, कुरुंदा व हट्टा या ५ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मिळाल्या आहेत.खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने यापूर्वीही जिल्ह्यातील लोहरा, पिंपळदरी, सिद्धेश्वर, गिरगाव, सिरसम, मसोड, रामेश्वर तांडा, कवठा, साखरा या ९ आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत.उर्वरित ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही रुग्णवाहिका मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले.या आधुनिक रुग्णवाहिकांमुळे हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊन त्यामुळे त्यांचा वेळ पैसा व जी वाचण्यास मदत होणार आहे.

खा. हेमंत पाटील हे लोकसभा मतदार संघातील सर्व नागरिकांना योग्य ती दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. यापूर्वीही त्यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी ३० खाटांचे आयुष्य रुग्णालय केंद्र सरकारकडून मंजूर करून आणले आहे. कोरोना काळातही हिंगोली लोकसभा मतदार संघातील सर्व सामान्य रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन तेथील आरोग्य सेवा दर्जेदार व्हावी व रुग्णांना अधिक चांगली वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी प्रयत्न केले आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी