शाखा तरोडा तर्फे संध्या छाया वृध्दाश्रम येथे उत्साहात साजरा
त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नांदेडच्या मालेगाव रोड येथील संध्या छाया वृध्दाश्रम ज्येष्ठ नागरिक यांच्या सोबत उत्साहात साजरा करण्यात आला. यासमयी संध्या छाया वृध्दाश्रमचे व्यवस्थापक श्री वाघमारे यांनी वृद्धाश्रमातील सभसदा तर्फे श्री राधेश्यामजी चांडक यांच्या निरोगी व उदंड आयुष्याबद्दल प्रार्थना केली व बुलडाणा अर्बन च्या सामजिक जनिवेबद्दल समाधान व्यक केले.यानंतर बुलडाणा अर्बन शाखा तरोडा तर्फे वृद्धाश्रमातील सर्व सभासदांना अल्पौपहराची व्यवस्था करण्यात आली.
सदर कार्यक्रमास शाखा नांदेड मोंढाचे शाखा व्यवस्थापक श्री गोपाल बालदी,शाखा सराफाचे श्री भारत चव्हाण, शाखा सोणखेडचे श्री कंकाल शाखा मारतळा चे श्री. कुर्डूकर तसेच विभागीय व्यावसस्थपक सहाय्यक श्री साईनाथ सूर्यवंशी व श्री अभिजित जोशी तसेच शाखा तरोडा चे शाखा व्यवस्थापक श्री उदय चौधरी, दिनेश कुलकर्णी,प्रकाश कोकरे, पूर्वा मुधळ वाडकर, हेमंत टाकले श्री भरत मोरे, श्री पिराजी गाडे यांची उपस्थिती होती. शाखा व्यवस्थापक श्री उदय चौधरी यांनी आभाप्रदर्शन केले