नांदेड| नवीन वेळापत्रक पाहूनच प्रवास करण्याची प्रवाश्यांना विनंती, परभणी-नांदेड या गाडीचा वाणेगाव येथील थांब्या विषयी दक्षिण मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक दिनांक 1 ऑक्टोबर, 2021 पासून अमलात आले आहे. या नवीन वेळापत्रकानुसार नांदेड रेल्वे विभाग, दक्षिण मध्य रेल्वे मधील काही रेल्वे स्थानकावरील काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल झाला आहे.
नांदेड रेल्वे विभागातर्फे सर्व प्रवाशांना विनंती आहे कि त्यांनी नवीन वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा. नवीन वेळापत्रक आई.आर.सी.टी.सी. च्या www.irctc.co.in या संकेत स्थळावर तसेच दक्षिण मध्य रेल्वे च्या scr.indianrailways.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तसेच नवीन वेळापत्रक विषयी अधिक माहिती स्थानिक रेल्वे स्टेशन मास्टर कडे आणि रेल्वे चौकशी कार्यालयांत हि उपलब्ध आहे.
नवीन वेळा पत्रकामध्ये गाडी संख्या 07672 परभणी ते नांदेड या एक्स्प्रेस ला वाणेगाव रेल्वे स्थानकावर थांबा दर्शविण्यात आला आहे, परंतु यात दुरुस्ती करण्यात आली आहे. या गाडीस वाणेगाव रेल्वे स्थानकावर थांबा नसेल, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी हि विनंती.