लोहा| आषाढ एकादशीला सुरू झालेल्या पावसाची संततधार दुसऱ्या दिवशीही सुरुच होती.लोहा शहर व तालुक्यात दिवसभर रिपरिप होती .सर्वदूर पावसामुळे नदी , विहिरीला पाणी आले .तर नुकसान झालेल्या शेताची भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे-चिखलीकर यांनी पाहणी केली .
मागील आठवड्यात चार -पाच दिवस विश्रांती नंतर मंगळवारी रात्री पासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे.आषाढ एकादशी च्या दिवशी पाऊस सुरू झाला एकीकडे वारकरी संप्रदाय आनंदी असतानाच दुसरीकडे सर्वदूर पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. मृग नक्षत्रा पासून मंगळवार पर्यन्त लोहा तालुक्यात २५२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.या पावसामुळे नदी ,नाले वाहत आहेत शिवाय विहिरीला पाणी आले आहे. सतत पावसामुळे पिकात तण वाढलें आहे .उघडीप झालेल्या काळात शेतकरी शेतात कोळपे , निंदन , खुरपणीत गुंतला पण चार पाच दिवसात पुन्हा पावसाने जोर धरला .शेतात पाणीच पाणी असे चित्र काही ठिकाणी पाहायला मिळाले
प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी केली पाहणी
सर्वदूर पावसामुळे सकल भागात पाणी साचले शेतातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशउपाध्यक्ष व जि प सदस्या प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी नुकसान झालेल्या शेताची तात्काळ पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी प्राणिताताई यांनी केली. यावेळी त्याच्या सोबत तालुका सरचिटणीस किशनराव डफडे, भाजपा शहराध्यक्ष ऍड गंगाप्रसाद यन्नावार, शिक्षक आघाडीच्या तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे, मधुकर डांगे, बालाजी तोटावाड, ऍड सागर डोंगरजकर, रमेश पाटील मोरे, गोविंद मोरे, अविनाश गित्ते, रजत शहापुरे, प्रकाश घोरबांड, उमेश भूरेवार, श्रीराम जाधव,कोंडीबा मोरे,नीलकंठ तेलंग शेख शादुल उपस्थित होते.