भर पावसात उपविभागीय अधिकारी पोचले रस्त्यावर; मार्ग चालू करण्याची झाली धडपड सुरु -NNL


हिमायतनगर, अनिल मादसवार|
गेली दोन दिवसाच्या संततधार पावसामुळे हदगाव-हिमायतनगर रस्त्यावर सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्ग बंद झाला होता. याबाबतचे वृत्त प्रकशित होताच खुद्द उपविभागणीय अधिकारी जीवराज डापकर रस्त्यावर उतरले. आणि जेसीबीसह ठेकेदारांच्या कर्मचाऱ्याने तंबी देत रास्ता पूर्ववत सुरु करण्यासाठी धडपडत होते. त्यांच्या या कार्यातप्रतेने या भागातील शेतकरी, नागरी व जनता आनंदी झाली असून, त्यांचे अभिनंदन करत आभार मानले जात आहे.



मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट पुलाजवळील वळण रास्ता वाहून गेल्यामुळे हदगाव - हिमायतनगर मार्ग सकाळपासून बंद झाला होता. येथील पुलाच्या मध्ये कचरा अडकल्याने पुराचे पाणी पुढे जात नसल्याने परिसरातील शेतीमध्ये साचून पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याबाबत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याचे वृत्त नांदेड न्यूजने प्रकाशित करताच कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी स्वतः भर पावसात आपली गाडी काढली. 


आणि थेट बंद पडलेल्या मार्गाची पाहणीकरून तातडीने जेसीबीद्वारे पुलातील गाळ काढूऱ्यांच्या कमला ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना घेऊन सुरुवात करायला लावली आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्याची वाट मोकळी करून दिली. तसेच सायंकाळपर्यंत रस्ता पूर्ववत चालू करण्यासाठी ते स्वतः प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये - जा करण्यासाठी नागरिकांनी तात्पुरता आष्टी, कांडली, पर्वा मार्गाने ये- जा करावी असे आवाहन केले. तसेच सायंकाळपर्यंत हा रस्ता पूर्ववत चालू होईल. तसेच या भागात शेतीपिकाच्या झालेली नुकसानीसंदर्भात वरिष्ठ पातळीवरून जे आदेश येथील त्याप्रमाणे सर्वे करून नुकसानग्रस्तांना मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न करून असेही त्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले आहे. त्यांच्या या ताटीडीच्या कार्याबद्दल या भागातील प्रवाशी नागरीकातून अभिनंदन करत आभार मानले जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी