रुद्राणीचा पर्यायी पूल वाहून गेल्याने हदगाव- हिमायतनगर मार्ग बंद
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे पारवा, आष्टी, जवळगाव, कामारी, कामारवाडी भागातील हजारो एकर मधील पिके पाण्याखाली आली असून, पुलाच्या अर्धवट कामामुळे पुराचे पाणी पुढे जाण्यास अढथळा निर्माण झाल्यामुळे हे नुकसान झाल्याचे शेतकरी नागरिक सांगत आहेत. केवळ ठेकेदारच्या नाकर्तेपणामुळे यास कारणीभूत असून, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई करून कोण..? देणार असा प्रश्न विचारला जात आहे. रुद्राणी कंट्रक्शन कंपनीच्या बेजवाबदार कारणीभूत असल्याबद्दल कारवाई करण्यात यावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देऊन नुकसान भरपाई मिळावा अशी मागणी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष गजानन ठाकरे यांनी केली आहे. अन्यथा ठेकेदारच्या विरोधात आंदोलन पुकारावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील जवळगावला पुराणे वेढले असून, या भागातील शेकडो एकर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे तर गावातील काही घरात पण शिरले असून, अनेक घरांना पुराचा वेडा आहे. त्यामुळे जनजीवन विसकळीत झाला असून, झालेल्या मुसळधार पावसाची आणि नुकसानीची पाहणी करून प्रशासनाने भरपाई मिळून द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
पुलाच्या अर्धवट कामामुळे पाणी जायला मार्ग नसल्याने हिमायतनगर तालुक्यातील जवळगावला पुराणे वेढले असून, या भागातील शेकडो एकर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर गावातील काही घरात पण शिरले असून, अनेक घरांना पुराचा वेडा आहे. त्यामुळे जनजीवन विसकळीत झाला असून, या भागात झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी पैनगंगा नदीला आल्याने नदीकाठावरील घारापुर, पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली, एकंबा, सिरंजनी परिसरातील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. शेलोडा भागात तर सोयाबीन पूर्णतः आडवे झाले असून, सडून गेल्याने पिकाची अवस्था पाहून शेतकऱ्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. आजची हा पाऊस अतिवृष्टीपेक्षा जास्त असल्याने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांनी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी सटवाजी पवार, राजू पाटील सिरपल्लीकर, चांदराव वानखेडे, रामराव शिंदे, बाळू पाटील विरसनीकर, ज्ञानेश्वर माने पारवेकर, आदींसह नदीकाठावरील गावकरी वर्गातून जोर धरत आहे.