हदगाव, शे.चादपाशा| हदगांव शहरातील काही खाजगी सावकाराच्या जाचामुळे हदगाव तालुक्यातील शेतकऱ्याने खाजगी सावकाराच्या नावे चिट्टी लिहुन आपली जीवन याञा संपविल्याची घटना घडली असुन, या बाबतीत पोलिसांनी गुन्हा नोंद केला आसल्याची माहीती मिळाली असून, माञ पोलीसा कडुन या बाबतीत माहीती मिळत नाही.
याबाबत समजलेली माहीती अशी की, हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील शेतकरी गजानन ढवळे अंदाजे वय (45) यांनी हदगाव शहरातील काही खाजगी सावकारी करणाऱ्या कडुन रक्कम घेतली. पण मुदतीच्या आत ती रक्कम फेडली नसल्यामुळे त्या खाजगी सावकारांनी रक्कम वसुली करिता तगादा लावल्याने वैतागून कर्जदार शेतकऱ्याने आत्महत्या केली.
हदगाव शहरातील त्या तगादा लावणाऱ्या व माणसिक ञास देणा-या त्या खाजगी सावकारी करणा-याच्या नावे व त्यांच्या मोबाईल क्रमांक सह चिट्टी लिहून दि ५ नोव्हेंबर २०२२ सकाळी ९ वाजेच्या दरम्यान आपली जीवनयाञा संपवली आहे. अशीच परिस्थिती शहरा प्रमाणे ग्रामीण भागात खाजगी सावकारा आर्थिक व्यवहार चालू आहेत हे उघड गुपीत आहे. एक वेळ कर्जाच्या राक्षसी फास आवळत कर्जाच्या दलदलीत गरजावंत डुबवत आहे, त्यातुन त्याची सुटका होणे फार कठीण असते हे खाजगी सावकार गरीब मजुर, शेतमजुर, शेतकरी यांच्या दारावर येवून व्याज व कर्ज वसुली करिता कर्जदाराला ञस्त करित आसतात ही वस्तुस्थिती आहे. या बाबतीत माञ प्रशासन मुकदर्शकची भुमिका वठवित असल्याने अश्या घटना घडत आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही ...!