लॉयन्सचा डबा, मायेची उब, कायापालट या उपक्रमाला भरभरून मिळाला प्रतिसाद
नांदेड| लॉयन्सचा डबा, मायेची उब, कायापालट या उपक्रमाला मिळालेल्या भरभरून प्रतिसादानंतर धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून भाजपा महानगर नांदेड व लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या "कृपाछत्र " या नवीन उपक्रमाचा शुभारंभ भाजपा महानगराध्यक्ष प्रवीण साले, लॉयन्स प्रांतपाल दिलीप मोदी यांच्या हस्ते बसस्थानकातील स्वच्छता कर्मचारी व हमालांना छत्र्या वितरणाने करण्यात आला असून वर्ष २०२१ च्या पावसाळ्यात २०२१ छत्र्या वितरण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
मध्यवर्ती बस स्थानक नांदेड येथे झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी संयोजक दिलीप ठाकूर यांनी प्रास्ताविक करताना असे सांगितले की, गोरगरीब जनतेची अडचण लक्षात घेऊन शंभर टक्के लोकसहभागातून खऱ्या गरजूंना छत्र्या देण्यात येणार आहेत. किमान 20 छत्र्या देणाऱ्या देणगीदारांची नावे छत्र्यांच्या दोन्ही बाजूंना रबर प्रिंटिंग द्वारे छापण्यात येणार आहेत. ज्यांनी जितक्या छत्र्या दिल्या तितक्या छत्र्यांचे वाटप त्याच देणगीदारांच्या हस्तेच करण्यात येणार आहे. देणगीदारांची माहिती सोशल मीडिया च्या मार्फत तीस हजार लोकापर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे.
छत्र्या उल्हासनगर येथील कारखान्यातून खरेदी करण्यात येत असल्यामुळे दोन्ही बाजूला नाव छपाईच्या शुल्कासह एका छत्रीची किंमत रुपये सव्वाशे आकारण्यात येणार असल्यामुळे दानशूर नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन दिलीप ठाकूर यांनी केले. प्रवीण साले, दिलीप मोदी, योगेश जैस्वाल, लॉयन्स सेंट्रल चे अध्यक्ष संजय अग्रवाल,लॉयन्स अन्नपूर्णाचे अध्यक्ष नागेश शेट्टी यांनी आपल्या भाषणातून दिलीप ठाकूर यांचा " कृपाछत्र " उपक्रम यशस्वी होणार असा विश्वास व्यक्त केला.
भाजप संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, जिल्हा सरचिटणीस अशोक धनेगावकर, दिपक रंगनानी, मुकेश अग्रवाल, अनिल चिद्रावार, धीरज स्वामी, अनिलसिंह हजारी, बागड्या यादव, व्यंकटेश जिंदम, मनोज जाधव, निळू पाटील ,राज यादव ,शततारका पांढरे, अपर्णा चितळे, अश्विनी महाले, अनिल गाजुला, कुणाल गजभारे, विशाल काबरा, अरविंद भारतीया, रुपेंद्रसिंघ साहू यांच्या हस्ते अरुणकुमार काबरा यांनी दिलेल्या ५१ छत्र्यांचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत दिलीप ठाकूर, अरुणकुमार काबरा, अ.भा. क्षत्रिय महासभा महिला प्रदेशाध्यक्षा सुषमा नरसिंह ठाकूर यांच्यातर्फे प्रत्येकी ५१ छत्र्या मिळाल्या आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रशांत पळसकर तर आभार कामाजी सरोदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश शर्मा, मनोहर यादव,मन्मथ स्वामी,राजेशसिंह ठाकूर, संतोष भारती, माधव लुटे, कैलास महाराज वैष्णव, अंकुश जाधव,शेख हबीब यांनी परिश्रम घेतले.