खरेदी विक्री संघाच्या कर्मचा-यांच्या दक्षतेमुळे चना खरेदीत भरमसाठ वाढ
हिमायतनगर| खुल्या बाजारात चना (हरभरा) चे भाव घसरल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ लागली. जागरुक संचालकांनी मासीक बैठकीत चर्चा करुन खरेदी चा आग्रह धरला होता. अखेर आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या कडे संचालकांनी धाव घेतल्याने त्यांनी विशेष लक्ष दिल्याने २ जुन पासुन खरेदी सुरू झाली आहे. २१ जुन पर्यंत अवघ्या विस दिवसांत दहा हजार क्विंटल खरेदी झाली आहे.शेतक-याना न्याय मिळाल्यामुळे शेतकरी आ.जवळगाव यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा करीत आहेत.
शासनाने खरेदी करण्याचा आदेश दिल्यानंतरही खरेदी-विक्री संघाकडे वाहतूक,हमालीचे पैसे नसल्याचे कारणाने खरेदी बंद झाली होती. सघाच्या मासीक बैठकीत संचालक परमेश्वर गोपतवाड, बालासाहेब पाटील, धनंजय पाटील शिंदे, डॉ.सुदर्शन भारती, सुभाष राठोड, रत्नाकर जाबुतकर, डॉ.सुरेश जाधव, प्रतिनिधी सुभाषराव पवार पाटील, गणेशराव तावडे यांनी खरेदी बाबत आवाज उठविला. जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या कडुन आपले बिल येईपर्यंत अनामत रक्कम देण्याची हमी बाळासाहेब पाटील टाकराळेकर यांनी दिली होती. या बाबत आ.जवळगावकर यांच्याकडे शिष्टमंडळ भेटण्याचे ठरले नुसार वरील संचालकांपैकि काही संचालकांनी त्यांची भेट घेतली.
आ.जवळगावकर यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी सुधीर पाटील यांच्या शी भ्रमनध्वनीवर संपर्क साधल्यास नंतर त्यांनी दोन अडिच लाख रुपये पाठवीले. पुन्हा संघाच्या असलेल्या पैस्यातुन तुर्त वाहतुक,हमाली साठी द्या मी शासनाकडे असलेल्या बिलाची व्यवस्था करण्यासाठी कुठेही कमी पडणार नसल्याचे आ.जवळगावकर यांनी सांगितले. त्यामुळे खरेदी वेगात सुरू आहे. आवक लक्षात घेऊन शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन अनुभवी कर्मचा-यांनी २१ जुन रोजी तब्बल तिनं काटे सुरू केले.एकाच दिवशी जवळपास ९०० क्विटल खरेदी करून जिल्ह्यात विक्रम केला आहे. एकदरीत आजपर्यंत १२,२०० क्विटल खरेदी झाली आहे.सघाच्या प्रांगणात शेतकऱ्यांचे जवळपास ३५ टृक्टर वजनासाठी उभे आहेत.
याकामी संघाचे व्यवस्थापक एस.जी.चव्हाण, गोदामकिपर के.एस. चाकोरे माजी व्यवस्थापक एच.एस.बोरकर,ग्रेडर एस.एस.रायवाडे, कर्मचारी किशनराव पेडरवाड, माणिकराव मोरे, चंद्रकांत गायकवाड यांच्या अतिशय मेहनतीमुळे शेतकऱ्यांना मदत होतं आहे. रात्री दहा वाजेपर्यंत आवकची नोंद घेतल्या जात आहे.हमाल वर्ग देखील अतिशय परीश्नम घेत असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत काटा होऊन खरेदी वेगाने होत आहे.
चना खरेदीला मुदतवाढ द्यावी...गोपतवाड
हदगाव हिमायतनगर तालुक्यातुन जवळपास ३५४८ शेतकऱ्यांनी आॅनलाईन खरेेेेदीची नोंद केली आहे. २१ पर्यंत ९२५ शेतकऱ्यांंचा चना खरेदी झााला आहे. २६२३ शेतकरी शिल्लक आहेत. जिल्हा मार्केेेेटिग अधिकारी यांनी २५ जुनपर्यंत खरेदी करावी असे पत्र संघाला दिले आहे. चार दिवसांत ऊर्ववरीत शेतकऱ्यांंचा माल खरेदी करणे शक्य होणार नसल्यामुळे शेेवटची तारीख वाढवुन द्यावी अशी मागणी संचालक परमेश्वर गोपतवाड यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना चांगला न्याय शेतकरी गंगाधर पाटील पिंपरखेड
खरेदी-विक्री संघाकडून चना खरेदी होत असल्याने खुल्या बाजारापेक्षा शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सातशे रुपये विना खर्चाचे जास्त भेटत असल्याचे पिंपरखेड येथील शेतकरी गंगाधर किशनराव पाटील आणि सोनारी येथील मनोज जयवंतराव पाटील यांनी समाधान व्यक्त केले.