यंदापासून नृसिंह जयंतीदिनी होणार दासरी -माला दासरी समाजाचे ऑडिट - मुरहारी यंगलवार - NNL


उमरखेड/हिमायतनगर|
महाराष्ट्रात अल्प संख्येमध्ये असलेल्या दासरी -माला दासरी समाजाचे ऑडिट यावर्षीपासून दरवर्षी भगवान नृसिंह जातयंतीदिनी केले जाईल अशी माहिती समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष मुरहारी दमण्णा यंगलवार यांनी पत्रकारांशी दिली आहे.

ते भाग्यवान नृसिंह जयंतीच्या पार्शवभूमीवर समाज बांधणी घरीच राहून नृसिंहाची आराधना करावी आणि कोरोनावर मात करावी असे आवाहन समाजबांधवांना करत असताना बोलत होते. विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक राज्यात अल्प संख्येत असलेल्या दासरी माला दासरी समाज आजही मोलमजुरी व जातिवंत नाडा-पुडी, दातां - कुंकू, करदोडे विक्रीचा व्यवसाय करून आपला उदार निर्वाह चालवितो आहे. मात्र अद्यापही शासनाने या समाजाच्या उन्नतीसाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे सर्वात अल्पसंख्येने असलेला हा समाज अजूनही दारिद्र्यातच जात आहे. शिक्षण घेऊन पुढे आला असला तरी या समाजाच्या जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही मिळाले तर त्याची पडताळणी होत नाही. 

अश्या अनंत चाचणीमुळे युवा पिढीला सुद्धा मोल मजुरी अथवा जातिवंत व्यवसाय करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. याबाबत अनेकदा आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार, आयुक्तालय, मंत्रालय स्तरापर्यंत निवेदने देऊन समाजाला एकाच वर्गात समाविष्ठ करून विविध योजनांचा लाभ देऊन नौकर्यासाठी प्राधान्य द्यायला हवे. मात्र शासनासह राजकीय नेत्यांनी देखील आमच्या समाजाकडे दुर्लक्ष केल्याने आजघडीला समाज विकास व उन्नतीपासून कोसो दूर आहे. हा लढा यशस्वी व्हावा आणि युवकांसह सर्व स्तरातील व्यक्तींना समाजात सन्मानाने जगात यावा. यासाठी मागील तीन वर्षांपूर्वी दासरी - माला दासरी समाजाची जनगणना करण्यात आली होती. तास अहवालही शासन, प्रशासनाकडे पाठविण्यात आला. एवढेच नाहीतर बार्टीच्या माध्यमातूनही समाजाला न्याय मिळेल असे अपेक्षित होते. मात्र अजूनही हा समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, गत दोन वर्षांपासून कोरोना महामारीने उच्चांक गाठला आहे. या महामारीने आमच्या समाजातील अनेक हुशारवंतांना गमवावे लागले आहे. हि पोकळी खादीही न उभारून निघणारी आहे.

मात्र यावर हार ना मनात समाजाचे कार्य अविरत सुरु राहावे या उद्दात हेतूने यंदापासून दरवर्षी समाजातील व्यक्तींचा आढावा घेऊन जनगणनेचे ऑडिट करून लेख जोखा अपडेट केला जाईल. यंदा कोरोना महामारीमुळे एकत्र जमता येणार नसले तरी ऑनलाईन पद्धतीने झूम मिटिंग मराठवाड्यातील तामसा येथील नृसिंह मंदिरातून आणी विदर्भातील कारखेड येथील नृसिंह मंदिरातून ऑडिट (आढावा) घेतला जाईल. यासाठी संघटनेतील महाराष्ट्र, जिल्हा, तालुका, गाव पातळीवरील सर्व प्रतिनिधींनी समाजची जनगणना माहितीच्या तयारीनिशी झूम मीटिंगद्वारे उपस्थित राहून मुख्य संघटनेला सहकार्य करावे. तसेच सर्व समाज बांधवानी कोरिया महामारीवर यश मिळविण्यासाठी शासनाने दिलेल्या मास्क, सैनिटायजर, सुरक्षित अंतर या निर्देशाचे पालन करावे. आणि स्वसुरक्षेसाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लस अवश्य घ्यावी असे आवाहन दासरी-माला दासरी समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष मुरहारी दमण्णा यंगलवार यांनी पत्रकारांच्या माध्यमातून केले आहे.      

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी