मराठा सेवा संघाचे आधारवड प्रा. डॉ.गणेश शिंदे यांचे निधन -NNL


अर्धापूर, निळकंठ मदने| 
तालुक्यातील शेणी (पार्डी) येथील रहीवाशी व बहुजन चळवळीतील ज्येष्ठ पदाधिकारी मराठा सेवा संघाचे तेलंगणा राज्याचे प्रभारी हदगाव येथील दत्त कला वाणिज्यचे प्रा डॉ गणेश शिंदे सर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुपारी 2 वाजता नांदेडच्या खाजगी दवाखान्यात निधन झाले.

डॉ.गणेश शिंदे  मराठा आरक्षणाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीराजे यांच्या समोर मराठा समाजाच्या व्यथा व दशा अत्यंत परखडपणे मांडलयात, आपल्या कामात व्यस्त असताना आज सकाळी १० वाजता त्यांना छातीमध्ये थोडीशी दुखत असल्यामुळे शहरातील खाजगी दवाखान्यामध्ये भरती करण्यात आले. परंतु दवाखान्यात दाखल होताच त्यांनी आपला श्वास सोडला.

निधनाची बातमी कळल्यानंतर सामाजिक चळवळीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी दवाखान्यासमोर गर्दी केली, गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता त्यांच्या मूळ गावी शेनी (पार्डी) ता.अर्धापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रा.डॉ.गणेश शिंदे यांच्या जाण्याने मराठा व बहूजन चळवळीचा मोठा आधार हरपला अश्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या.तालुक्यातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील हाणी झाली आहे.त्याच्या पश्चात आई,भाऊ,४ बहिनी,२ मूले,१ सुन असून,संघर्ष व सर्वेश चे ते वडील होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी