दिघी रेती चौकशीसाठी रामराव गुंडेकर यांच गुरुवारपासून तहसीलपुढे आमरण उपोषण -NNL


हिमायतनगर|
पैनगंगा नदीकाठावरील दिघी रेती घाटावरून नेकायदा उत्खनन करून १० ते १२ ट्रैक्टर चालक मालकाने वाहतूक आणि साठेबाजीचा गोरखधंदा महसूल अधिकारी -कर्मचार्यांच्या संगनमताने चालविला आहे. मागील तीन महिन्यात हजारो ब्रास रेतीचा बेकायदेशीर उपसा करून शासनाला चुना लाउन शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. या प्रकारच्या चौकशीची मागणी केल्यानंतर अल्प साठ्यावर कार्यवाही करून बहूतांश साठे माफियांची मोकळे सोडण्यात आले. त्यामुळे रामराव गुंडेकर तक्रारकर्ते हिमायतनगर तहसीलपुढे आज दुपारपासून कोविद-१९ च्या नियमांचे पालन करत आमरण उपोषणाला बसणार आहेत.  

विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर भागातील दिघी रेती पेंडावरून बेकायदेशीररीत्या रेतीचे उत्खनन करून पर्यावरणाला बाधा पोचविता शासनाला चुना लावण्याचा काम येथील ट्रैक्टर चालक-मालकांनी केलं आहे. हा प्रकार करताना विदर्भ प्रशासनाने एकवेळा वाहण पकडून लाखोंचा दंड आकारला होता. मात्र हिमायतनगर येथील महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी रेती माफियांवर एकही कार्यवाही तर केलीच नाही. उलट रेती माफियांशी हातमिळवणी करून शासन नियम १९६६ चे कलम ४८(७) चा भंग करत रेती चोरी करणार्यांना अभय देत स्वार्थ साधला आहे. 



पैनगंगा नदीकाठावरील व नाल्याच्या ठिकाणच्या एकही रेती घाटाचा लिलाव झाला नसताना देखील दिघी, हिमायतनगरसह खडकी बा.येथील काही ट्रैक्टर चालक - मालक यांनी उत्खननाचे सर्व नियम  धाब्यावर ठेऊन बेकायदेशीर रित्या रेतीचे उत्खनन करण्याचा गोरखधंदा मागील तीन ते चार महिन्यापासून चालविला आहे. यामुळे पर्यावरणाला बाधा निर्माण झाली असून, दिघी येथून उत्खनन केलेली रेती हिमायतनगर शहरातील बांधकाम धारकांना व ग्रामीण भागातील बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी वाहतुकीचा अथवा उत्खननाचा कोणताही परवाना नसताना रात्री-अपरात्रीला आणून ७ ते ८ हजार ब्रास दराने विक्री केला जात आहे.

मागील दि.१३,१४,१५ रोजी रात्री ९ ते सकाळी ७ वाजेच्या दरम्यान दिघी येथून ४ ते ५ ट्रैक्टरद्वारे ६० ते ६० ब्रास रेती आणून टाकण्यात आली आहे. याची चौकशी करण्यासाठी पळसपूर रोड ते हिमायतनगर रुख्मिणी नगर भागापर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेज चेक करून वाहनातून रेतीची वाहतूक होतांना दिसलेली वाहने जप्त करावीत. विदर्भाच्या धर्तीवर वाहनासह चालक-मालक यांच्यावर फौजदारी कार्यवाही करावी. दिघी रेती घाट ज्या मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या अखत्यारीत आहे. त्यांच्या व त्यांच्या नजीकच्या नातेवाईकांच्या मालमत्तेची शेवट कार्यरत झाल्यापासून चौकशी करावी, आणि एटीएस मशीनद्वारे नदीपात्राची मोजमाप करून मोजणीतून निघणाऱ्या रेतीची शासकीय दंडाच्या दरानुसार निघणारी किंमत संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या मिळकतीतून कपात करावी. दिघी पैनगंगा नदीकाठावरून पडीक, शासकीय, पोटखराब जमिनीत साठवून ठेवलेली आणि गावकुशिजवळ ढिगारे मारलेल्या हजारो ब्रास वाळूचे साठे जप्त करून तो साठा गोरगरीब घरकुल लाभधारकांना शासकीय नियमानुसार अल्प दारात देण्यात यावा. 



यासह इतर मागण्यांसाठी दि.२७ मे पासून तहसील कार्यालयासमोर रेतीमाफियां व त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रशासनाच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या विरोधात आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसैनिक रामराव गुंडेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महसूल मंत्री, विभागीय आयुक्त औरंगाबाद, याना ऑनलाईन द्वारे व जिल्हाधिकारी नांदेड, उपविभागीय अधिकारी हदगाव, तहसीलदार हिमायतनगर यांना पाठविलेल्या निवेदनातुन दिला होता. त्यांनतर महसूलच्या अधिकाऱ्यांनी दिघी घाटावर भेट देऊन फोटोसेशन करत केवळ ६० ब्रास रेतीसाठा जप्त केल्याचा दाखवून इतर मोठ्या प्रमाणात असलेल्या साठ्याला दुर्लक्षित करून आपले हात ओले केले आहेत. त्यामुळे रामभाऊ गुंडेकर यांनी गुरुवार दि.२७ च्या दुपारपासून कोविड - १९ च्या सर्व नियमांचे पालन करून गोरगरीब घरकुल धारकांच्या हक्कासाठी जनहितार्थ आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी