नांदेड जिल्ह्यात आज 995 व्यक्ती कोरोना बाधित; 26 जणांचा मृत्यू - NNL

नांदेड| जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 4 हजार 57 अहवालापैकी 995 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 422 तर अँटिजेन तपासणीद्वारे 573 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 44 हजार 30 एवढी झाली असून यातील 32 हजार 653 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 10 हजार 319 रुग्ण उपचार घेत असून 172 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. दिनांक 30 व 31 मार्च या दोन दिवसांत 26 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची संख्या 820 एवढी झाली आहे. दिनांक 30 मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे देऊळगाव ता. लोहा येथील 60 वर्षाचा पुरुष, शिवाजी नगर नांदेड येथील 70 वर्षाची महिला, नायगाव येथील 70 वर्षाचा पुरुष, तरोडा बु. नांदेड येथील 52 वर्षाचा पुरुष, चैतन्य नगर नांदेड येथील 73 वर्षाची महिला, निवघा ता. मुखेड येथील 65 वर्षाचा पुरुष, सहयोग नगर नांदेड येथील 52 वर्षाचा पुरुष, इतवारा नांदेड येथील 86 वर्षाचा पुरुष, कंधार येथील 80 वर्षाचा पुरुष, भोकर येथील 62 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे विठ्ठल नगर येथील 65 वर्षाची महिला, गुरुद्वारा नांदेड येथील 58 वर्षाचा पुरुष, सरस्वती नगर नांदेड येथील 50 वर्षाची महिला, सांगवी नाका नांदेड येथील 47 वर्षाची महिला, लोहा येथील 62 वर्षाचा पुरुष, दिनांक 31 मार्च रोजी विवेक नगर नांदेड येथील 70 वर्षाची महिला, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे दया नगर नांदेड येथील 72 वर्षाचा पुरुष, गोकूळ नगर नांदेड येथील 55 वर्षाचा पुरुष, हदगाव कोविड रुग्णालयात 80 वर्षाचा पुरुष, उमरी कोविड केअर सेंटर येथे 51 वर्षाची महिला, किनवट कोविड रुग्णालयात 75 वर्षाचा पुरुष, खाजगी रुग्णालयात नांदेड येथील 47 वर्षाचा पुरुष, 68 वर्षाचा पुरुष, 65 वर्षाची महिला, 70 वर्षाचा पुरुष असे एकूण 26 रुग्ण उपचारादरम्यान मृत पावले.

आज 806 बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 7, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 539, किनवट कोविड रुग्णालय 13, बिलोली तालुक्यातंर्गत 26, धर्माबाद 14, देगलूर कोविड रुग्णालय 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 27, उमरी तालुक्यातंर्गत 11, हदगाव कोविड रुग्णालय 33, अर्धापूर तालुक्याअंतर्गत 17, नायगाव तालुक्या अंतर्गत 7, खाजगी रुग्णालय 75, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 15, भोकर तालुक्याअंतर्गत 1, कंधार तालुक्याअंतर्गत 3, माहूर तालुक्याअंर्गत 14, लोहा कोविड रुग्णालय 1 असे एकूण 806 बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.16 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 209, नांदेड ग्रामीण 2, भोकर 7, देगलूर 12, हिमायतनगर 23, लोहा 18 , नायगाव 18, कंधार 16, मुखेड 43, हिंगोली 1, अर्धापूर 15, औरंगाबाद 3, मुदखेड 17, धर्माबाद 13 असे एकूण 422 बाधित आढळले. आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 262, नांदेड ग्रामीण 53, अर्धापूर तालुक्यात 14, भोकर 15, बिलोली 36, देगलूर 54, धर्माबाद 4, हदगाव 6, हिमायतनगर 3, कंधार 1, किनवट 51, लोहा 25, माहूर 6, मुदखेड 8, मुखेड 2, नायगाव 14, उमरी 17, हिंगोली 1, लातूर 1 असे एकूण 573 व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत.

जिल्ह्यात 10 हजार 319 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 246, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 81, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 93, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 129, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 101, मुखेड कोविड रुग्णालय 254, देगलूर कोविड रुग्णालय 46, जैनब हॉस्पीटल कोविड केअर देगूलर 55, बिलोली कोविड केअर सेंटर 35, नायगाव कोविड केअर सेंटर 76, उमरी कोविड केअर सेंटर 24, माहूर कोविड केअर सेंटर 18, भोकर कोविड केअर सेंटर 21, हदगाव कोविड रुग्णालय 41, हदगाव कोविड केअर सेंटर 60, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 106, कंधार कोविड केअर सेंटर 10, महसूल कोविड केअर सेंटर 195, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 11, धर्माबाद कोविड केअर सेंटर 34, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर 18 , बारड कोविड केअर सेंटर 5, मांडवी कोविड केअर सेंटर 21, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 6 हजार 76, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 789, खाजगी रुग्णालय 762 , लातूर येथे संदर्भित 1, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी 12, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 19, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 7 असे एकूण 10 हजार 319 कोविड बाधित उपचार घेत आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 17 हजार 611
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 66 हजार 944
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 44 हजार 30
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 32 हजार 653
एकुण मृत्यू संख्या-820
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.16 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-15
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-36
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-407
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-10 हजार 319
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-172.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी