रेमडेसिवीर इंजेक्शन’कृत्रिम तुटवडा-NNL

नांदेड, मारोती सवंडकर। ‘रेमडेसिवीर इंजेक्शन’च्या शोधात रुग्णांचे नातेवाईक त्रस जिल्हयासह तालुक्‍यात कारोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, शहरासह जिल्हाभरात सर्वत्रच पॉझिटिव्ह रुग्ण येण्याचे प्रमाण मागील दोन आठवड्यांपासून वाढले असून कोरोना रुग्णांना उपचारांत देण्यात येणारे प्रभावी इंजेक्शन म्हणून ‘रेमडेसिवीर इंजेक्शन’ओळखले जाते त्यामुळे अचानक वाढलेल्या मागणीमुळे इंजेक्शनाची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून अनेक रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शनाच्या शोधात त्रस्त असल्याचे चित्र आहे.

कोरोनावर प्रभावीपणे काम करणारे ‘रेमडेसिवीर इंजेक्शन’ची अनेक औषधी विक्रेते हे कृत्रिम टंचाई निर्माण करून रुग्णांच्या अडचणीत अजून भर घालत असल्याचे चित्र दिसून येत असून या संदर्भात सोशल मिडीयातूनही आवाज उठविल्या जात आहे त्याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देत इंजेक्शनाच्या उपलब्धते बाबतच्या अधिकृत नोंदी अद्यायावत करत या संदर्भातील नियमावलीची तात्काळ अमलबंजावणी करावी व गरजू रुग्णांना ‘रेमडेसिवीर इंजेक्शन’चा त्वरीत पुरवठा व्हावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे .

रुग्णांना देण्यासाठी आवश्‍यक असलेले रेमडेसिवीर इंजेक्‍शनचा काळा बाजार थांबवा .. भागवत देवसरकर

सध्या जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाने हाहाकार माजवला असून अनेक रुग्णांना या गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे,कोरोणावर प्रभावीपणे काम करणारे रेमडीशिवर नावाच्या इंजेक्शनची औषधी दुकानदार कृत्रिम टंचाई करून काळाबाजार करत असल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास आले आहे, या प्रकरणी मा. जिल्हाधिकारी,मा.जिल्हा आरोग्य अधिकारी,व मा.जिल्हा अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांनी संयुक्त मोहीम राबवून या औषधाची कृत्रिम टंचाई व काळाबाजार करणारे औषधी दुकानदारावर तात्काळ कारवाई करावी व कोरोना बाधीत रुग्णांना आवश्यक त्या प्रमाणात रेमीडेसीवर इंजेक्शनचा पुरवठा करावा अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची अशासकीय सदस्य भागवत देवसरकर यांनी केली आहे.

जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णाची संख्या वरचेवर वाढत असल्यामुळे रेमडीसीवर इंजेक्शनला मागणी वाढत आहे, त्यातच औषध दुकानदार इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा करत आहेत, दुसरीकडे ऍडमिट असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी इंजेक्शनची संबंधित मेडिकलवर जाऊन मागणी केली असता आमच्याकडे औषधांचासाठा उपलब्ध नाही असे सांगून इंजेक्शन देण्यास नकार देत रुग्णांच्या नातेवाईकांना परत पाठवत आहेत. रेमडेसीवर इंजेक्शनाचा जिल्ह्यात किती साठा उपलब्ध आहे,व कोणत्या औषधी दुकान वर किती इंजेक्शनचा साठा उपलब्धता आहे याची माहिती स्टॉक रजिस्टरवर ठेवण्यास बंधनकारक करावे,व या इंजेक्शनची कृत्रिम टंचाई करून काळाबाजार करणाऱ्या औषधी दुकानदारावर त्वरीत कारवाई करून जिल्ह्यात या इंजेक्शनचा मुबलक प्रमाणात पुरवठा करावा व रुग्णांना मिळण्यास अडचण होऊ नये याची जिल्हा प्रशासनाने काळजी घ्यावी अशी आग्रही मागणी शेवटी निवेदनात  जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य भागवत देवसरकर यांनी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी