किनवट तालुक्यातील मौजे तल्हारी येथील ६५ वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू

संपर्कात आलेल्या ४४ पैकी ०३ पॉझिटिव्ह तल्हारी गाव प्रशासनाच्या वतीने सील करण्यात आले

शिवणी| शिवणी पासून ६ कि.मी.अंतरावर असलेले तल्हारी गावातील ६५ वर्षीय वयोवृद्ध पुरुषाचा दि.२८ जुलै रोजी मृत्यू झाला. नंतर त्या इसमाच्या सायंकाळी कोरोना रिपोर्ट पॉझेटीव्ह निघल्याने तल्हारीसह शिवणी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तल्हारी येथील मृत व्यक्तीचे रिपोट पॉझेटीव्ह आल्यानंतर शिवणीसह शिवणी परिसरातील प्रशासन जागे झाले. तल्हारी येथील कोरोना ग्रस्त इसमाचा मृत्यूचा नंतरचा अहवाल पॉझेटीव्हच्या संपर्कात आलेले ४४ जणांचा स्वाईप घेण्यात आला. पुढील दोन दिवस शिवणीत जनता कर्फु असून, त्या ४४ जणांच्या अहवालातील ०३ जण पुन्हा पॉझिटीव्ह आले असून, तल्हारी गावचे सरपंच दामाजी तांबरे यांच्या मार्गदर्शनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्या द्वारा जंतुनाशक (सॅनिटायझर) फवारा करून सील करण्यात आले. शिवणी परिसरातील नागरीकांची झोप उडाली आहे. शिवणी येथील बाजारपेठ बंद राहील असे शिवणी येथील सरपंच सौ. नर्मदाबाई बोंदरवाड यांच्या द्वारे कळविण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोरोना ग्रस्तांचा मृत्यूमध्ये दिवसंदिवस वाढ होत असल्याने आता ग्रामीण भागात ही कोरोना चे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. दि.२८ जुलै रोजी एकाच दिवशी १० जणांचा मृत्यू व २९रोजी ६ जणांचा मृत्यू झाल्याने त्यात किनवट तालुक्यातील मौजे तल्हारी येथील ६५ वर्षीय इसमाचा कोरोना आजाराने मृत्यू झाल्याने शिवणी परिसरात प्रशासनातर्फे सतर्क राहण्याचा इशारा व सामाजिक अंतरआणि संचार बंदीचे नियम पाळण्याचे निर्देश प्रार्थमिक आरोग्य केंद्र शिवणी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.के.एस.मुंडे. यांनी दिले आहे. 

इस्लापुर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक सुशांत किनगे व उपनिरीक्षक श्रीकिशन कांदे, शिवणी येथील ग्रामविकास अधिकारी एस.बी.फुलारी, सरपंच नर्मदाबाई बोंदरवाड,कमलबाई देशमुख, पोलीस पाटील अनुसयाबाई बोंदरवाड, उपसरपंच उमाजी ढाकारे यांच्यासह ग्रामपंचायचे सर्व सदस्य, आरोग्य कर्मचारी आदींनी जनतेने स्वतःची काळजी घ्यावी, घराबाहेर कोणी पडू नये असे आवाहन केले आहे. शिवणी परिसरात कोरोनाच्या पाश्वभूमीवर परिसरातील घडामोडीवर नजर ठेवण्यासाठी ग्रामपंचाय येथील सरपंच प्रतिनिधी दिगांबर बोंदरवाड, हन्मंतु पाटील, दिनेश अष्टपोलू, नागेश बेलयवार, शेख रहीम, नडपी खंडू मेंढके आदी पाळत ठेवून आहेत.

.....प्रकाश कार्लेवाड, शिवणी, ता.किनवट, जी.नांदेड.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी