कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे जवळगावकर मुंबईकडे रवाना

 हिमायतनगर|
हदगाव-हिमायतनगर विधानसभेचे आमदार माधवराव पाटिल यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणुन मुंबईकडे रवाना करण्यात आल आहे, जिल्हयात पालकमंत्री अशोक चव्हाण, आमदार मोहन हंबर्डे, आमदार अमरनाथ राजुरकर यांचे नंतर कोरोना पॉझिटिव्ह आलेले जवळगावकर चौथे आमदार आहेत, हि वार्ता कार्यकर्त्यांत पसरताच निरोगी आयुष्यासाठी चाहत्यांनी देवाला साकड घातल आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आठवडाभरा पुर्वी  बैठक होती, या बैठकिच्या अव्वल स्थानी पालकमंत्री अशोक चव्हाण होते. आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या शेजारी आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे बसले होते. या बैठकी नंतर अनेकांचे स्वॅब तपासण्यात आले परंतु पहिल्यावेळी निगेटिव्ह अहवाल आला होता. तीन-चार दिवसांपासून कोरोनाची लक्षणे जानवत असल्याने नांदेड येथिल देवसरकर यांच्या भगवती हॉस्पीटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते दरम्यान मंगळवारी त्यांचा दुसर्यांदा स्वॅब घेण्यात आला असता बुधवारी रात्री आमदार जवळगावकर यांचा स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आला.

जवळगावकरांना पुर्विचे काहि आजार असल्यामुळे त्यांना मुंबईला रवाना करण्यात आल असुन प्रकृती चांगली आहे अस निकटवर्तीया कडुन सांगण्यात आल. त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच चाहत्यांनी भगवंताला साकडे घालुन प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थणा करत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी