शिवाजीनगर पोलीसांनी एका चोरट्याकडून 3 लाख 44 हजारांचा ऐवज जप्त केला

नांदेड|
शिवाजीनगर पोलीसांनी एका चोरट्याकडून 5 मोटारसायकली आणि पोलीसांच्या भाषेतील पिवळ्या धातूचे शॉर्ट गंठण असा 3 लाख 44 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. हा चोरटा पोलीसांनी 24 तासाच्या आतच ताब्यात घेतला होता. 

24 जुलै रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास पटेलनगर येथून दोन चोरट्यांनी कुरीअरचे पार्सल घेवून जाणाऱ्या एका व्यक्तीची मोटारसायकल चोरली होती. त्याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 25 जुलै रोजी गुन्हा दाखल झाला. त्याचा क्रमांक 280/2020 असा आहे. या संदर्भाने पोलीसांनी आपल्या खबरीनेटवर्क नुसार शेख सलीम शेख अब्दुल रज्जाक याच्याकडे विचारपुस केली असता त्याच्याकडून 5 मोटारसायकली आणि एक शॉर्ट गंठण असा 3 लाख 44 हजारांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप खानसोळे आणि पोलीस नाईक अविनाश पांचाळ करीत आहेत. 

या कामगिरीसाठी पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, अपर पोलीस अधिक्षक दत्ताराम राठोड, पोलीस उपअधिक्षक अभिजित फस्के, शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक आनंदा नरुटे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस कर्मचारी संजय मुंडे, रामकिशन मोरे, दिलीप राठोड, शेख लियाकत, शिलराज ढवळे, शेख दुराणी, काकासाहेब जगताप, राजकुमार डोंगरे, विशाल अटकोरे, प्रकाश मामुलवार, शिवाजी इंगोले आणि केंद्रे यांनी परिश्रम घेतले.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी