नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र संकुलातील विद्यार्थिनी प्राची कल्याणकर यांची गुजरात येथील सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, वडोदरा येथे निवड झाली आहे.
ऋषीकेश राजपूत यांनी नायपर मध्ये पीएच.डी. प्रवेशासाठी नायपर पीएच.डी. ऑल इंडिया रँक -६ प्राप्त केलेला आहे. सुरज पौळकर या विद्यार्थ्यांनी सी.एस.आय.आर. युजीसी नेट, जे.आर.एफ., ऑल इंडिया रँक -१४८ मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. या त्यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन गौरव केला.
या यशस्वी विद्यार्थ्यांना संकुलाचे संचालक डॉ. एस.जे वाढेर, डॉ. आर.एस. मुन व डॉ. टी. एम. कल्याणकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉ. संजय पेकमवार, डॉ. शशिकांत ढवळे, डॉ. एस. जी. गट्टाणी, डॉ. एस. आर. बुटले, डॉ. आर. व्ही. क्षीरसागर, डॉ. एस. एल. पटवेकर व प्रा. वैशाली शेळके यांची उपस्थिती होती.