नांदेड(प्रतिनिधी)छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मृती दिन ०३ एप्रिल रोजी असताना जाणिपूर्वक पुन्हा एकदा तारीख, तिथीचा घोळ घालत ११ एप्रिल रोजी साजरा करण्याचा घाट शासनाने घातला आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मृती दिनाचा घोळ शासनाने थांबवावा असे निवेदन संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने नांदेड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे निर्वाण ०३ एप्रिल १६८० रोजी किल्ले रायगडावर झाले. १९ फेब्रुवारी हा शिवरायांचा जन्मदिवस जगभरात उत्साहात साजरा होतो.
राज्याचे मुख्यमंत्री या दिवशी शिवनेरीवर जन्मदिवस समारंभात सहभागी होतात. परंतु पुन्हा एकदा शासनाच्या वतीने तारीख, तिथीचा घोळ स्मृतिदिनाबाबत जाणीवपूर्वक घातला जात आहे. राजांचा स्मृति दिन ०३ एप्रिल रोजी असताना तिथीनुसार ११ एप्रिल रोजी रायगडावर ढोल वाजवून स्मृती दिन साजरा करण्याचा घाट शासनाने घातला आहे.
स्मृती दिन हा शांततेत व शिवरायांना अभिवादन करत ०३ एप्रिल रोजी जगमान्य इंग्रजी तारखेलाच साजरा करायला पाहिजे. तिथीच्या व धर्माच्या विळख्यात शिवरायांना अडकवू नये. स्मृती दिनाच्या, पुण्यतिथीच्या नावाखाली विकृत मानसिकतेतून आनंदोत्सव करू नये. शासनाने शिवरायांचा जन्मदिवस इंग्रजी तारखेनुसार व स्मृती दिन तिथीनुसार असा खेळ करू नये. असे निवेदन संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड नांदेड च्या वतीने जिहाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेड दक्षिण जिल्हाध्यक्ष संकेत पाटील, उत्तर जिहाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, जिजाऊ ब्रिगेड जिहाध्यक्षा रेखा पाटील,जयश्री भायेगावकर, वनिता देवसरकर, सुभाष कोल्हे, मोहन शिंदे, दिपक भरकड, कैलास वैद्य, श्रीनाथ गीरी, साईनाथ टर्के, तुकाराम सुर्यवंशी, गजानन इंगोले, साईनाथ चिंचाळे, अर्जित सिंग, गणेश पुयड, गोविंद ढगे, पंडित नरवाडे, अमोल कोकाटे, शशिकांत कलाने, अक्षय कोकाटे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.