नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विदयापीठ व ग्रामीण टेकनिकल अँड मानजमेंट कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने, अंतर महाविद्यालय "राष्ट्राचेताना" युवक महोत्सव 2022 दि. 9 ओक्टोम्बर 2022 पासून सुरु झाला, त्यात दुसऱ्या दिवशी दि 10 ऑक्टोबर रोजी विविध कला प्रकारचे सादरीकरण झाले त्यात महाराष्ट्राची मातीतील अस्सल लोक कला लावणी चे भारदस्त सादरीकरण झाले सहभागी व्ही विह्यार्थिनीने विविध मराठी गाण्यावर ठुमके लागवले, एकूण 40 महाविदयालयाने सहभाग नोंदविला.
सदरील लावन्यावर तरुणांई लय, दिलखेच अदाकारी ढोलकीच्या तालावर जाम थिरकली. तरुण प्रेक्षकांनी. ठमकेबाज लावन्या त्याला तरुणांईने शिट्यावाजून प्रतिसाद दिला. आर्ट अँड परफॉरमिंग आर्ट, स्वा. रा ती म विद्यापीठ परिसर ची विद्यार्थिनी कु श्रद्धा कांबळे हिने "तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वाणीचा मसाला" गाण्यावर लावणी नृत्य ठसकेबाज सादरीकरण केले,तसेच ग्रामीण टेकनिकल अँड म्यानेजमेंट कॅम्पस, विष्णुपुरी ची विद्यार्थिनी कु. प्रशीका नरवाडे हिने "राया प्रीतीच्या झुलव्यात झूलवा"या गाण्यावर ठुमके लागावले.
तसेच जयक्रांती महाविद्यालय, लातूर येथील विध्यार्थी सुरज सूर्यवंशी ह्याने " माझ्या कातड्याचा जोडा शिवावा " या गाण्यावर, पठ्ठे बापूराव, लावणी सम्रादणी स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर या थोर कलावांतना लावणीतून श्रद्धांजली व स्मरण केले, त्यावर तरुणांई भाऊक झाले. या लावणी महोत्सवात मराठवाड्यातील लावणी स्टार कु. सान्वी जेठावानी ह्यांची प्रमुख उपस्थिती होती. तरुणांईने नाचूनअशा जोश वातावरणातव दिलेला प्रतिसादात पार पडला