दहावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलींनी मारली बाजी

नांदेड|
दीड महिन्याच्या विलंबाने दहावीचा निकाल जाहीर एसएससी बोर्डाने जाहीर केला आहे. गेल्या कांही वर्षातील विविध परिक्षांचा अनुभव लक्षात घेतला तर मुली ह्या मुलांपेक्षा जास्तीच्या टक्कवारी घेवून श्रेष्ठ ठरल्या आहेत. या परिक्षेत लातूर विभागात नांदेड जिल्ह्याची घसरण झाली आहे. 

जिल्ह्याचा निकाला 89.53 टक्के इतका लागला. त्यात मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 86.48 तर मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.99 टक्के इतके आहे. गेल्यावर्षी दहावीचा निकाल 68.13 टक्के लागला होता. यावर्षीय निकालाची टक्केवारी 21.40 टक्क्यांनी वाढली आहे. सदरचा निकाल विभागातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत सर्वात कमी आहे. मात्र प्रतीवर्षांप्रमाणे यंदाही निकाल मुलींच मुलांपेक्षा अधिक बाजी मारली आहे.

नांदेड जिल्ह्यातील 689 शाळांमधील 46 हजार 222 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. यामध्ये 24 हजार 595 मुले तर 21 हजार 627 मुलींचा समावेश होता. यात प्रत्यक्षात 24 हजार 263 मुले व 21 हजार 424 मुलींनी परीक्षेत सहभाग घेतला. यामध्ये 20 हजार 982 मुले पास झाले. तर 3 हजार 281 मुले नापास झाली. मुलींमध्ये 19 हजार 921 मुली पास झाल्या आहेत. तर 1 हजार 503 मुली नापास झाल्या. मुलींपेक्षा मुलांचे नापास होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुलांच्या पास होण्याचे प्रमाण 86. 48 टक्के तर मुलींचे 92.99 एवढे आहे.

तालुकानिहाय शाळांची व निकालाची टक्केवारी 
भोकर-शाळा 30 (88.51 टक्केवारी), बिलोली-36(93.16), नांदेड-144(91.95), अर्धापूर-24(90.75), देगलूर-49(89.17), धर्माबाद-16(91.00), हदगाव-34 (86.22), हिमायतनगर-17(84.83), कंधार-57(84.53), किनवट-68(88.10), लोहा-53(88.31), माहूर-21(86.56), उमरी-19 (91.03), मुखेड-57(92.91), मुदखेड-23(84.50), नायगाव-40 (91.38) एवढी आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी