एका महिलेने एक युवक आणि दोन युवतींची 1 लाख 60 हजारांना फसवणूक केली

नांदेड|
एका महिलेने एक युवक आणि दोन युवतींची कंत्राटपध्दतीवर परिचारिका आणि ब्रदर ही नोकरी लावून देण्यासाठी 1 लाख 60 हजार रुपये घेतले पण नोकरी लागली नाही म्हणून याबाबत त्यांनी फसवणूकीचा अर्ज दिला. आज शिवाजीनगर पोलीसांनी या महिलेला पोलीस ठाण्यात बोलावले असतांना ती वेगळ्याच प्रकाराने वागत होती. पण वृत्त लिहिपर्यंत कोणताही कायदेशीर गुन्ह्याची नोंद झालेली नाही. 

मनिषा अशोक सोनाळे, रंजना पंडीत धनवे आणि विलास अशोक सोनाळे या तीन युवकांनी नर्सींग कोर्स केला होता. त्यांना अण्णा भाऊ साठे चौक, विष्णुनगर येथे राहणारी महिला शिवकांता सदाशिव कदम भेटली. तीने तुम्हाला कंत्राटपध्दतीवर नर्सींगची नोकरी मिळून देते असे सांगते. तेेंव्हा या तिघांनी 23 सप्टेंबर 2019 रोजी 1 लाख 30 हजार रुपये दिले आणि नंतर ऑनलाईन व्यवहारातून 30 हजार असे एकूण 160 हजार रुपये दिले. त्यानंतर शिवकांता कदम यांनी नोकरीचा आदेश दिला नाही म्हणून विचारणा केली असता ती या युवक-युवतींना जीवे मारण्याची धमकी, शिवीगाळ करत होती. हा अर्ज पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे 28 मे 2020 रोजी देण्यात आला. त्यानंतर पोलीस अधिक्षक कार्यालयात 11 जून 2020 रोजी देण्यात आला. 

आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील हवालदार बी.डी. वडपत्रे यांनी या महिलेला चौकशीसाठी बोलावले असतांना महिला शिवकांता सदाशिव कदम पोलीस ठाण्यातच धिंगाणा घालत होती. वृत्तलिहिपर्यंत या प्रकरणी काही एक कार्यवाही झालेली नव्हती. विशेष बाब म्हणजे पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार हे सुध्दा यावेळी पोलीस ठाणे शिवाजीनगर येथेच हजर होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी