अनुदानित बियाणे येऊन महिना झाला तरी शेतकऱ्यांना परमिट मिळेना

शेतकऱ्यांची परेशानी.. सोसावा लागतो आर्थिक भुर्दंड 

हिमायतनगर| शासनाने शेतकऱ्यांना पेरणी करीता सोयाबीनचे बियाणे प्रति सातबारावर महामंडळाची तीस किलो वजनाची बॅग देण्याचे आदेश आसते वेळी हिमायतनगर तालुका कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित काभारामुळे बियाणे वाटप सुरु करण्यात चालढकल केली जात आहे. याबाबत माहिती घेतली असता शासन स्तरावरून परमिट उपलब्ध नसल्यामुळे गोर - गरीब शेतकऱ्यांना कृषी
कार्यालयाच्या चकरा मारून हैराण व्हावे लागत आहे. एवढेच नव्हे तर परमिट अभावी बियाणे खरेदीसाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून, कृषी बिव्हगच्या सावळा गोंधळ प्रकारामुळे खरे गरजवंत लाभार्थी शेतकरी सोयाबीन बियाणे मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता बळावली आहे. या प्रकाराकडे जिल्हा कृषी अधिकारी नांदेड यांनी लक्ष देऊन तात्काळ परमिट उपलब्ध करून द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

तालुक्यातील शेतकर्‍यांना कृषि कार्यालयाकडुन अनुदानावर सोयाबीनचे परमीट देण्यांस टाळाटाळ केली जात आहेत अश्या अनेक तक्रारी होऊ लागल्या असून, सकाळपासूनच कृषी कार्यालायत शेतकरी तहान मांडून बसत आहेत. शेतकर्‍याला तालुका कृषि कार्यालय हिमायतनगर यांच्याकडून पेरणी करिता अनुदानावर सोयाबीन मिळण्यासाठी सज्जाचे कृषि सहाय्यक आणि अधिकाऱ्यांना वारंवार भेटून सोयाबीन बियाणेचे परमीट देण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील शेतकरी गेल्या आठ दिवसापासून करत आहेत. कारण परमिटवर दिले जाणारे महामंडळाचे बियाणे येथील कृषी दुकानावर उपलब्ध होऊन महिना उलटला. परंत्तू परमिट मिळत नसल्याने शेतकर्यांना बी-बियाणे खरेदी करताना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. परमीटसाठी शासनाची जी रक्कम, सातबारा, होल्डिंग, अधाराची प्रत देण्यांस शेतकरी तयार असताना तयार आहेत. याची पूर्तता करूनही मागील आठ ते १० दिवसापासुन दररोज हिमायतनगरच्या कृषी कार्यालयास शेतीची कामे सोडून शेतकरी चक्करा मारून बेजार होत आहेत. काही ठिकाणचे कृषि सहाय्यक भेटतच नाही वा त्यांचा फोन बंद ठेवण्यात आल्यामुळे फोन लागत नाही. तालुका कृषि कार्यालयात शेतकरी गेले तर नांदेडहून अजूनही परमिट आले नाहीत असे सांगितले जात असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. हि बाब लक्षात घेता पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना परमिट देऊन अनुदानावरील बियाणे वितरित करून दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

याबाबत तालुका कृषी अधिकारी श्री ज्ञानोबा गडंबे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कि, परमिटसाठी मी दोन दिवसापासून नांदेडला आहे, उदयाला परमिट घेऊन आल्यानंतर शेतकऱ्यांना वितरित करण्यात येतील, शेतकऱ्यांनी सुद्धा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

तात्काळ परमिट उपलब्ध करा अनायाथ आंदोलन  - प्रहार 
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्याचे परमिट मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जादा आर्थिक भुर्दंड देऊन बियाणे खरेदी करावे लागत आहे. संपूर्ण जिल्ह्यात शासनाकडून सवलतीच्या दरात बियाणे देण्याचे आदश असताना कृषी विभागात अद्यापही परमिट उपलब्ध झाले नाही. यास प्रश्नाचा उदासीन धोरण कारणीभूत असून, तात्काळ शेतकऱ्यांना परमिट उपलब्ध करून द्यावे अन्यथा प्रहार जनशक्ती संघटना आपल्या स्टाईलने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करेल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख बालाजी बलपेलवाड यांनी जिल्हा कृषी अधिकारी नांदेड यांच्याकडे दिला आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी