एक झाड लावू आपले पर्यावरण वाचवू - कवी. चंद्रकांत चव्हाण


नांदेड| अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र कडून दिनांक 17 जून रोजी साईबाबा मंदिर, चैतन्य नगर या ठिकाणी ठीक संध्याकाळी 07 वाजता आपले पर्यावरण हिरवे व्हावे व वातावरण शुद्ध राहावे म्हणून वृक्षरोपण व कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरुवात एक झाड लावून व त्यास
पाणी देऊन करण्यात आले आज आपल्या पर्यावरण मध्ये होणारे बदल पाहता मानवाचे यापुढे जगणे कठीण होणार आहे त्याचे गांभीर्य पाहता अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र यांनी वट पौर्णिमा निमित्त  झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला व  वट पौर्णिमा निमित्त कविसंमेलनाचे।आयोजन करण्यात आले होते या कविसमेलनाचे अध्यक्ष अक्षरोदयसाहित्य मंडळ, महाराष्ट्र चे नांदेड जिल्हा सचिव जेष्ठ साहित्यिक मा. चंद्रकांत चव्हाण हे होते व प्रमुख पाहुण्या अक्षरोदय साहित्य मंडळाच्या राज्य कोषाध्यक्षा मा. सौ. उषाताई ठाकूर यांनी भूषवले व मा. रामराव थडके हे होते व मंदिर प्रमुख मधुकर मुळे हे उपस्थित होते या कविसंमेलनाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांच्या कविता व मनोगत ने सुरू करण्यात आले त्यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले की सर्वांनी एक तरी झाड लावले पाहिजे व निसर्गाचा बचाव केला पाहिजे कविते मध्ये त्यांनी वट पौर्णिमा च्या वर कविता सादर केली व प्रमुख पाहुण्या कवियत्री सौ. उषाताई ठाकूर यांनी कविता सादर केली कवितेमध्ये त्यांनी झाडे तोडू नका व एक झाड लावा हा संदेश दिला या नंतर लागलीच सर्व कवी यांनी त्यांच्या कविता सादर केल्या व सर्व दर्शक यांची मने जिंकली व टाळ्याचा वर्षाव झाला या मध्ये कवयित्री व मंडळाच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षा मा. अनुराधा हवेलीकर, कवी तथा नांदेड जिल्हा अध्यक्ष मा. मारोती मुंडे, कवी तथा सल्लागार विठ्ठलराव जोंधळे, सदस्य मोहनराव बुक्तरे, समिक्षा साहित्य मंडळाचे कवी. नरेंद्र धोंगडे,कवी तथा नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष अजित अटकोरे व नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष सुमेध चौदंते बाल कवी स्वरा व नीलिमा भयानी अक्षरोदय साहित्य मंडळाचे अध्यक्ष सदानंद सपकाळे यांनी कविता सादर केल्या  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी. सदानंद सपकाळे यांनी केले व आभार कवी. मारोती मुंडे यांनी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी