NEWS FLASH आता.. ऑनलाईन द्वारे चालणार अंगणवाडी ताईंचे कामकाज, मृग जाऊन आठ दिवस लोटले... पाऊस झाला बेपत्ता, अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या लाभासाठी भावास दिली कोट्यावधीची ठेकेदारी, बुलढाणाचे शाखाधिकारी उदय चौधरी यांच्या बदलीनंतर निरोप, प्रा.दत्ता मगर याना पीएचडी प्रदान, ..., **

मंगलवार, 18 जून 2019

बुलढाणाचे शाखाधिकारी उदय चौधरी यांच्या बदलीनंतर निरोप

शाखाधिकारी म्हणून संदीप गाडेगावकर रुजू  
हिमायतनगर| बुलडाणा अर्बन शाखा हिमायतनगरचे शाखाधिकारी उदय चौधरी यांची नांदेडच्या तरोडा शाखेत नुकतीच बदली झाली आहे. त्यां निमित्ताने येथील कर्मचारी व गावकऱ्यांच्या वतीने त्यांना निरोप आणि त्यांच्या जागी नव्याने पदभार घेतलेले शाखाधिकारी संदीप गाडेगावकर यांचे स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
 

सण २०१२ च्या जून महिन्यात श्री उदय रामराव चौधरी यांनी हिमायतनगर बुलडाणा अर्बन शाखाधिकारी म्हणून पदभार घेतला. त्यांनी ७ वर्षे सेवा पूर्ण करून शहरासह तालुक्यातील ग्रामदिन भागाच्या ग्राहकांना उत्कृष्ट सेवा दिली. सेवेच्या ८ व्या वर्षी त्यांची बदली नांदेड तरोडा शाखेत झाली असून, त्या निमित्ताने येथील शाखेमध्ये छोटेखानी कार्यक्रमात श्री चौधरी याना येथील युवा नगराध्यक्ष कुणाल राठोड, व्यापारी संदीप अग्रवाल, संतोष रेखावार, अनिल अलकटवार, राहुल मोतेवार आदींसह अनेक व्यापारीं, शाखेतील कर्मचारी यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करत निरोप आणि शुभेच्छा दिल्या. तसेच नव्याने पदभार सांभाळलेले शाखाधिकारी संदीप गाडेगावकर यांचेही स्वागत करण्यात आले. यावेळी श्री चौधरी म्हणाले कि, मागील ७ वर्षात हिमायतनगर परीसरातील शेतकरी बांधव, व्यापारी, पत्रकार, डॉक्टर, सर्व राजकीय पक्षाचे नेते मंडळी, सर्व हिमायतनगर वासियांनी जे सहकार्य आपुलकी आणि प्रेम बुलडाणा अर्बन व मला दिले त्याबद्दल मी सर्वांचा मनस्वी आभारी आहे. आपल्या प्रेमाची ही शीदोरी माझ्यासाठी अमूल्य ठेवा आहे. यापुढेही आपले सहकार्य बुलडाणा अर्बनला असेच निरंतर चालू राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

कोई टिप्पणी नहीं: