अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या लाभासाठी भावास दिली कोट्यावधीची ठेकेदारी

नगरपंचायत, औद्योगिक नगरी अधिनियम १९९५ चे कलम ४४ अन्वये 
सेवकत्व रद्द करण्याची उदय देशपांडे यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी


हिमायतनगर| शहरात नगरपंचायती अंतर्गत सुरु असलेल्या कोट्यावधीची कामे विद्यमान उपनगराध्यक्षाने आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वतःचे आर्थिक हित जोपासण्यासाठी आपल्याच्या भावास बहाल केल्याचा प्रकार अंदाजपत्राच्या छाननीतून उघडकीस आला आहे. यावरून येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री उदय प्रभाकर देशपांडे यांनी एड. जगदीश हाके यांच्या माध्यमातून
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडे दि.१५ जून २०१९ रोजी याचिका दाखल केली असून, बेकायदेशीरपणे हस्तक्षेप करून केल्या जाणाऱ्या कामास जबाबदार असलेल्या पदाधिकारास अधिनियम १९६५ चे कलम ४४ अन्वये पदावरून तात्काळ अनर्ह घोषित करणे न्यायावह होईल असे म्हंटले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, अगोदर काँग्रेस विरद्धच्या उमेदवारास मतदान केल्यामुळे कार्यमुक्त करण्याची याचिका औरंगाबाद खंडपीठात सुरु असताना आता नातेवाईकास कंत्राट देण्याच्या प्रकारावरऔन पुन्हा उपनगराध्यक्षपद गोत्यात आले आहे. 

हिमायतनगर शहर हे तालुक्याचे गाव असून, येथील लोकसंख्या ३० हजाराच्या आसपास गेली आहे. शहराची वाढती वस्ती लक्षात घेता शासनाच्या नगरविकास मंत्र्यांकडून २०१८-१९ अंतर्गत सिमेंट काँक्रेटचे रस्ते, नाल्या आदी विकास कामाच्या बांधकामासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीचा जनतेच्या सुविधेसाठी उपयोग करून दर्जेदार करून घेणे आणि शासनाचा निधी सदुपयोगी आणणे पदावर बसलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांचे अद्य कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी पदाधिकारी आपल्या कर्तव्य कसून करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत असल्याचा प्रकार नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहारात सुरु असलेल्या बोरगडी रोडसह इतर कामावरून पुढे आला आहे. याबाबत हिमायतनगर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री उदय प्रभाकर देशपांडे यांनी यामध्ये होत असलेली अनियमितता आणि अंदाजपत्रक व शासन नियमन डावलून केल्या जात असलेल्या कंत्राट बहाल करण्याच्या विरोधात एड. जगदीश हाके यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडे दि.१५ जून २०१९ रोजी याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेमध्ये तक्रारदाराने म्हंटले आहे कि, हिमायतनगर शहरातील विविध विकास कामासाठी काढण्यात आलेल्या दि.०७ मार्च २०१९ मधील ई - निविदा सूचना क्रमांक १८ दि..२६/०२/२०१९ हिमायतनगर नगरपंचायत विशेष सभा ठराव क्रमांक ०१ दि.०५ मार्च २०१९ अन्वये हिमायतनगर येथील मुसेब अहेमद अब्दुल रब या कंत्राटदारास कार्यारंभ देण्यात आला आहे. परंत्तू सदर कंत्राट दिलेल्या व्यक्तीस कोणताही अनुभव अथवा परवाना नसताना केवळ उपनगराध्यक्षाच्या शिफारशीवरून शासकीय नियमन बगल देऊन शासनाची दिशाभूल करून वैयक्तिक लाभ करण्याच्या दृष्टिकोनातून नगरपंचायतीचे करोडो रुपयांचे कंत्राट देऊन आर्थिक भ्रष्टाचार केला आहे. एव्हडेच नव्हे तर सदर निविदा विशेष सभेपूर्वी उघडून कंत्राट देण्यामध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप श्री देशपांडे यांनी केला आहे.

महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती, औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४४ अन्वये जर एखाद्या नगरसेवकाने किंवा नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्याने आपल्या पदावर निवडून आल्यानंतर पदाचा दुरुपयोग करून आर्थिक हित जोपासण्याचा प्रयत्न केला तर नगरपंचायतीच्या आर्थिक बाबीमध्ये बेकायदेशीरपणे हस्तक्षेप करून प्रत्यक्ष पणे स्वहित जोपासण्याचा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाल्यास आपल्या पदाचा दुरुपयोग करून आपल्या कुटूंबातील सदस्यास बेकायदेशीरपणे नगरपंचायतीचे कंत्राट दिल्यास त्यांना कलम ४४ अन्वये त्या नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द करण्याची तरतूद आहे. त्यामुळे उपरोक्त कलमान्वये त्यांना नगरसेवक आणि उपनगरध्यक्ष या पदावर राहण्याचा अधिकार उरलेल नाही. म्हणून त्यांना उपरोक्त कलमान्वये त्यांच्या पदावरून तात्काळ अनर्ह घोषित करणे न्यायावह होईल असेही जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हंटल आहे. त्यासोबत पुरावे म्हणून अंदाजपत्रक, कामाच्या ठिकाणचे छायाचित्र, यापूर्वी वर्तमान पात्रात आलेल्या बोगस पद्धतीने केले जात असलेल्या कामाच्या बातम्या आणि इतर पुरावे जोडलेले आहेत.    

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी