शहरातील शासकीय कार्यालयात दिले निवेदन
मुखेड (ज्ञानेश्वर डोईजड) नुकत्याच पार पडलेल्या ठाण्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी बाजारपेठेतील दुकानांवर मराठी पाट्या व स्थानिक बँकेत होत असलेली मराठी भाषेची गळचेपी यावर खंत व्यक्त केली. याच पर्शवभूमीवर महाराष्ट्रत महाराष्ट्र सैनिकांनी दंड थोपटले. मुंबई, ठाणे, नाशिक,पुणे, धुळे, सातारा पाठोपाठ आज नांदेड मुखेड मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी बाजारपेठेतील दुकानाना तसेच शाळा , महाविद्यालये, चित्रपटगृहावरी तसेच उपहारगृह व वाणिज्य संस्था यावरील पाट्या
मराठी असाव्या यासाठी तहसीलदार अतुल जटाळे व पोलीस स्टेशन, पंचायत समिती , बँक अशा शासकीय कार्यालामध्ये मनसेने आज दि २४ नोव्हेंबर रोजी निवेदन दिले
त्या निवेदनात मराठी ही महाराष्ट्रची राजभाषा असताना दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेला डावलून इतर भाषेचा सर्रास वापर होताना दिसत आहे. यामुळे मराठीची भाषेची गळचेपी होत असताना दिसून येते. याच विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खळखट्याक ची भाषा करताच, आज मुखेड मध्ये मनसे सैनिकांनी तहसीलदार, पोलीस निरीक्षक, सर्वबँक मँनेजरला निवेदन दिलें, यात येत्या आठ दिवसात सर्व पाट्या मराठीत न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही यावेळी देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संतोष बनसोडे , शहराध्यक्ष सुनिल मुकावार, संघटक गणेश भिसे पाटील, गवते पाटील, शंकर पिटलेवार, मंगले यांच्यासह सह अनेक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.