५० लाखांपेक्षा अधिकची फसवणूक प्रकरणात बंटीला तीनदिवस पोलीस कोठडी आणि बबलीला जामीन

नांदेड (रामप्रसाद खंडेलवाल) विज वितरण कंपनीमध्ये नौकरी लावण्यासाठी 14 जणांकडून 50 लाखापेक्षा अधिकची रक्कम उखळणाऱ्या नाशिक येथील एकाला नांदेडच्या 6 व्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन एल गायकवाड यांनी 27 नोव्हेंबर 2017 पर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे.

नांदेडच्या श्रीनगर भागात राहणाऱ्या दिगंबर माधवराव पांचाळ यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात 9
ऑगस्ट 2017 रोजी तक्रार दिली की, नाशीक येथील नव्वलचंद मदनलाल जैन (55) आणि त्यांची पत्नी आशा यांच्याकडे विज वितरण कंपनीमध्ये 20 लोकांना भरतीकरण्याचा कोटा मिळालेला आहे आणि त्यात शिपाई ते अभियंता अशा पदांच्या भरती करावयाच्या आहेत त्यानुसार 1 लाख ते 8 लाख असा वेगवेगळ्या पदांचा दर होता. नांदेड मधिल अनेकांनी आपल्या मुंलाना नौकरी लागावी म्हणून दिगंबर पांचाळच्यावतीने नवलचंद जैन यांना 50 लाखापेक्षा जास्त रक्कम दिली.

नौकरीचा कॉल येत नाही हे पहाता या लोकांनी नवलचंद जैन कडे आपल्या पैशांचा तगादा लावला. त्यानंसार नवलचंद जैन ने काही जणांना  धनादेश दिले. ते धनादेश वटले नाही आणि त्यानंतर दिगंबर पांचाळने भाग्यनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. भाग्यनगर सहाय्यक पोलिस निरिक्षक आर जी. सांगळे आणि पोलिस पथक नवलचंद जेैनला शोधण्यासाठी दोनदा नाशीकला जावून आले पण नवलचंद जैन भेटला नाही. नवलचंद जैन आणि त्याच्या पत्नीच्या वतीने नांदेड जिल्हा न्यायालयात आणि उच्च न्यायालयात अटकपुर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला. जिल्हा न्यायालयाने तो रद्द केला आणि उच्च न्यायालयाने नवलचंद जैनला पोलिसासमक्ष हजर होण्याचे आदेश केले त्यानंतर पत्नीच्या अटकपुर्व जामीन अर्जावर विचार होईल असे सांगीतले. त्यानुसार नवलचंद जैन काल दि. 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी भाग्यनगर पोलिस ठाण्यात हजर झाले आणि त्यांना अटक झाली.

आज दि.24 नोव्हेंबर रोजी सहायक पोलीस निरीक्षक आर.जी.सांगळे आणि पोलीस कर्मचारी बालाजी सातपूते यांनी नवलचंद जैनला न्यायालयात हजर केेले. न्यायालयात पोलीस कोठडी मिळण्यासाठी पोलिसांनी युक्तीवाद मांडला. त्यावर नवलचंद जैनच्या वतीने बाजू मांडतांना पोलीस कोठडी न देण्यासाठी भरपूर मुद्दे मांडले गेले. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश गायकवाड यांनी 14 जणांची 50 लाखांपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक करणाऱ्या नवलचंद जैनला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. प्राप्त माहितीनुसार नवलचंद जैन नांदेडच्या भाग्यनगर पोलिसासमक्ष हजर झाल्यानंतर आज उच्च न्यायालयाने त्याची पत्नी आशा जैनला अटकपूर्व जामीन दिला आहे. एकंदरीत बंटी-बबलीमधील बंटीला पोलीस कोठडी आणि बबलीला जामीन मिळाला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी