परसराम तांड्यावरील आपद्‌ग्रस्तांना उबदार साहित्यांचे वाटप

नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) लोहा तालुक्यातील उमरा ग्रामपंचायत अंतर्गत ग्रूप ग्रामपंचायत वार्डमध्ये सहभागी असलेल्या परसराम तांडा येथे 13 नोव्हेंबर रोजी लागलेल्या आकस्मिक आगीत सहा कुटुंबियांचे अतोनात नुकसान झाले होते. 


शिराढोण तांडा येथे कार्यरत असलेले वनश्री पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवाजी कपाळे यांनी स्वखर्चाने आपद्‌ग्रस्त कुटुंबियांना थंडीपासून सुरक्षा मिळावी, यासाठी सोलापुरी चादर व उबदार रग शुक्रवारी (दि. 24 रोजी) देऊन तातडीने सहकार्य केले. यावेळी उमराचे सरपंच ब्रह्मानंद सिरसाठ, शिक्षक एम.डी. सिरसाठ, चंदर राठोड, रावसाहेब पवार, बालाजी यलगंधलवार, शंकर सिरसाठ आदींची उपस्थिती होती. भोजा राठोड, पांडुरंग राठोड, भगवान राठोड, सोनाजी राठोड, अशोक राठोड आणि कमळबाई बाबाराव राठोड या आपद्‌ग्रस्त कुटुंबाला या अभिनव भेटीने सुखद दिलासा मिळाला. कपाळे यांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी