खोटे कागदपत्र बनवण्याच्या आरोपातील महिला वकिलाला

मिळाला अंतरिम अटकपूर्व जामीन 

नांदेड (एनएनएल) न्यायालयातील खटल्यांदरम्यान बनावट व खोटे कागदपत्र तयार करुन एका गुन्हेगाराची जामीन दिल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश गिरीश गुरव यांनी एका महिला वकीलाला अंतरित अटकपूर्व जामीन दिला आहे.

न्यायालयातील सहायक अधीक्षक प्रल्हाद किशनराव सोनटक्के यांनी 2 ऑगस्ट 2017 रोजी पोलीस ठाणे वजिराबाद येथे तक्रार दिली होती की, प्रथमवर्ग
न्यायदंडाधिकाऱ्यानी त्याच्यासमक्ष सुरु असलेला नियमित फौजदारी खटला क्र.85/1997 ची सुनावणी सुरु असताना त्या प्रकरणातील आरोपी गोरखसिंग रसाळसिंग जुन्नी रा.पुणे हा खटल्यात हजर राहत नाही म्हणून जामीनदाराला पकडून आणण्यासाठी अटक वारंट जारी केले. हा खटला भारतीय दंड विधानाच्या कलम 498 (अ) आणि 34 नुसार होता.म्हणजेच त्या गोरखसिंगच्या बायकोने दिलेली ती तक्रार होती.खरा प्रकार सन 1997 पासून   गोरख सिंगने 2007 जामीन दिला होता.त्यावेळी मार्कंड येथील शंकर व्यंकटराव बोकारे या माणसाला पकडून पोलिसांनी न्यायालयात आणले. त्याच्याच नावच्या कागदपत्रांवर आरोपी जुन्नीची जामीन देण्यात आली होती. त्यावेळी शंकर बोकारेने न्यायालयात सांगितले की, मी कोणत्याच प्रकारची जामीन घेतलेली नाही गोरखसिंग जुन्नीला ओळखत पण नाही तेंव्हा या कागदपत्रांची तपासणी केली असता हे कागदपत्र महिला वकील ऍड.पी.एच.रतन यांनी तयार केले होते. त्यानुसार ऍड.पी.एच.रतन या प्रकरणातील आरोपी गोरखसिंग जुन्नी आणि अनोळखी माणूस यांच्या नावे न्यायालयाचे सहायक अधीक्षक प्रल्हाद सोनटक्के यांनी तक्रार दिली. वजिराबाद पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्र.299/2017 कलम 419,468, 471 आणि 34 भारतीय दंड विधान यानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील महिला वकील ऍड.पी.एच.रतन यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मागितला. त्यावर ऍड.आर.जी.परळकर आणि ऍड. सराफ यांनी बाजू मांडून अंतरित अटकपूर्व जामीन मागितला. त्यावर न्यायाधीश गिरीश गुरव यांनी अंतरित अटकपूर्व जामीनची मागणी सध्या मान्य केली आहे. या जमीन अर्जाची पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी