NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

बुधवार, 9 अगस्त 2017

नगरपंचायत कर्मचार्‍यांचे मागण्यांसाठी एक दिवसाचे सामुहिक रजा आंदोलन

हिमायतनगर (एनएनएल) महाराष्ट्र राज्य नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, कामगार संघटना संघर्ष समितीच्या कर्मचारी कामगारांनी दि.9 आॅगस्ट रोजी शहरातील नगरपंचायत कार्यालयासमोर एक दिवसाचे सामुहिक रजा आंदोलन केले. 

कार्यरत कर्मचारी कामगार यांना शंभर टक्के वेतन शासनातर्फे द्या, चोविस वर्षे अश्वासीत योजना लागू करा, राज्य कर्मचाऱ्यांसोबत सातवा वेतन आयोग लागू करा, ग्राम पंचायत मधील सर्व कर्मचाऱ्यांचे नगरपंचायतीमध्ये समावेश करा व निवृत्ती वेतन लागू करा, रोजंदारी /कंञाटी कर्मचाऱ्यांना कायम करणे या सह आदी मागण्यां असून त्या मागण्यांसाठी आंदोलनाची सुरुवात दि. 9 आॅगस्ट रोजी एक दिवसाचे सामुहिक रजा आंदोलन करून झाली. तसेच दि.10 आॅगस्ट ते 14 आॅगस्ट पर्यंत काळ्या फिती लावून काम करणे, 15 आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणानतंर जिल्हास्तर, तालुका स्तरावर पालकमंञी, खासदार, आमदार यांना मागण्यांचे निवेदन देणे, सदरील मागण्यांबाबत विचार नाही झाल्यास, दि 10 आॅगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बुधवारी हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयासमोर झालेल्या एक दिवसीय सामुहिक रजा आंदोलनात मुख्याधिकारी नितीन बागूल, भोगावार रूख्माजी भुमना, बालाजी माळसापूरे, दळवी, रत्नाकर डावरे, महेमुद भाई, विठ्ठल शिंदे, बाळू हरडपकर, मारोती हेंदरे, श्याम मंडोजवार, शेख मोजमिल, दत्ता डुडुळे, यांच्यासह कर्मचारी, कामगार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. नगरपंचायत कर्मचारी कामगार यांच्या सामुहिक रजा आंदोलनास नगराध्यक्ष अ.अखिल अ. हमीद, आणि काँग्रेसचे नगरसेवक यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

कोई टिप्पणी नहीं: