परिसर स्वछ ठेवून आरोग्याची काळजी घ्या -काकडे

नांदेड (एनएनएल) परिसर स्वछ ठेवून नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन जि. प.सदस्य गंगाप्रसाद काकडे यांनी केले. 

बळीरामपुर येथे आरोग्य सदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते,यावेळी सरपंच अमोल गोडबोले,माजी सरपंच नागोराव आंबटवार,गणपत चिंतेवार, इंद्रजीत पांचाळ,माजी उपसरपंच किशन गव्हाणे,शिवराज दासरवार,ग्राम विकासाधिकारी एच .वाडेकर ,तुप्पा आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी
बी.आर.राठोड, आर.आर.सूर्यवंशी,एन. एस. रणखाब,एन. एम.रामतीर्थे,एस. के भद्रे,अतुल बनसोडे, खाजशेठ बाडीवले, बंटी गुडले,बलमा मस्केआदींची उपस्थिती होती. बळीरामपुर येथे डेंग्यू संशयीत रुग्ण आढळला होता,त्या अनुषंगाने आरोग्य अधिकारी,आरोग्य विभागातील कर्मचारी, अशावर्कर यांची बैठक घेऊन कर्मचाऱ्यांनी गावात डेंग्यू, मलेरिया,स्वाईनफ्लिव आदी रोग होऊ नये या बाबद जनजागृती करावी,स्वछतेचे महत्व पटवून द्यावे,हिव ताप रुग्ण आढळल्यास त्याची रक्त नमुने घेऊन त्याच्यावर योग्य उपचारासाठी समुपदेशन करावे अशा सूचना आरोग्य कर्मचाऱ्यांना करून गावातील नागरिकांनी आपल्या घर शेजारचा परिसर स्वछ ठेऊन आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन जि. प.सदस्य गंगाप्रसाद काकडे यांनी केले.

मोकाट जनावराचा बंदोबस्त  करा
गावातील अस्वचे ते मूळे आजाराचे प्रमाण अधिक आहे. गली बोळातील तुंबलेल्या नाल्या व गावातील मोकाट स्वानं यांचा बंदोबस्त केल्यास रोगांचे प्रमाण कमी होऊ शकते त्यामुळे ग्रामपंचयतींनी स्वचेतेवर भर दयावा अशा सूचनाहि काकडे यांनी  ग्रामपंचायतीला दिल्या.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी