जागतिक आदिवासी दिनानिमित्त जल शुद्धीकरण सयंत्राचे उदघाटन

कंधार (मयुर कांबळे) तालुक्यातील बहाद्दरपुरा येथील आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त उल्हास मेमोरियल ट्रस्ट संचालित सद्गुरू आदिवासी आश्रम शाळा येथे जल शुद्धीकरण संयंत्राचे उदघाटन जि.प सदस्या सौ.संध्याताई धोंडगे व माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी समाजाचे सुधारक बिरसामुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले. यावेळी माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे, संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रेय कुरुडे, शालेय समिती अध्यक्षा,माजी जि.प.सादस्या संजीवनीताई कुरुडे, संस्थेचे सचिव शिवाजीराव परळकर आदींची उपस्थिती होती.यावेळी माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की आजचा दिवस संपुर्ण महाराष्ट्रात क्रांती दिन म्हणून पळाला जातो त्याच दिनाचे औचित्य साधुन आम्ही कंधार, देगलूर व अन्य ठिकाणी आदिवासी भागातील लोकांना शिक्षण मिळण्यासाठी शाळा उभारल्या आहेत आमचा या मागचा उद्देश हाच की जेणेकरून प्रत्येक आदिवासी विद्यार्थी शिकला पाहिजे व समाजाला पूढे नेऊन शिक्षण दिले पाहिजे त्याच बरोबर असप्रष्य लोकांना शिक्षण मिळावे हाच आमचा उद्देश आहे जर स्वतंत्र देशातील शिकलेले लोक असतील तरच देशाची प्रगती व उन्नती होते आम्ही 1949 रोजी संस्थेची स्थापणा केली आहे.

श्रीमंतांच्या लोकांना शिक्षण मिळत परंतु गोर गरीब जनतेला शिक्षण मिळत नाही त्या करिता आम्ही संस्थेची स्थापना केली आहे. आम्ही आदिवासी लोकांसाठी खुप कामे केली आहेत. वैधु समाज बांधवांसाठी कॉलनी बांधुन दिली आहे. त्याच बरोबर देगलूर येथे सारकर कडून जमिनीची मागणी करून आम्ही घरे बांधून दिली आहेत सरकारचे जे काही बजेट आहे. शंभर टक्के त्यापैकी एक टक्का बजेट हे आदिवासी समजाकरिता आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून खुप अधिकार हे आदिवासी, दलित, पिढीत, शोषितांच्या न्यायहक्का करिता दिले आहेत. परंतु काही मोजकेच आदिवासीलोक त्याचा उपयोग घेतात. आम्ही आमच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या कपड्या पासून त्यांना लागणाऱ्या जीवन आवश्यक वस्तु आमच्या संस्थेमार्फत देतोत त्याच बरोबर श्रीमंत लोकांना फिल्टर चे पाणी पिण्यासाठी मिळते परंतु गरीब लोकांना मिळत नाही त्याकरिता आजच्या दिनाचे औचित्य साधुन आम्ही शाळेत जल शुद्धीकरण सयंत्र बसवले आहे असे ते म्हणाले यावेळी जि.प.सदस्या सौ.संध्याताई धोंडगे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमास उपस्थित बहाद्दरपुराचे सरपंच माधवराव पेठकर, उपसरपंच उत्तमराव भांगे,ग्राम पंचायत सदस्य बालाजी तोटवाड, गुरुनाथ पेठकर, दत्तात्रेय येमेकर, शाळेचे मुख्याध्यापक विशाल टेकाळे, जी.डी. जाधव शिक्षक जे.एस.खरात,प्रा.गुंडरे,बैलके सर, के.एम. शेख, प्रदिप इंदूरकर, बळीराम पेठकर, गरूडकर सर, नितीन टेकाळे, श्रीनिवार सर, सौ.दिनकर मॅडम, सौ.आडे मॅडम, राऊत मॅडम, आदी शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देशमुख मॅडम यांनी केले तर प्रस्ताविक जे.एस.खरात व आभार गरूडकर एस.एस यांनी मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी