संतबाबा जोगिंदरसिंघजी मोनी सिलाई केंद्राची इमारत बांधण्याची मागणी

नांदेड (एनएनएल) संतबाबा जोगिंदरसिंघजी मोनी सिलाई केंद्राची इमारत अत्याधुनिक स्वरूपात बांधण्यात यावी, अशी मागणी संतबाबा जोगिंदरसिंघजी मोनी आणि कमला संधूसिंघजी ट्रस्ट, गुरू तेग बहाद्दर सेवक जत्था, मोनी बाबा हॉस्पिटल आणि पत्रकार रवींद्रसिंघ मोदी यांनी गुरूद्वारा बोर्डाच्या व्यवस्थापन समिती चेअरमन तथा उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्याकडे केली आहे.

गुरूद्वारा परिसरात असलेली आणि संतबाबा जोगिंदरसिंघजी मोनी यांनी निर्माण केलेली सिलाई केंद्राची इमारत सध्या कमकुवत झाली असून या ठिकाणी असलेले सिलाई केंद्र अन्यत्र हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा या परिसरात होत आहे. बाबाजींनी स्थापन केलेली ही वास्तू हलविण्यास शीख समाजाकडून विरोध असून या इमारतीच्या निर्माणासाठी सन 2013 साली गुरू तेग बहाद्दर सेवक जत्था या संस्थेनी 51 लाख रूपये दान दिले होते. सदर दानातून मोठी वास्तू उभी राहू शकते. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी वास्तूचे निर्माण करावे, अशी मागणी गुरू तेग बहाद्दर सेवक जत्थाचे सुरजितसिंघ खालसा, प्रितमसिंघ बाटला, जसबिरसिंघ चड्डा, हरनामसिंघ मलहोत्रा, मोनी बाबा हॉस्पिटलचे डॉ. हरदीपसिंघ, संतबाबा जोगिंदरसिंघजी मोनी आणि कमला संधूसिंघजी ट्रस्ट व पत्रकार रवींद्रसिंघ मोदी यांनी केली आहे. गुरूद्वारा बोर्डाच्या व्यवस्थापन समितीची बैठक श्री गुरू अंगददेवजी यात्रीनिवास येथे बुधवारी सकाळी 11 वाजता घेण्यात आली. प्रारंभीच उपरोक्त चार सामाजिक संघटनांनी चेअरमन श्रीमती अनुराधा ढालकरी यांना निवेदन सादर केले. यावेळी व्यवस्थापन समितीचे सदस्य नौनिहालसिंघ जागीरदार, रवींद्रसिंघ बुंगई, गुलाबसिंघ कंधारवाले, गुरूद्वारा बोर्डाचे अधीक्षक ठाणसिंघ बुंगई यांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी