करणारी युवती पोलीस कोठडीत

नांदेड (एनएनएल)डॉ.रोशन आरा तडवी यांच्या घरी 30 तोळे सोन्याची चोरी करणाऱ्या 19 वर्षीय युवतीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आदिती नागोरी यांनी 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

वैद्यकीय अधिकारी डॉ.रोशन आरा रोशखान तडवी आणि त्यांचे पती डॉ. रोशखान तडवी हे दोघेही वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांच्या घरी मुलांची
देखभाल करण्यासाठी नाजेमा शेख महेबूब शेख (19) या युवतीला कामगार म्हणून नौकरी दिली. या युवतीने जानेवारी महिन्यात आणि जून महिन्यात दोनवेळेस डॉ.रोशन आरा यांच्या घरातील दागिण्यांची चोरी केली, असा आरोप या युवतीवर आहे. डॉ.रोशन आरा यांच्या घरातून 30 तोळे सोन्याचे दागिणे किंमत दोन लाख सहा हजार 407 रुपये (आज दर तोळे सोन्याचा भाव बाजारात 28 हजार रुपये आहे) असा ऐवज चोरला आहे. सहायक पोलीस निरीक्षक आर.जी.सांगळे यांनी आज नाजेमा शेख महेबुब शेखला न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ऍड. संजय देशमुख यांनी चोरी केलेल्या साहित्याची जप्ती करणे आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला. त्यानुसार न्यायाधीश आदिती नागोरी यांनी नाजेमा शेखला 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी