एका चोरट्याला पोलीस कोठडी

नांदेड (एनएनएल) बहिण-भावाच्या मोटारसायकलला खाली पाडून  बहिणीच्या हातातील पाच हजार पाचशे रुपये रक्कम असलेली बॅग व 11 हजार रुपयांचा मोबाईल चोरल्या प्रकरणात पोलिसांनी तिघांसह दोन अल्पवयीन बालकांना न्यायालयात हजर केले होते. त्यातील एकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आदिती नागोरी यांनी 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

दि.14 जुलै 2017 रोजी अब्दुल हक अब्दुल कादर हा युवक आपल्या बहिणीला मोटारसायकलवर जात असताना शोभानगर भागात त्या मोटारसायकलला कट मारुन तीन अनोळखी लोकांनी त्यांना खाली पाडले आणि बहिणीच्या हातातील बॅग हिसकावून नेली. त्यात पाच हजार पाचशे रुपये रोख रक्कम व 11 हजार रुपये किंमतीचा मोबाईल होता. पोलीस उपनिरीक्षक शेख जावेद यांनी मोबाईलच्या सीडीआरनुसार मोबाईल वापरणारा पकडला  त्यानंतर लिंक लागली आणि एकूण पाच जणांना पोलिसांनी पकडले. त्यातील दोन अल्पवयीन बालक आहेत. आज पोलिसांनी पाच जणांना ज्यात दोन अल्पवयीन बालक आहेत. न्यायालयासमक्ष हजर केले त्यातील साईनाथ माधव गजरवाडसाठी पोलीस कोठडीची मागणी केली ती न्यायाधीश आदिती नागोरी यांनी मंजूर करुन साईनाथ गजरवाडला 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी