दोन चारचाकी गाड्यांच्या धडकेत तीन जण ठार दोघे गंभीर जखमी

बिलोली (शिवराज भायनुरे) बिलोली पासून 1 कि.मी.अंतरावरील साई मंदिर जवळ हैदराबादहुन स्कोडा व बिलोलीहून हैद्राबादकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओची समोरासमोर टक्कर होऊन तिघे ठार झाले तर दोघे गंभीर व दोघे किरकोळ जखमी झाले. मृतात सिमेंटचे व्यापारी जांगीड व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गुरुपवार यांचा समावेश आहे. हा अपघात आज पहाटे साडेपाचच्या सुमारास झाला.

सविस्तर वृत्त असे की, दि.22 जुलै रोजी नांदेड येथील ओरियंटल
सिमेंटचे डिलर कंपनीकडून सिंगापूर टूर आटोपून हैद्राबाद मार्ग नांदेडला इस्कोडा कार क्र. एम. एच.26 बिसी 8000 ने परतत असताना बिलोली जवळील साई मंदिर जवळ बिलोलीहून  मित्राच्या ट्रिटमेंटसाठी हैद्राबादला स्कार्पिओ जीप क्र. एम. एच.26 ए. के. 0180 या दोन गाड्‌यामध्ये 22 जुलैच्या पहाटे साडे पाच ते पावणे सहाच्या दरम्यान समोरा- समोर जबरदस्त धडक झाली. यात इस्कोडा मधील सिमेंट व्यापारी रवींद्र गुरुपवार (37) रा. विजयनगर नांदेड, उमेश जागींड  (38) रा. बाबानगर नांदेड हे दोघे बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात येताच मृत्यू पावले तर स्कार्पिओ मधील तालुक्यातील येसगीचे भगवान पिराजी प्रचंड जागीच ठार झाला. स्कोडा मधील इतर दोघीपैकी राजपाल ठक्कर, सुदर्शन सर्जेराव पाटील दोघेही रा. नांदेड व स्कार्पिओ मधील स्नेहदीप उर्फ मुन्ना पोवाडे व ज्ञानेश्र्वर गुडमे हे जखमी झाल्यामुळे पुढील उपचारासाठी नांदेडला पाठवले. जखमीमधील सुदर्शन पाटील व ज्ञानेश्र्वर गुडमे यांची प्रकृती  गंभीर असल्याचे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.  घटनास्थळी तात्काळ धाव घेवून वल्लियोद्दीन फारुकी यांचे सहकारी प्रशांत अंकुशकर, संदीप कटारे, साजीद कुरेशी, अर्जुन पवार, मसूद देसाई यांनी जखमींना बिलोलीच्या रुग्णालयात आणले. मिळालेल्या माहितीनुसार जांगीड व गुरुपवार हे मध्यरात्री हैद्राबाद विमानतळावर उतरले आणि तेथून ते नांदेडकडे आपल्या गाडीत रवाना झाले होते. मात्र नांदेडला येण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. कदाचित हा अपघात चालकाच्या पहाटेच्या निद्रेमुळे झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी