नांदेड| तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात भिक्खू भिक्खूनी संघाच्या वतीने महिला श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरमहा पौर्णिमेचे औचित्य साधून दसदिवशीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येते. बुद्ध पौर्णिमेनिमित्त महिलांचे हे शिबिर १२ मे २०२२ पासून सुरुवात होणार असून पुढे ते दहा दिवस चालेल अशी माहिती येथील अखिल भारतीय बौद्ध भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा प्रशिक्षण केंद्राचे संचालक धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली.
ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथे बुद्ध जयंतीच्या पावन पर्वावर महिला श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर दि. १२ मे ते २२ मे २०२२ या कालावधीत महिला उपासकांकरिता हे शिबिर होणार आहे.
तरी श्रामणेर होऊ इच्छिणाऱ्या महिला उपासकांनी आपली नाव नोंदणी दिनांक १० मे २०२२ पर्यंत भिक्खुनी वंदना मो.नं. 9588672709, सोनु मो.नं 9421765377, भदंत पंय्याबोधी थेरो, मो.नं. 8308887988, भंते श्रध्दानंद, मो.नं. 9579209752, साहेबराव इंगोले मो.नं. 9518743507 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.