किनवट, माधव सूर्यवंशी| भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त तालुक्यातील मौजे मलकवाडी येथे घर घर तिरंगा अभियाना बरोबरच युवा नेते बालाजी बामणे यांच्या पुढाकारातून स्वातंत्र्याची 75 वर्ष,75 वृक्षारोपण असा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमातून गावकऱ्यांनी राष्ट्रभक्तीबरोबरच पर्यावरण जतनाचा संदेश दिला आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव किनवट तालुक्यात खेडोपाडी विविध उपक्रमांनी व उत्साहात साजरा होत आहे. तालुक्यातील मौजे मलकवाडी येथेही घरघर तिरंगा अभियाना बरोबरच स्वातंत्र्याची 75 वर्ष, 75 वृक्ष' अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँगेसचे नेते बालाजी बामणे यांच्या पुढाकारातून गावकऱ्यांनी आज सकाळी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर संपूर्ण गावात ठिकठिकाणी व वेगवेगळ्या जातीची एकूण 75 वृक्षलागवड करून राष्ट्रभक्ती बरोबरच पर्यावरण वृद्धीचा संदेश दिला आहे. विशेष म्हणजे एक व्यक्ती एक वृक्ष याप्रमाणे वृक्षारोपण केल्यानंतर तारकुंपण करून प्रत्येकाला वृक्षांच्या संगोपनाची जबाबदार देण्यात आली आहे.
देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याबरोबरच मानवी जीवनासाठी वनसंपदा अबाधित ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येक राष्ट्रीय सणानिमित्त देशभक्तीसह पर्यावरण जागृतीचे कार्यक्रम व्यापक स्वरूपात आयोजित होणे गरजेचे असल्याचे मत युवानेते बालाजी बालाजी बामणे यांनी यावेळी व्यक्त केले. या प्रसंगी सरपंच गोविंद धुर्वे, उपसरपंच अजय बाबुळकर,ग्रामसेवक वाघमारे मॅडम, वनपाल कांबळे, ग्रा प सदस्य सूर्यभान कुडमते, सुजित करोडकर, किशन कनाके, गजानन टेळके, विठ्ठल सूर्यवंशी, लक्ष्मण गिरी, बालाजी सूर्यवंशी, श्याम राठोड, पंडित राठोड, पमा बाबुळकर शिवाजी मेश्राम, अविनाश आडे, गणेश सूर्यवंशी, नागनाथ भंडे, बाबुराव मायकोडे, नागु पोयाम, बबनराव फुलेवाड, संदीप कुडमते, ओंकार भुसारे, अशोक कनाके, संतोष गायकवाड, ओम सूर्यवंशी, ओम करोडकर,अंकुश कुडमते यांच्यासह ज्येष्ठ नागरीक व विध्यार्थी उपस्थित होते.