NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

मंगलवार, 31 मई 2016

पांदन रस्ता झाला मोकळा..

अखेर पोलिस बंदोबस्तात अतिक्रमित पांदन रस्ता झाला मोकळा..शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाची अडचण झाली दूर
हिमायतनगर(अनिल मादसवार) अनादीकालापासून चालू असलेल्या हिमायतनगर - सरसम बु. पांदन रस्तावर एका भूमाफियांनी रात्रीतून ट्रेक्टरचा नांगर फिरविला होता. याची कुणकुण लागताच  परिसरातील शेतकर्यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही प्रकरण निकाली निघत नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी सुरेश काकांनी यांची भेट घेतल्यानंतर अखेर स्थळ पंचनामा करून दि. ३१ मे रोजी पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने रस्ता मोकळा करण्यात आल्याने शेतकऱ्याच्या खरीप हंगामाचा तिढा सुटला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, गेल्या काही वर्षापासून तहसील कार्यालय परिसर व राज्य रस्त्यावरील भूखंडाला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे काही भूमाफिया सक्रिय झाले असून, ज्या ठिकाणी अतिक्रमण करत येईल अश्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. असाच काहींसा प्रकार नांदेड - किनवट रस्त्यावरील जलसंपदा विभाग वसाहत व कार्यालयाच्या पाठीमागे झाला. येथून निघणार्या हिमायतनगर - सरसम पांदन रस्त्यावर एका भूमाफियाने गेल्या १० दिवसापूर्वी अचानक रात्रीला नांगर फिरविला होता. हि बाब परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने सर्वांच्या वतीने शंकर वानखेडे, विठ्ठल हरडफकर, श्रीनिवास मारुड्वार, माधव पाळजकर, रामराव हरडफकर, राहुल मोतेवार, प्रशांत मारुडवार यांच्यासह अनेकांनी रीतशीर तक्रार तहसीलदार यांच्याकडे देऊन अतिक्रमन काढण्याची मागणी केली होती. रस्ता नांगरल्याने या भागातील अनेक शेतकऱ्याच्या खरीप हंगामच्या पेरणीपूर्व मशागतीच्या तयारीची कामे खोळंबली. अगोदरच गेल्या तीन वर्षापासून होत असलेली सततची नापिकी आणि आता शेतीकडे जाणार्या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे या भागातील शेतकरी अडचणीत आले होते. 

तक्रार देऊनही भूमाफियांनी बनावट रजिस्ट्री अन्य कागदपत्रे दाखून या जागेवर आपला दावा असल्याचे सांगत प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. जवळ येत असलेला खरीप हंगाम आणि वाद वाढत जाउन हंगाम अडचणीत येणार असल्याचे लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या  शिष्टमंडळाने हक्काच्या पांदन रस्त्यासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकांनी यांची भेट घेतली होती. त्यामुळे गेल्या दि. २७ शुक्रवारी तहसीलदार गजानन शिंदे यांनी जायमोक्यावर जाउन स्थळ पंचनामा केला यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते व शेतकर्यांनी पांदन रस्ता मोकळा करून देण्याची मागणीचे निवेदनाद्वारे केली होती. याची दाखल घेत गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे आदेश तहसीलदार यांनी काढले. दरम्यान कोणताही वाद निर्माण होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त मागविला होता. त्यानुसार आज दि. ३१ मे रोजी उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांच्या उपस्थितीत जवळपास दोन पोलिस उपनिरीक्षक व ६० ते ७० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. आणि भूमिअभिलेख प्रशासनाच्या वतीने मार्क आउट करून दिल्यानंतर तीन जेसीबी मशिन द्वारे जुना सर्वे क्रमांक ३२६ मधील ३३ फुट रुंदीचा पांदन रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाल्या काढून मोकळा करण्यात आला आहे. सदर रस्ता हा नांदेड - किनवट रस्त्यापासून निघून थेट हिमायतनगर शहरातील खडकी रस्त्याला जाउन मिळतो. हा रस्ता मोकळा करून देण्यासाठी महसूल, पोलिस, भूमिअभिलेख प्रशासनाने शेतकऱ्यांची प्रमुख समस्या निकाली काढल्यामुळे खरीप हंगामातील मोठी अडचण दूर झाली आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे भूमाफियाचे मनसुबे उधळले असून, अश्याच शहर व परिसरात अनेक ठिकाणी भूमाफियाकडून रस्ते, तथा शासकीय जमिनीवर डोळा ठेवून अतिक्रमण केले जात आहे. या प्रकारच्या विरोधात प्रशासनाने विशेष मोहीम राबवावी अशी रास्त मागणी शेतकरी, नागरिक करीत आहेत.

अतिक्रमित भूमाफिया मोकाटच...

आजच्या पांदन रस्त्यावरील अतिक्रमण दूर करण्यात आले असले तरी अतिक्रमण करणाऱ्या भूमाफियावर प्रशासनाने सध्या तरी कोणतीही कार्यवाही केली नसल्याने. भूमाफिया व त्यांना  सहकार्य करणाऱ्या भूमिअभिलेख, महसूल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी अद्याप मोकाटचा असून, भूमाफियासह त्यांना सहकार्य करणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यावर जिल्हाधिकारी यांनी कठोर कार्यवाही करावी अशी मागणी सुजान नागरीकातून केली जात आहे. 

सोमवार, 30 मई 2016

दोन महिला गजाआड

६ हजार आणि फक्त १२० रुपयांची लाच
स्वीकारणाऱ्या दोन महिला गजाआड 


हिमायतनगर(अनिल मादसवार)उमरी तालुक्यातील एक ग्रामसेविका आणि हिमायतनगर येथील तहसील कार्यालयाच्या अभिलेख विभागातील एक महिला लिपिक अश्या दोन महिला सरकारी कर्मचार्यांना लाच घेतल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकार्यांनी गजाआड केले आहे. या घटनेमुळे संबंधित विभागात एकच खळबळ उडाली असून, शासनाने लाचखोर अधिकारी, कर्मचार्यांच्या विरोधी कार्यवाहीला अधिक प्रभावीपणे राबवून महसूल, पंचायत समिती, बांधकाम भूमिअभिलेख, दुय्यम निबंधक(रजिस्ट्री)   विभागातील अन्य बड्या माश्यांना जेरबंद करावे अशी मागणी जोर धरत आहे.

पहिल्या घटनेत हिमायतनगर तहसील कार्यालयातील आंदेगाव (पश्चिम) येथील एका शेतकर्यास  फेरफार नक्कल देण्यासाठी महिला लिपिक सुनिता दत्तात्रय गोपेवाड यांनी दोनशे रुपयाची मागणी केली होती. याबाबतची रीतशीर तक्रार आल्यानंतर नांदेडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शहानिशा केली. दरम्यान तक्रारकर्त्या व्यक्तीकडून तडजोडीनंतर १२० रुपयांची लाच सुनिता दत्तात्रय गोपेवाड यांनी स्वीकारली. आणि लगेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना जेरबंद केले. याप्रकरणी सुनिता दत्तात्रय गोपेवाड विरुद्ध हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पंचायत समिती कार्यालय उमरी येथील ग्रामसेविका सुजाता किशनराव शिंदे (२८) या आपणास आपल्या विहिरीचे झालेले काम आणि त्यासाठी शासनाकडून मिळणारा ४२ हजार रुपयांचा धनादेश देण्यासाठी ६ हजार रुपयांची लाच मागत असल्यची तक्रार नांदेडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागात आली. आजच त्या शहानिशा झाली आणि आज दुपारी उमरी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सहा हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या ग्रामसेविका सुजाता शिंदे यांना जेरबंद करण्यात आले.

त्यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कारवाईत पोलीस अधीक्षक डॉ.श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलीस अधीक्षक एस.आर.चव्हाण, उपअधीक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने, पोलीस कर्मचारी अर्जुनसिंह ठाकूर, मारोती केसगीर, सुरेश पांचाळ, महिला पोलीस अनिता भालेराव आणि चालक अनिल कदम यांनी ही सापळा कारवाई पार पाडली. सादर कारवाईत पोलीस अधीक्षक डॉ.श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलीस अधीक्षक एस.आर.चव्हाण, उपअधीक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बळवंत पेडगावकर, पोलिस कर्मचारी बाबू गाजुलवाड, विनोद साखरकर, इलतगावे, महिला पोलिस सुनिता मैलवाड आणि चालक शेख अन्वर यांनी हि कार्यवाही पार पाडली.

याबाबत महिला कर्मचारी सुनिता गोपेवाड यांच्याशी संपर्क केला असता त्या म्हणाल्या कि, मी केवळ शासनाच्या फिसची रक्कम मागितली. त्याची पावती सुद्धा फाडली आहे, येथे अनेकजण मोठ्या प्रमाणात देवाण - घेवाण करतात. त्यांना अधिकारी - पुढार्यासह सर्वच जन पाठबळ देतात, मात्र माझ्या सारख्या गरीब कर्मचार्यास जाणीवपूर्वक यात गोवण्यात आल्याचे सांगून अश्रूं वात मोकळी करून दिली. .

तर जिल्ह्यातील उमरी येथील पंचायत समिती कार्यालयाची ग्रामसेविका सुजाता किशनराव शिंदे (२८) या आपणास आपल्या विहिरीचे झालेले काम आणि त्यासाठी शासनाकडून मिळणारा ४२ हजार रुपयांचा धनादेश देण्यासाठी ६ हजार रुपयांची लाच मागत असल्यची तक्रार नांदेडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागात आली. आजच त्या शहानिशा झाली आणि आज दुपारी उमरी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सहा हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या ग्रामसेविका सुजाता शिंदे यांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कारवाईत पोलीस अधीक्षक डॉ.श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलीस अधीक्षक एस.आर.चव्हाण, उपअधीक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने, पोलीस कर्मचारी अर्जुनसिंह ठाकूर, मारोती केसगीर, सुरेश पांचाळ, महिला पोलीस अनिता भालेराव आणि चालक अनिल कदम यांनी ही सापळा कारवाई पार पाडली. 

माहिती सोबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी आणि कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी.तसेच लाच मागणीचे मोबाईल फोनवर केलेली रेकार्डिंग,एसएमएस,व्हिडीयो क्लिप असल्यास ती माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला द्यावी.जनतेच्या सवलती साठी विभागाने टोल फ्री क्रमांक १०६४ सुरु ठेवला आहे.तसेच कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२४६२ २५३५१२ जनतेसाठी नेहमीच सुरु आहे. तसेच पोलिस उप अधीक्षक संजय कुलकर्णी यांचा मोबईल क्रमांक ८५५४८५२९९९ यावर सुद्धा जनता आपली तक्रार सांगू शकेल. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वेब साइडवर सुद्धा तक्रार करता येते. जनतेने लाच मागणाऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बाबत आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे. 

शुक्रवार, 27 मई 2016

आकाशवाणीची २५ वर्ष

नांदेड आकाशवाणीची २५ वर्षाची यशस्वी वाटचाल

29 मे 1991 जनसंवादातील प्रभावी माध्यम म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते त्या नभोवाणी केंद्राची सुरुवात या दिवशी झाली होती. मागील 25 वर्षांपासून अविरत, अखंडपणे आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांची सेवा सुरु आहे. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रिद असलेल्या नांदेड आकाशवाणीने मागील 25 वर्षात प्रसार माध्यमांची सामाजिक हिताच्या दृष्टीकोणातून भूमिका नेहमीच महत्वाची ठरली आहे. भारतात रेडिओची सुरुवात झाली तेव्हा शिक्षण हे मुख्य उद्दिष्ट होते. त्यानंतर मात्र या उद्दिष्टात बदल होत माहिती-ज्ञान आणि मनोरंजन अशी कार्यक्रमांची त्रिसूत्री ठरली. या त्रिसूत्रीच्या माध्यमातून नांदेड आकाशवाणीने देखील गेल्या 25 वर्षाच्या विकासाच्या कालखंडाचा टप्पा यशस्वीरित्या पार पाडला.

8 मे 1988 साली सूचना आणि प्रसारण उपमंत्री कृष्णकुमार,  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण व नांदेडचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत नांदेड आकाशवाणीची कोनशीला वसरणी येथे रोवण्यात आली. आकाशवाणीचे कार्यालय आणि टॉवरच्या कामास तब्बल तीन वर्ष लागले.  29 मे 1991 साली नांदेड जिल्हा आणि परिसरातील श्रोत्यांसाठी संस्मरणीय दिवस ठरला.  यादिवशी पहिली उदघोषणा झाली. तीन तास प्रसारणास सुरुवात झाली. 30 मे 1991 साली आकाशवाणीला कार्यक्रम अधिकारी म्हणून भीमराव शेळके यांची नियुक्ती झाली.  या केंद्रावर सुरुवातीस सुमारे 50 कर्मचार्‍यांचा प्रचंड असा स्टाफ होता.  

‘हे आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे’ असा दमदार आवाज ऐकला की नांदेडकरांचे कान सुखावून जातात. एफ. एम.-101 अंश एक मेगाहर्टसवर नांदेड केंद्र लागते.  पुर्वी तीन तासाचे प्रसारण देणारे नांदेड आकाशवाणी केंद्र आज 3 सभेत पूर्णवेळ प्रसारण देते. या केंद्रावरुन विविध भारती, मुंबई, पुणे केंद्राचे सहक्षेपणही करण्यात येते.
श्रोते आणि पत्रके या सर्वांच्या आधारे खरीखुरी म्हणजे बातमी देण्यावर आकाशवाणीचा भर असतो. त्यामुळे आजही विविध प्रसारमाध्यमांमध्ये आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्या बातम्या, किमान ठळक बातम्या ऐकूणच मग लोक टीव्हीकडे वळतात.  बोलीभाषेत संवाद साधल्यासारख्या आणि मिनिटाला शंभर शब्द ही सर्वसामान्य श्रवणक्षमता गृहीत धरुनच बातम्या तयार करणे हेही आकाशवाणीचे वैशिष्ट्य आहे. बातम्यांखेरीज कृषीविषयक, मनोरंजनाचे कार्यक्रम सांगीतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असतो. यामध्ये पुन्हा पुन्हा तेच कार्यक्रम नसल्यामुळे श्रोत्यांना रटाळपणा वाटत नाही. राजकारण्यांची वाहवा करणे, त्यांच्याकडून पोपटपंची करणे अशा गोष्टींना आकाशवाणीच्या संहितेत थारा नसतो. आजही मल्टीप्लेक्स, एलईडी हाय डेफीनेशन टीव्ही त्यावरील हजारो वाहिण्या, स्मार्ट मोबाईल, टॅबलेट, इंटरनेट यासारख्या डीजीटल युगात आकाशवाणीने आपले आजही स्थान टिकवून ठेवले आहे. मानवाच्या व्यक्तिगत विकासासाठी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, आरोग्य व कृषिविषयक अशा अनेकविध क्षेत्रांबाबत जागृती निर्माण करण्याचे काम आकाशवाणी करीत असते. 

‘धीस इज ऑल इंडिया रेडिओ’, किंवा ‘यह आकाशवाणी हे’, ‘बिनाका गीतमाला’ त्यानंतर त्याचे  ‘सीबाका गीतमाला’ असे नामांतर झाले. अमित सयानी या उद़घोषकाला आजही श्रोत्यांच्या विसरले नाहीत . ‘संगीत सरिता’, ‘अस्मिता’, ‘फैजी भाईयों के लिए’ यासारखे कार्यक्रम कित्येक वर्षे लोकप्रियता टिकवून आहेत. नांदेडच्या श्रोत्यांना औरंगाबाद- परभणी आकाशवाणी केंद्रावरील बातम्या आणि इतर कार्यक्रमावर समाधान मानावे लागत होते.  त्यामुळे नांदेडकरांचा हिरमोड होत असे. योगायोगाने आपल्या नांदेडचे भूमिपूत्र डॉ. शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्याने या मागणीला पूर्णविराम मिळाला. अशोकराव चव्हाण हे त्यावेळी खासदार या पदावर होते. यामुळे नांदेकरांची अनेक वर्षापासून असलेली मागणी पूर्णत्वास आली. नांदेड आकाशवाणी हे आधुनिक एफएम या तंत्रासह श्रोत्यांना ऐकण्याचे भाग्य लाभले. 

आकाशवाणी केंद्राच्या तांत्रिक बाबीः 
पुर्वी लघुलहरी आणि मध्यम लहरी हे बँड नभोवाणी संचामध्ये समाविष्ट असायचे. यामुळे श्रोत्यांना ऐकताना बरेच अडथळे निर्माण होत असत. मात्र बदलत्या तंत्रज्ञानानुसार वेगवेगळे शोध लागत गेले.  फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन म्हणजेच ऋच् होय. या तंत्रज्ञानामुळे श्रोत्यांना सुस्पष्ट आवाज ऐकता येवू लागला. 101.1 चकन ऑपरेटींग फ्रिक्वेन्सी तर पॉवर ऑफ टीआर 6 किलोवॅट आहे. शंभर मीटर उंच टॉवर आणि या टॉवरच्या केंद्रबिंदूपासून 60 किलोमीटर परिघापर्यंत ऐकू जाईल अशी क्षमता. नांदेडसह हिंगोली, परभणी, वसमत, अहमदपूर, जळकोट तर आंध्रप्रदेशातील निर्मल गावापर्यंतच्या श्रोंत्यांना नांदेड आकाशवाणी केंद्राचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली.  अचानक विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास 1) डळपसश्रश ढ/ठ 3 ज्ञु., 2) एुलळींशी णपळीं, 3) झेुशी र्डीिश्रिू ढुे ऋशशवशीी ए-ऊ/ॠ.  या क्षमतेचे जनरेटरची सुविधा आहे. कारण रेडिओ प्रसारणाला एका- एका सेकंदाचे महत्व असते. श्रोत्यांना संदेश ग्रहणास कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून येथे 24 तास यांत्रिकी अभियंते कार्यरत असतात. 

पुर्वी ग्रामोफोनवर खापराचे रेकॉर्डस असायचा पण त्याची फुटण्याची भिती फार होती. काही काळानंतर ग्रामोफोन रेकॉर्डसमध्ये सुधारणा होऊन प्लास्टीक कोटेड असलेले रेकॉर्डस बाजारात आले आणि एका गाण्याहून चार ते पाच गाणे ऐकण्याची सुविधा मिळू लागली.  टेपरेकॉर्डस आले आणि आता संगणकाच्या सहाय्यामुळे तर सर्वच काही बदलून गेले. ऑडीओ एडिटींग असो किंवा कोणतेही कार्य असो संगणकाशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती निर्माण झाली . त्याचप्रमाणे नांदेड आकाशवाणीनेही बदलत्या काळानुसार आपल्यातही बदल केला आहे. 

नांदेड जिल्हा समृध्द व्हावा, नांदेड जिल्ह्याचा विकास व्हावा, जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचे कल्याण व्हावे ही भूमीका कार्यक्रम अधिकारी भीमराव शेळके यांनी जोपासली.  आकाशवाणीने लाईव्ह कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली. तेंव्हा सर्वप्रथम माळेगाव यात्रेचा लाईव्ह वृत्तांत, गणपती विसर्जन आणि मग लोकं अगदी विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी करण्याऐवजी घरी बसून रेडिओवर ऐकणे पसंद करु लागले. निवडणूक निकालाचे लाईव्ह ऐकणे तेथील चित्र श्रोत्यांना घरबसल्या पहायला मिळू लागले. याची पावती म्हणून सामान्य जणांसह जिल्हाधिकार्‍यांनीही कौतुक केले.  आज गणपती विसर्जन आहे, आपण गणरायाला निरोप देत आहोत, आम्ही सिडकोमध्ये आहोत, आता जाऊया आसना पुलाकडे, आम्ही गोवर्धनघाटकडे अशा प्रकारचे लाईव्ह कार्यक्रम दिल्यामुळे नांदेड आकाशवाणीने ‘आँखो देखा हाल’ चा श्रोंत्यांना घेता येऊ लागले.

 दृश्य पटलावर एखादे चित्र उभे करण्यात जेव्हा उद़घोषक यशस्वी होतो ते केवळ श्रोत्यांच्या प्रतिसादामुळेच. किसान वाणीतून संवाद साधताना शेतकर्‍यांना असे वाटते की, आपण जसे काही चावडीवर बसून हितगुज करत आहोत, गप्पा मारत आहोत, शेतीविषयक प्रश्तोत्तरात किसान वाणीच्या माध्यमातून ‘थेट बांधावर’ या कार्यक्रमामध्ये तर शेतकर्‍यांना काम करत असताना कानाला हेडफोन लाऊन असतो तेव्हा शेतकर्‍यांना पीकपरिस्थितीचे वर्णन बसल्या जागी ऐकायला मिळू लागले आणि जणू काही आपण शेतात आहोत, आपल्या डोक्यावर उन्ह आहे, असा भास संध्याकाळच्या कार्यक्रमातही श्रोत्यांना व्हायचा. हे सर्व श्रेय आकाशवाणी माध्यमात काम करणार्‍या टीमचं आहे. संविधानात प्रत्येकाला आपले धार्मिक स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. तेव्हा आकाशवाणी देखील धार्मिक किंवा अंधश्रध्दा निर्मुलनाचे यासारख्या कार्यक्रमांचा समतोल राखण्याचे कौशल्य म्हणावे लागेल. सध्या कमीत-कमी माणसांवर जास्तीत जास्त बोजा आहे,  कार्यक्रम अधिकारी भीमराव शेळके म्हणतात की, व्यवस्थापनामध्ये जे पाच शब्द आहेत, विश्‍वास, आरोग्यमय वातावरण, क्रोध, सहाय्य करण्याचे अंगी असलेले गुण, ह्या बाबी ज्यांना जमतात तो यशस्वी होतो. आणि याच सूत्राने आकाशवाणीला आज 25 वर्षाची यशस्वी वाटचाल करता आली. पाणी असो, पाऊस असो उन्ह असो, वारा असो आकाशवाणीतील कर्मचारी अगदी वेळेवेर येऊन आपले कर्तव्य बजावत असतात. आकाशवाणीला पब्लीक ब्रॉडकास्टर असे म्हणतात. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हा मुख्य उद्देश होता. पण बदलत्या प्रवाहानुसार संकल्पना बदलू लागली. 

                           राजू जोंधळे, एम.ए. (एम.सी. अँण्ड जे.) मो. 9960161862

शेतकर्याची आत्महत्या

 तरुण शेतकर्याची गळफास घेवून आत्महत्या


नवीन नांदेड(प्रतिनिधी)नांवामनपा हद्दीतील जुना कौठा येथील तरुण शेतकरी साहेबराव भिमराव गोरे यांनी आपल्या रहात्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना 27 मे च्या सकाळी घडली असून, या घटनेमुळे कौठा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी पो.हे.कॉ. मोहन मुभा राठोड यांनी दिलेल्या माहितीनूसार साहेबराव भिमराव गोरे (वय 37) हे आपल्या घरी जुना कौठा येथे टिन पत्राच्या हुकाला साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. पत्नीने दरवाजा निघत नसल्याने दरवाजाला जोरदार धक्का दिल्यानंतर साहेबराव गोरे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर आई व पत्नीने जोरदार आक्रोश केला. यानंतर घटनास्थळी अनेकांनी धाव घेतल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. या प्रकरणी मयत यांचे चुलत भाऊ गोविंद विश्र्वनाथ गोरे यांनी ग्रामीण पो.स्टे. मध्ये तक्रार दिली. घटनास्थळी सतत नापिकीला कंटाळुन आत्महत्या केल्याचे अनेकांनी सांगीतले. मयतास दोन एकर शेती कावलगाव ता.पुर्णा जि. परभणी येथे आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी दोन मुले व तीन बहीणी असा परिवार असून तो परिवारात एककुलता एक मुलगा होता. घटनास्थळी असर्जनचे पो.पा. खंडेराव बकाल यांच्यासह माजी नगरसेवक राजु गोरे, शिवसैनिकनिळकंठ काळे, तलाठी अनिल नरवाडे यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरीकांसह अनेकांनी भेट दिली. शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला. या प्रकरणी ग्रामीण पो.स्टे. मध्ये आकस्मात 42/16, 174 सीआरपी नूसार नोंद करण्यात आली. मयतावर जुना कौठा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक तपास पो.नि.सैदाने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हेकॉ. मोहन राठेाड हे करत आहेत.
सिडको परिसरालगत असलेले देशीदारूचे दुकान फोडून देशीदारुसह इतर वस्तुंची चोरी
नवीन नांदेड(प्रतिनिधी)नांदेड - उस्माननगर रोडवरील सिडको वसाहती लगत असलेल्या एका देशी दारुच्या दुकानाचे कुलुप तोडून, जवळपास 32 देशी दारुच्या बॉक्ससह एल.सी.डी. व डी.व्ही.आर. आदी वस्तुंची चोरी करुन चेारट्यांनी पोबारा केला. ही घटना 27 मे ला पहाटेच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
नांदेड उस्माननगर रोडवरील वाघाळा लगत असलेल्या उद्धव कौडगावकर यांच्या मालकीचे असलेल्या देशी दारु दुकान हे काल दि. 26 मे रोजी रात्री व्यवस्थापक प्रभाकर बाबाराव जाधव हे दिवसभर व्यापार करुन त्यांचे सहकारी शामराव आनंदा शिंदे, साहेबराव जळबा कांबळे, तिरुपती गंगाराम जाधव, बळी कांबळे, हणमंतराव साहेबराव कवाळे या सर्वांनी रात्री 10.30 वाजता दुकान बंद करुन सर्व शटर्सना कुलुप लावून ते निघून गेले. 27 मे रोजी नेहमीप्रमाणे ते सकाळी देशी दारु दुकान उघडण्यासाठी आले असता साहेबराव कवाळे (नौकर) यांनी दुकान उघडले असता त्यांना निदर्शनास आले की, दुकानातील सर्व माल हा चोरीस गेला आहे. त्यानंतर त्यांनी फोन करुन मॅनेजर प्रभाकर जाधव यांना कळविल्यानंतर दुकानात जाऊन पाहणी केली असता अज्ञात चोरट्टयांनी प्रथम दुकानातील चॅनलगेटचे त्यानंतर सेंटर गेटचे व पुन्हा चॅनेल गेट व त्यानंतर दरवाजावरील कुलुप असे चार पाच कुलुप तोडून आत प्रवेश करुन देशी दारुचे बत्तीस बॉक्स व एल.सी.डी, डी.बी.आर, मॉनीटर, अशा वस्तुं व नगदी 500 रु. अशा एकूण 80 हजार रुपयांची चेारी केल्याची फिर्याद मॅनेजर प्रभाकर जाधव यांनी ग्रामीण पो.स्टे. मध्ये दिल्यानंतर घटनास्थळी ग्रामीणचे पो.नि. गजानन सैदाने, उपनिरीक्षक नेहरकर, स्थागुशा चे कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. व या प्रकरणी तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर उपनिरीक्षक नेहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा च्या कर्मचार्यांनी चोरट्यांचा शोध सुरु केला. या घटनेमुळे मात्र परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 
माता रमाई आंबेडकर स्मृतीदिन साजरा....

नवीन नांदेड(प्रतिनिधी)माता रमाई आंबेडकर स्मृतीदिन माता रमाई चौक सिडको येथे साजरा करण्यात आला.

27 मे रोजी माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त सिडको येथील माता रमाई चौक येथे नामफलकास पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पंचशील त्रिरत्न घेण्यात आली. यावेळी जि.प. कृषी चे माझी सभापती उद्धवराव कौडगावकर, स्वच्छतादूत माधवराव पा. झरीकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त गौतम गजभारे, दलितमित्र के.एन.बोराळे, डॉ. ज्ञानेश्र्वर चिंतोरे, नरसिंग दरबारे, प्रा. एकनाथ वाघमारे, उपेंद्र तायडे, शाहीर गौतम पवार, राजु लांडगे, पत्रकार रमेश ठाकुर, सारंंग नेरलकर यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती.

बुधवार, 25 मई 2016

भोकर ते मुंबई लोटांगण आंदोलन सुरु

कर्जमाफी करा या मागणीसाठी शेतकऱ्याचे भोकर ते मुंबई लोटांगण आंदोलन सुरु


भोकर (मनोजसिंह चौव्हाण) राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे या मागणीसाठी २५मे२०१६रोजी दुपारी१वाजेपासून तालुक्यातील धावरी ग्रामपंचायत पासून व्यंकट वाडेकर या शेतकऱ्याने भोकर(धावरी)ते मुंबई मंत्रालय पर्यंत रस्त्यावरून लोटांगण घालत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात गावातील शेतकरी, महिला-पुरूषानी सहभाग घेतला आहे.

मागील तीन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे दुष्काळाचे संकट आले आहे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र शासन तुटपुंजी मदत देत आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी अनेकांनी आंदोलने केली. मात्र कर्जमाफी करण्याचा निर्णय होत नसल्याचे दिसुन येते संपुर्ण कर्जमाफी करावी. या मागणीसाठी भर उन्हात धावरी येथील युवा शेतकरी व्यंकट उध्दव वाडेकर यांनी भोकर(धावरी)पासून मंत्रालयमुंबई पर्यंत जाण्यासाठी बुधवारी दुपारपासून रस्त्याने लोटांगण आंदोलन सुरू केले आहे. सदरील आंदोलनाबाबत वाडेकर यांनी संबधितांकडे पत्र दिले होते. आंदोलन सूरु करताच महसूल विभागाचे तलाठी विलास गलांडे यांनी याबाबत आम्हाला काही निर्णय घेता येणार नाही. तुमच्या भावना वरीष्ठाना कळवु,तुम्ही आंदोलन मागे घ्या अशी विनंती केली. मात्र वाडेकर यांनी मागणी मान्य होईपर्यंत लोटांगण आंदोलन सुरूच राहणार आसल्याचे सांगितले. या आदोलनात अनेक शेतकरी, महिला-षुरूषांनी सहभाग घेत मुंबई पर्यंत जाणार आहेत असे सांगण्यात आले.

लोहा तालुक्याचा 83 टक्के निकाल

महेश ठाकूर, आकाश पवार, लाभशेटवार, स्नेहा पिठ्ठलवार, श्रद्धा चन्नावार यांचे घवघवीत यश

टेळकीचा यंदाही शुन्य-7 कॉलेज 77 विद्यार्थी

लोहा(प्रतिनिधी)बारावीच्या परिक्षेत लोहा-कंधार तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेचे कोरे करकरीत नाणे खणखणविले आहे. महेश धोंडीबा ठाकूर (92 टक्के), आकाश गणेशराव पवार (83 टक्के), मयुर महेंद्र लाभशेटवार (84 टक्के), स्नेहा रमेशराव पिठ्ठलवाड (80 टक्के), श्रद्धा चन्नावार (80 टक्के), बालाजी मारूती कळसकर (80 टक्के) या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. लोहा तालुक्याचा निकालात यंदा वाढ झाली असून तालुक्याचा 83.80 टक्के तर कंधार तालुक्याचा 80.94 टक्के इतका आहे. टेळकीच्या राजाराम कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाही निकालाचा भोपळा फोडला नाही तर जि.प.हा.लोह्याच्या ज्यु.कॉलेजमध्ये विद्यार्थीच नाही. उच्च माध्यमिक शालांत परिक्षेचा बुधवारी इंटरनेटद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. लोहा तालुक्यातील 22 ज्यु.कॉलेजमध्ये 1299 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी 1296 जणांनी परिक्षा दिली. यापैकी 1086 जण उत्तीर्ण झाले. तालुक्याचा सरासणी निकाल 83.80 टक्के लागला. लोह्याच्या संत गाडगे महाराज क.महाविद्यालयाचा (89.21 टक्के) तर तालुक्यात सोनखेडच्या शिवाजी ज्यु.कॉलेजचा सर्वाधिक 92.51 टक्के इतकी निकाल लागला. संत बाळगीर महाराज कापशी गुंफा (92.31 टक्के), शिवनिकेतन ज्यु.कॉलेज सावरगाव (न) (81.82), कै.विश्वनाथराव नळगे कनिष्ठ महाविद्यालय लोहा (78.58 टक्के), संजय गांधी ज्यु.कॉलेज कलंबर (81.13 टक्के).

कॉलेज 7 विद्यार्थी 77
-------------
ज्युनइर कॉलेजची अवस्था बिकट झाल्याचे समोर आले. अकरावीला काही ठराविक कॉलेज वगळता इतर कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यास विद्यार्थी उत्सुक नाहीत. लोह्याच्या जि.प.हायस्कूल (0), कै.राजाराम देशमुख ज्यु.कॉलेज (1), लोकमान्य क.म.सोनखेड (चार), मातोश्री ज्यु.कॉ.सोनखेड (08), श्री छत्रपती ज्यु.कॉलेज (चोवीस) असा सात ज्यु.कॉलेजमध्ये एकुण 77 विद्यार्थी परिक्षेला बसले.

विद्यार्थी संख्या एक-वर्ग आहे मुले नाहीत
-----------------------------------
टेळकीच्या कै.राजाराम देशमुख क.महाविद्यालयाचा निकाल शुन्य टक्के लागला. यंदाही या कॉलेजने मागील कित्ता गिरवला. बारावी वर्गात एक विद्यार्थी परिक्षेला बसला म्हणजे वर्षभर बारावीचे क्लास सुरू नव्हते यावर शिक्कामोर्तब होते. जि.प.हायस्कुलमध्ये अकरावी-बारावीचा वर्ग आहे पण विद्यार्थीच नाहीत.
कंधार तालुक्यात 34 कनिष्ठ महाविद्यालयातून 3043 विद्यार्थी परिक्षेला बसले होते त्यापेकी 3 हजार 33 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. 2455 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शेकडा 80.94 टक्के इतका निकाल तालुक्याचा आहे.

ठाकूर, पवार, लाभशेटवार, पिठ्ठलवाड, चन्नावार यांचे यश
------------------------------
महेश ठाकूर (92) टक्के, आकाश पवार (83 टक्के), मयुर महेंद्रकुमार लाभशेटवार (84.61), स्नेहा रमेश पिठ्ठलवाड (80 टक्के), श्रद्धा विजय चन्नावार (80 टक्के), बालाजी मारूती कळसकर (79 टक्के) यासह तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. बुधवारी दुपारी निकालासाठी ओमसाईचे माधव फुलवरे, एव्हीचे विठ्ठल पांचाळ, सायबरचे ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांच्याकडे गर्दी होती. मोफत निकालपत्रक काढून दिले परंतु मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांनी मोबाईलचाच जास्त युज केल्याचे दिसते. श्रद्धा विजयकुमार चन्नावार हिने 84 टक्के गुण कॉमर्समध्ये मिळविले.

गुणवत्ताधारक अभिनंदन
---------------------------
लोहा-कंधार तालुक्यात गुणवत्तेची खाण आहे. दरवर्षी निकालाचा-गुणवत्तेचा आलेख वाढतो आहे. मेहनत जिद्द, चिकाटीच्या बळावर विद्यार्थी राज्याच्या कानाकोपर्‍यात स्पर्धेत यशस्वी होत आहेत. त्यांचे व त्यांच्या पालकांचे, गुरूजणांचे मी जाहीर अभिनंदन करतो, असे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. गटशिक्षणाधिकारी कुलकर्णी, तहसिलदार झंपलवाड, उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील यांनी अभिनंदन केले.

सोन्याचे दागिने व रक्कम लंपास

हिमायतनगर शहरात चोऱ्यांचे सत्र सुरु.... 
सोन्याचे दागिने व रक्कम लंपास

हिमायतनगर(प्रतिनिधी)शहरात चोरट्यांनी धुमाकूळ माजविला असून, त्यांना पकडण्यात पोलिस असमर्थ ठरत असल्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढत आहे. मंगळवारी दि.२३ च्या मध्यरात्रीला शहरातील उच्चभ्रू वस्तीतील एकाचे घर फोडून कपाटातील लाखोचे सोन्या चांदीचे दागिने व नगदी रक्कम लंपास केल्याने शहरवासियात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या अकार्यक्षमतेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.  

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मंगळवारच्या मध्यरात्रीला १.३० ते २ वाजेच्या सुमारास चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी हिमायतनगर शहरातील दत्त नगर या उच्चभ्रू वस्तीत धुमाकूळ माजविला. या ठिकाणी भाड्याने राहत असलेले श्री देवसरकर यांच्या घरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, परंतु येथे काहीच आढळले नाही. त्यानंतर बाजूच्या घरात भाड्याने राहणारे विहिपचे किनवट जिल्हामंत्री किरण बिच्चेवार यांच्या दाराच्या कुलुपाची कडी तोडून आत प्रवेश केला. लाकडी अलमारीत ठेवलेले ३.५ तोळे सोने अंदाजे १ लाख २ हजार २०० रुपये आणि २७ हजार रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. तसेच चोरट्याने यांच्या घरातील एलसिडी नेण्याच्या उद्देशाने काढून ठेवली. एवढेच नव्हे तर श्री बिच्चेवार यांनी मागील काळात गोरक्षनाचे सुरु केलेले कार्य याबाबत वरिष्ठ पातळीपर्यंत केलेल्या तक्रारीच्या फायली असलेली सुटकेस काढून कागदे चाळण्यात आल्याचे दिसून आले आहे. यावेळी श्री बिच्चेवार कुटुंब आपल्या मूळ सरसम बु. गावी गेलेले होते. तर गेल्या चार दिवसापासून हिमायतनगर शहरातून कत्तलीसाठी गोवंश प्रकरणामुळे चार दिवसापासून ते हिमायतनगर येथील घरी नव्हते. त्यामुळे कोणीतरी पाळत ठेवून चोरी केली असावी अशी शंका त्यांनी व्यक्त केली. चोरीत सोन्याचे दागिने व रक्कम गेली याची खंत नाही. परंतु हि सर्व कागदपत्रे काढून पाहण्याचा चोरट्यांचा नेमका काय..? उद्देश होता असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

मागील काळातील चोरीच्या घटनांचा तपास गुलदस्त्यात 
----------------------------------
गेल्या सह महिन्यापूर्वी एका घरी चोरी झाली. त्या घराकडे जाणारे सीसीटीव्ही फुटेज मध्ये तीन चोरटे हातात लोखंडी साहित्य घेऊन जाताना दिसले. त्यात दोघांच्या तोंडावर मुसक्या तर एकच चेहरा दिसत आहे. परंतु चोरट्यांचा अद्याप शोध लागला नाही. त्यानंतर गेल्या महिन्यात एकाच दिवशी पाच ठिकाणी चोरी झाली होती, चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या नागरिकांचे मन विचलित करण्यासाठी चोरट्यांनी एका घराला आग लावली होती. यानंतरही लहान - मोठ्या चोरीचे सत्र सुरूच असून, अद्याप एकही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरीकातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, तातडीने चोरट्यांचा शोध लाऊन, रात्रगस्त वाढवावी आणि नागरिकांना सुरक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे.   

सायरन देतो चोरट्यांना सतर्कतेचे इशारा
---------------------------------
चोरीच्या घटनेवरून जो तो पोलिसांच्या विरोधात बोलून तोंड सुख घेत असून, पोलिसांची गस्त सायरन लावून केली जाते. त्यामुळे चोरी करणाऱ्या चोरट्यांना सतर्क होण्याची संधी मिळत आहे. एखाद्यावेळी   चोर रात्रीला दिसल्यावर पोलिसांना संपर्क केला तर येण्यास उशीर केला जातो. तर कधी मी बाहेर आहे, दुसर्या कोणाला तरी पाठवितो असे सांगितले जाते. आणि थेट जोरात सायरन वाजवीत वाहनातून गस्त केली जाते. हि गस्त नागरिकांना काय..? सुरक्षा देणार असे बोलून दाखवून चोरटे व पोलिस यांचे साठेलोटे आहे कि काय..? अशी शंका नागरिकांनी उपस्थित केली आहे. 

अनोळखी युवतीचा मृतदेह

पुलाखाली सापडला अनोळखी युवतीचा मृतदेह...
हत्या कि आत्महत्या चर्चेला उधान
हिमायतनगर(प्रतिनिधी)नांदेड- किनवट राज्य रस्त्यावरील करंजी - सरसमच्या मध्यभागी असलेल्या पुलाखाली एका अज्ञात युवतीचे पालथ्या अवस्थेत मृतदेह दि.२४ बुधवारी दुपारी आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, हत्या कि आत्महत्या चर्चेला उधान आले आहे.

याबाबत सविस्तर असे कि, बुधवार दि.२४ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शौच्चालयासाठी गेलेल्या एका व्यक्तीस लालबा डबलवाड यांच्या शेताजवळील करंजी - ते सरसम बु.रस्त्यावरील पुलाखाली एका अनोळखी युवतीचा मृतदेत पालथ्या अवस्थेत दिसून आला. याची माहिती सर्वत्र पसरली यावेळी घटनास्थळी आलेले सरसम येथील पोलिस पाटील माधव नरवाडे यांनी घटनेची माहिती हिमायतनगर पोलिसांना दिली. तातडीने पोलिसांचे वाहन घटनास्थळाकडे रवाना झाले. घटना स्थळावर मयत युवती हि अंदाजे २२ वर्षीय असून, पालथ्या अवस्थेत जमिनीवर पडलेली होती. अंगात लाल रंगाचा टोप व काळ्या रंगाची पैंट तसेच गळ्यात काळ्या - निळ्या रंगाची ओढणी होती. डाव्या हाताच्या दंडला चिरलेले आणि रक्तस्त्राव झालेले दिसत होता. तर पायाला मार सुधा दिसून आला असून, कोणीतरी अज्ञातांनी तिच्यावर अत्याचार करून खून केला असावा असे या प्रकारावरून दिसून येत होते. सदरील युवतीचा मृत्यू गत दोन - तीन दिवसापूर्वी झाल्यामुळेच सर्वत्र दुर्गंधी सुटल्याचे नागरीकातून बोलले जात होते. सदर घटनेचे दृश्य पाहण्यासाठी राज्यारास्त्यावर वाहने व नागरिकांनी गर्दी केली होती. त्यांच्या होत असलेल्या चर्चेवरून २२ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली... कि तिने आत्महत्या केली असा तर्क वितर्क लावला जात आहे. 

याठिकाणी दाखल पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, त्यानंतर शवविछेदनासाठी सरसम बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. याचा अहवाल आल्यानंतर युवतीच्या मृत्यूचे गूढ समोर येणार आहे. सध्या तरी या घटनेबाबत हिमायतनगर पोलिस डायरीत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सदर घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार बालाजी लक्षटवार हे करीत आहेत.

मिसिंग युवती असण्याची शक्यता 
------------------------
तालुक्यातील धानोरा ज. येथील एक युवती तीन चार दिवसापासून मिसिंग असल्याची नोंद पोलिस दफ्तरी आहे. त्या नोंदीपासून हिमायतनगर पोलिस युवतीचा शोध घेत असून, सोमवारी हिमायतनगर पोलिसांचे पथक किनवट - नांदेड मार्गावरील रात्री ७ ते ९ वाजेच्या दरम्यान पुलांची पाहणी करीत होते. त्यामुळे आज आढळलेले प्रेत त्याच युवतीचे आहे कि अन्य कोण्या पिडीत युवतीचे हे अद्याप तरी स्पष्ट झाले नाही. याचा शोध लावणे आणि युवतीच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसासमोर उभे आहे.        

याबाबत पोलिस निरीक्षक सुरेश दळवे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले आमचा सर्व दृष्टीने तपास सुरु आहे. आमचे कर्मचारी सर्व बाजूने चौकशी करीत आहेत, त्याबाबत सध्या तरी काही सांगता येत नाही. परंतु लवकरच याचा शोध लागेल असे आश्वसन त्यांनी दिले.

बुधवार, 11 मई 2016

नवरत्न पुरस्कार

दूरदर्शनच्या पंधराव्या नवरत्न पुरस्कारांची घोषणा


यंदा लेखिका डॉ.विजया राजाध्यक्ष यांना साहित्यरत्न, गायक रामदास कामत यांना नाट्यरत्न, संगीतकार अजय-अतुल यांना संगीतरत्न, अभिनेता नाना पाटेकर यांना चित्ररत्न, शिक्षण तज्ञ डॉ. विजया वाड यांना शिक्षणरत्न, ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांना रत्नदर्पण, उद्योजक अनिल जैन यांना वैभवरत्न, सेवाभावी कार्यकर्ते विजय फळणीकर यांना सेवारत्न तर सुलेखनकार अच्युत पालव यांना कलारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.  याशिवाय अभिनय क्षेत्रातील पदार्पणासाठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांना फेस ऑफ द ईयर पुरस्कार घोषित झाला आहे.

सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यंदाच्या पुरस्कार निवड समितीमध्ये गिरीजा काटदरे, विजय कलंत्री, विक्रम गोखले आणि दिनकर रायकर या मान्यवरांचा समावेश होता. यंदाचा सह्याद्री नवरत्न पुरस्कार वितरण समारंभ उद्या संध्याकाळी 6 वाजता रविंद्र नाट्यमंदिर येथे संपन्न होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचे प्रसारण मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनीवर 29 मे रोजी संध्याकाळी 4.30 वाजता करण्यात येणार आहे.

शेतकर्यांप्रती आपुलकी दाखवा

दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांप्रती आपुलकी दाखवा - गटविकास अधिकारी अश्विनी भारुड
हिमायतनगर(अनिल मादसवार) अल्प पर्जन्यामानामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कास्तकार आर्थिक संकटात सापडला आहे. आगामी खरीप हंगामात पेरणीच्या चिंतेत पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. शासनाने दुष्काळी परिस्थितीत कृषी कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पेरणीसाठी लागणारे रासायनिक खते, बी बियाणे खरेदीसाठी बळीराजा कृषी दुकानाकडे वळत आहे. यावर्षी खते - बियाणांचा भरपूर साठ उपलब्ध होणार असल्याने आपल्या दुकानात आलेल्या शेतकर्यांना नाराज न करता आपुलकीच्या भावनेने व्यवहार करावा असे आवाहन गटविकास अधिकारी सौ.अश्विनी भारुड यांनी केले. 

त्या काल दि.१० रोजी येथील पंचायत समिती सभागृहात संपन्न झालेल्या खरीप हंगामाच्या नियोजन आढावा बैठकीप्रसंगी बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती आडेलाबाई हातमोडे, उपसभापती पंडित रावते, सदस्य वामनराव वानखेडे, उज्ज्वला बिच्चेवार, बालाजी राठोड, सहाय्यक गटविकास अधिकारी तथा प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी विलास गंगावणे, कृषी अधिकारी एम.टी. सुडे, पी.आर.माने, अद्वैत देशपांडे, विस्तार अधिकारी रविराज क्षीरसागर, यावेळी भास्कर चिंतावार, रमेश पळशीकर, मारोती पाटील, श्याम ढगे, यांच्यासह शहरातील परवानाधारक कृषी दुकानदार  उपस्थिती होती.      

हिमायतनगर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ४८ हजार ५४३ हेक्टर असून, लागवडी खाली येणारे क्षेत्र ३९ हजार ९२४ आहे. खरीप खालील सर्वसाधारण क्षेत्र हे ३० हजार ७९० हेक्टर आहे. सन २०१६-१७ साठी पुढील प्रमाणे पिकासाठी क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले असून, यात भात ५५ हेक्टर, ज्वारी २३५० हेक्टर, तूर २५०० हेक्टर, मुग ५४५ हेक्टर, उडीद ३६० हेक्टर, तीळ ५५ हेक्टर, सोयाबीन १२१५० हेक्टर, कापूस १६२५० हेक्टर, उस ४५० हेक्टर असे एकूण ३४ हजार ७४० हेक्टर खरीप क्षेत्र आहे. 

यासाठी लागणारे बी - बियाण्यांचा साठा उपलब्ध होणार असून, यात भात - २४.७५ क्वींटल, मका - ६.० क्वींटल, ज्वारी १७६ क्वींटल, तूर ३७५ क्वींटल, मुग ८१ क्वींटल, उडीद ५४ क्वींटल, सोयाबीन ९ हजार ११२ क्वींटल, तीळ ५५ क्वींटल, कापूस ८१ हजार २५० पौकेट अशी मागणी करण्यात आली आहे. तालुक्यात एकूण ११ हजार ९८ मेट्रिक खताची मागणी केली असून, यात युरिया ३ हजार ६५५ मेट्रिक टन, डीएपी २ हजार ७९५ मेट्रिक टन, एमओपी ९८९ मेट्रिक टन, एनपीके २ हजार २२७ मेट्रिक टन, एसएसपी १२३८ मेट्रिक टन, अमोनियम सल्फेट १०८ मेट्रिक टन, कैल्शियम अमोनियम नायट्रेट ४३ मेट्रिक टन, एमओपी ४३ मेट्रिक टन उपलब्ध होणार आहे. 

आज तारखेला तालुक्यात युरिया १९११ मेट्रिक टन, डीएपी ६६९ मेट्रिक टन, एमओपी १६६ मेट्रिक टन, एनपीके १२६९ मेट्रिक टन, एसएसपी ७६० मेट्रिक टन, मिश्र खाते २९१ मेट्रिक टन असा एकूण ५ हजार ६६ मेट्रिक टन खताचा साठा शिल्लक आहे. तसेच शेतकर्यांनी सुद्धा कोणत्याही एकच वाणाच्या बी - बियाणांची मागणी न करता वेगवेगळी वाणाची लागवड करावी. कापसाची लागवड करताना शेताभोवती नोन बीती कापसाची दोन ओळी लावाव्यात जेणे करून गुलाबी बोंड आळीच्या प्रादुर्भाव वाढणार नाही. सोयाबीन बियाणे लागवड करताना बियाणात बुरशीनाशकाची ट्रीटमेंट करावी. तसेच सोयाबीन तूर या अंतर पिक पद्धतीचा वापर करावा असे आवाहन कृषी अधिकारी श्री माने यांनी सभागृहात माहिती देताना केले.  

 यावेळी तालुक्यातील लाभार्थ्यांना शासनाच्या विशेष घटक योजनेतून जुन्या पंचायत समिती इमारतीच्या गोडावून मधून आजवर ३० हून अधिक शेतकर्यांना तिफन, कोळपे, चिमटा, पाठीवरील पंप यासह अन्य कृषी साहित्यांचे वितरण करण्यात आले असून, लवकरच अन्य लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. विशेष घटक योजना २०१५-१६ मध्ये एकूण ८८ लाभार्थ्यांचा समावेश आहे. २० लाभार्थी विहिरीसाठी निवडण्यात आले तर ६८ लाभार्थी इतर बाबीमध्ये समाविष्ठ करण्यात आले आहेत.  

मंगलवार, 10 मई 2016

रानडुकराचा हल्ला

रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी महिला जखमी
हिमायतनगर(प्रतिनिधी)तालुक्यातील मौजे पोटा बु. परिसरातील पारवा खु. येथील कचरा वेचानिसाठी गेलेल्या एका महिलेवर रानडुकराने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना दि.१०  मंगळवारी सकाळी ०८ वाजेच्या सुमारास घडली आहे.

दुष्काळी परिस्थितीने जंगलातील पाणवठे कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधत मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. तर गेल्या काही दिवसापासून वातावरणात झालेल्या बदलाने शेतकर्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरु केली आहे. त्यानिमित्त पारवा खु.येथील महिला शेतकरी सौ. आशाबाई मारोती करडेवाड ह्या कचरा वेचानिसाठी सकाळीच गेल्या होत्या, दरम्यान ८ वाजेच्या सुमारास पळसाच्या झुडपात दाबा धरून बसलेल्या एका रानडुकराने कचर वेचानीत मगन असलेल्या महिलेवर अचानक हल्ला केला. यामुळे घाबरलेली महिला जमिनीवर पडली असताना रानडुकराने महिलेच्या उजव्या पायाला जबरदस्त चावा घेतला. जीवाच्या आकांताने सदर महिलेने आरडा -ओरड केली. यावेळी बाजूलाच नांगरणी - वखरणी करणारे शेतकरी धाऊन आले. दरम्यान रानडुकराने पलायन केले. जखमी झालेल्या महिलेस तातडीने भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार केले. वृत्त लिहीपर्यंत सदर महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

गेल्या काही दिवसापासून तालुक्यातील ग्रामीण भागात रानडुकराचा हल्ला, वाघाचा हल्ला, हरीण विहिरीत पडणे, शिकारी टोळ्या सक्रिय झाल्याचे वृत्त अनेक वर्तमान पत्रातून प्रकाशित झाले. परंतु वनविभागाने याची दाखल घेऊन वन्य प्राण्यासाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय केली नाही. त्यामुळे वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीकडे शिरकाव सुरूच आहे. आता तरी वनविभागाने घटनेचे गांभीर्य घेऊन जंगलात पाणवठे तयार करून नागरिकांना सुरक्षा द्यावी अशी मागणी होत आहे.

वादळी वार्याच्या थैमान

वादळी वार्याच्या थैमानाने अनेक घरांसह महावितरण कंपनीचे प्रचंड नुकसान  

हिमायतनगर(प्रतिनिधी)मागील अनेक दिवसापासून वातावरणात झालेल्या बदलाने जाऊन पावसाळ्यागत परिस्थिती निर्माण झाली आहे. दि. १० रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास हिमायतनगर तालुक्यात वादळी वार्याने थैमान घातले असून, मौजे वाघी येथे अनेक घरांसह महावितरण कंपनीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तत्काळ विद्दुत पुरवठा खंडित केल्याने पुढील अनर्थ टळला असून, या पावसामुळे मात्र गर्मीने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

हिमायतनगर शहर आणि ग्रामीण भागात परीसरात गेल्या महिन्याभरापासून उन्हाची तिव्रता वाढली असून, वाढत्या उष्णतेने सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान आठ दिवसापासून आभाळात उन सावल्यांचा खेळ चालू असून, प्रचंड वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटाने नागरिकांसह शेतकर्यांना त्रस्त करून सोडले आहे. दि. १० मंगळवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास सुरु झालेल्या अचानक वादळी वार्यामुळे तालुक्यातील मौजे वाघी गाव परिसरात विजेच्या कडकडाटसह रिमझिम पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली तर काही नागरिकांच्या घरावरील टीन पत्रे उडाली. रात्रीपर्यंत तालुक्यात काही गावात वारे व गारांचा पूस झाला. यात महावितरण कंपनीचे अनेक विद्युत वितरण कंपनीचे लोखंडी खांब जमीनदोस्त झाले. तर टीन - पत्राचे शेड कोसळले असून, यात कोणतीही वाईट घटना घडली नाही. वादळ थांबल्यानंतर नागरिक व महावितरण कंपनीचे कर्मचारी झालेल्या नुकसानीचे साहित्य गोळा करता करता नाके नऊ आल्याचे चित्र दिसून आले आहे. याबाबत तहसील व महावितरण कार्यालयाकडे संपर्क केला असता कुठलेच नुकसानाची माहिती मिळाली नाही. तालुक्यात रात्री ०९ वाजेपर्यंत जोराचा वारा सुटू लागल्याने ग्रामीण भागात अनेक वेळा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.

वीज पडून उमरखेड तालुक्यातील तिघांचा मृत्यू 
----------------------------
तर नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्याला लागून असलेल्या उमरखेड तालुक्यात येणाऱ्या मौजे टाकळी  येथे विज पडून तिन जण जागीच ठार झाले आहेत. यात मारोती हापसे, नितीन शेषराव बाहदूरे, कृष्णा गायकवाड समावेश आहे. सायंकाळी अचानक सुरु झालेल्या वादळी पावसापासून बचाव करण्यासाठी हे शेतातील एका झाडाखाली उभे होते. दरम्यान विजांचा कडकाडाट झाडावर वीज कोसळली. यात या तिघांचा मृत्यू झाला असल्याचे आमच्या प्रतिनिधीने सांगितले.  

सोमवार, 9 मई 2016

ताड मुंजल

तेलंगाना राज्यात ताडीच्या झाडाला येणारे फळ ताड मुंजल नांदेडच्या बाजारात विक्रीस दाखल झाले असून, याच्या सेवनाने उन उतरते असे जुने जाणकार सांगतात. छाया - मुनवर खान

चंद्रभागा नदी शुद्ध करणार

पंढरपूर तीर्थक्षेत्र सुंदर तर चंद्रभागा नदी शुद्ध करणार - सुधीर मुनगंटीवार

मुंबई(प्रतिनिधी)पंढरपूर तीर्थक्षेत्र स्वच्छ आणि सुंदर करताना  लाखो वारकऱ्यांच्या मनात सामाजिक समतेचा आध्यात्मिक वारसा प्रवाहित करणारी चंद्रभागा नदी शुद्ध करणार असल्याचे प्रतिपादन वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.आज सह्याद्री अतिथीगृहात नमामि चंद्रभागा कार्यक्रमांतर्गत पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आणि चंद्रभागा नदीचे शुद्धीकरण यासंबंधीची आढावा बैठक वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकरनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे तसेच पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पंढरपूरची चंद्रभागा नदी ही महाराष्ट्राच्या निखळ, निरागस श्रद्धेचा मानबिंदू आहे. वारकरी आणि चंद्रभागा यांचे नाते अतूट असल्याने चंद्रभागेच्या पावित्र्याचे आणि निर्मळतेचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. हे लक्षात घेऊनच राज्य अर्थसंकल्पात नमामि चंद्रभागा अभियान घोषित करण्यात आल्याचे सांगून वित्तमंत्री म्हणाले कीशासन आणि लोकसहभागातून हे अभियान राबविताना पंढरपूर क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यालाही शासनाने प्राधान्य दिले आहे. आजमितीस तिथे १५ दशलक्ष लिटरचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित आहे. सध्या तो १२ दशलक्ष लिटर क्षमतेने सुरु आहे. आषाढी- कार्तिकी एकादशीच्या काळात वारी दरम्यान १८ दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होते म्हणजेच या काळात साधारणत: ६ दशलक्ष लिटर प्रक्रिया न केलेले पाणी चंद्रभागेत सोडले जाते. या प्रकल्पाची क्षमतावृद्धी करण्याचे काम नमामि चंद्रभागा अभियानांतर्गत प्राधान्याने हाती घेतले जाणार आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात नमामि चंद्रभागा अभियानासाठी २० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. परंतु पंढरपूर क्षेत्राचे महत्त्व व तिथे होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन या कार्यक्रमासाठी आवश्यक तितका निधी उपलब्ध करून दिला जाईल. येत्या १ जून २०१६ रोजी पंढरपूरमध्ये नमामि चंद्रभागा’ परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे ही वित्तमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पंढरपूरमध्ये तुळशी उद्यानासह वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम
येत्या आठवड्यात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर पंढरपूरला जाऊन यासंबंधीची सविस्तर पाहणी करतील व बैठक घेतील असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले कीपंढरपूर क्षेत्रातील वनराई वाढवण्याचे काम वन विभागामार्फत हाती घेतले जाणार आहे. यामध्ये वृक्षलागवडीबरोबर तुळशी उद्यान  पंढरपूरमध्ये विकसित करण्यात येईल. साबरमती नदीच्या शुद्धीकरणाचे जे काम झाले आहे, त्याची स्वतपाहणी करणार असल्याचेही वित्तमंत्र्यांनी सांगितले.
गोदावरीच्या धर्तीवर चंद्रभागा नदी काठी काम
आपण येत्या १३ मे रोजी पंढरपूरला जाणार असून चंद्रभागा नदीची पाहणी करणार आहोत.  त्यानंतर सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येईल,  असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. ते म्हणाले कीपैठण शहर हे दुसरी काशी म्हणून महाराष्ट्रास परिचित आहे. याठिकाणी संत एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी तसेच गोदावरी नदीत दशक्रिया विधी व अस्थि विसर्जन करण्यासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. यामुळे गोदावरी नदीचे पाणी प्रदूषित होऊ नयेतीर्थक्षेत्र परिसर स्वच्छ आणि सुंदर राहावा यादृष्टीने विविध विकास कामे हाती घेतली होती. यामध्ये घाट बांधकाम,  रक्षाकुंडदशक्रिया विधी मंडपकाँक्रिटचे रस्तेसुलभ शौचालय व इतर व्यवस्था कचराकुंडीहायमास्ट विद्युतीकरण या कामांचा समावेश होता.  या धर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कामे करण्यात येणार असून ही सर्व कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत केली जातील.

अंशकालीन निर्देशिक

अंशकालीन निर्देशिकाना नियुक्ती देण्याची मागणी
हिमायतनगर(प्रतिनिधी)सन २०१२-१३ या वर्षात शाळांवर काम केलेल्या सर्व अंशकालीन कर्मचार्यांना नियुक्ती देण्याची मागणी कला, क्रीडा व कार्यानुभव अंशकालीन संघटनेने गटशिक्षण अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. 

सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात ११ महिन्याच्या तात्पुरत्या नियुक्तीवर हिमायतनगर तालुक्यातील अनेक कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांना शाळेवर नियुक्त करण्यात आले होते. परंतु ११ महिन्याचा कालावधी संपताच त्यांना शासनाने सेवेतून मुक्त केले होते. यात कला क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांचा समावेश आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनच्या या निर्णया विरोधात अंशकालीन कर्मचारी संघटनेने मुंबई उच्च न्यालायायाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दाद मागितली होती. दि.२१ ऑगस्ट २०१५ रोजी शासन निर्णय व न्यालयाच्या आदेशाने सर्व अंशकालीन कर्मचार्यांना कामावर घेण्याचा निर्णय दिला आहे. संबंध महाराष्ट्रभर अंशकालीन कर्मचार्यांना पुनश्च नियुक्ती देण्यात आली आहे. परंतु शासनाच्या या निर्णयाची अंमल बजावणी हिमायतनगर तालुक्यात होत नसल्याचे अंशकालीन संघटनेचे म्हणणे आहे. 

शासनाच्या या निर्णयाची तत्काळ अंमल बजावणी करून कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांना पुनश्च सेवेत सामावून घेण्याची मागणी अंशकालीन कर्मचारी संघटनेचे सचिन कोमावार व सतीश मोरे यांनी गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

पाणी प्रश्न पेटलेला

गांजेगाव पुलावर पेटलेला पाणी प्रश्न पोलिस व तहसील प्रशासनाच्या मध्यस्तीने सुटला
हिमायतनगर(अनिल मादसवार) विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीत कैनोल्द्वारे सोडण्यात आलेले पाणी बुदलि बंधार्याजवळ येउन ठेपले. परंतु येथील गेट उघडण्याच्या कारणावरून येथे पाणी प्रश्न पेटला होता. त्यामुळे दि.०७ शनिवारी सायंकाळी पोलिस बंदोबस्त लाऊन प्रशासनाच्या उपस्थितीत दोन गेट काढून पुढील गावाकडे पाणी सोडण्यात आले आहे.
 
नुकतेच इसापूर धरणातून कैनोलद्वारे सोडण्यात आलेले पाणी यवतमाळ - नांदेड जिल्ह्याच्या सीमेववर असलेल्या २० ते २५ गावकर्यांची तहान भागविण्यासाठी उपयोगी पडणारे होते. परंतु   ढाणकी नजीकच्या गांजेगाव पुलापर्यंत पाणी आलेले असताना पाणी साठा राहून आगामी काळातील समस्या सुटावी यासाठी येथील बंधार्याचे गेट अगोदरच लावले होते. सर्व गेट बंद असल्याने खालील गावाकडे पाणी आले नसल्याने कोठा, सिरपल्ली, शेलोडा, येथील सरपंच व शेतकरी ग्रामस्थांनी बंधार्याचे गेट काढून पाणी सोडण्यात यावे या मागणीचे निवेदन तहसीलदार गजानन शिंदे यांना दिले होते. याची दाखल घेऊन शनिवारी सायंकाळी गेट उघडण्यासाठी गेलेल्या प्रशासनाला विदर्भातील काही शेतकर्यांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करून पोलिस बंदोबस्तात बांधार्याचे दोन गेट काढून त्यातून २ टी. एम. सी. पाणी सोडण्यात आल्याने, तूर्तास तरी खालील गावातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. परंतु या पाण्याचा वापर सिंचांसाठी झाला तर पावसाला सुरु होईपर्यंत पाणी टंचाईचा सामना नदीकाठावरील गावकर्यांना करावा लागणार असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. यावेळी तहसीलदार गजानन शिंदे, पोलिस उपनिरीक्षक सुशील चव्हाण, कनिष्ठ अभियंता प्रसन्न सोळंके, मंडळ अधिकारी राठोड, पळसपूर सज्जाचे तलाठी तानाजी सुगावे, जमादार बालाजी लक्षटवार, रामराव पाटील, राजू पाटील, रामेश्वर पिटलेवाड, यांच्यासह विदर्भ, मराठवाड्यातील नागरिक शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.     

पिण्यासाठी वापर व्हावा म्हणून वीज कनेक्शन तोडले

नुकतेच इसापूर धरणातून कैनोलद्वारे पाणी सोडण्यात आले असून, या पाण्याचा वापर सिंचांसाठी नव्हे तर केवळ पिण्यासाठी झाला पाहिजे. त्यामुळे तहसीलदार यांच्या आदेशाने नदीकाठावरील मराठवाडा हद्दीतील शेतीपंपाचे विद्दुत कनेक्शन महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता सोळंके यांनी तोडून वीज पुरवठा खंडित केला. परंतु विदर्भातील काही शेतकर्यांनी विद्दुतपंप सुरु करून पाण्याचा वापर शेतीसाठी सुरु केला होता. त्यामुळे मराठवाड्यातील काही शेतकर्यांनी आमचा सुद्धा वीजपुरवठा सुरु ठेवावा असा आग्रह धरला. आणि यासाठी तर सिरपल्ली येथील एक शेतकर्याने चक्क झाडावर चढून अद्नोलन केले होते. जागरूक नागरिक व ग्रामस्थांच्या मदतीने सदर शेतकर्यास खाली उतरवून परिस्थिती लक्षात आणून दिल्याने समस्या मिटली.

अनेक गावे अद्यापही तहानलेलीच 

पैनगंगा नदी पत्रात ५ टी एम सी पाणी सोडण्यात आले होते, परंतु वाळू माफियांनी उत्खनन केल्यामुळे नदीकाठच्या दिघडी, उंचवडद पर्यंत पाणी येउन पूर्णतः आटले आहे. त्यामुळे अद्याप चातारी, दिघी, घारापुर, बोरी, हिमायतनगर, माणकेश्वर, कोप्रा, पळसपूर, सावळेश्वर, एकम्बां, कोठा, बिटरगाव, सहस्त्रकुंड, मुरली या गावांपर्यंत पाणीच पोहोचले नाही. तर कैनोल्द्वारे सोडण्यात आलेले धरणाचे पाणी बुडाली बंधार्यापर्यंत आल्याने येथे पाणी प्रश्न पेटला होता. या प्रकारामुळे बंधार्याखालील गावात पाणी पोहोचले नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता, वेळीच प्रशासनाने हस्तक्षेप केल्याने पाणी प्रश्न तूर्तास सुटला आहे. अन्यथा या संतापाचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु यावरही पैनगंगा नदीकाठच्या विदर्भ - मराठवाड्यातील काही गावात पाणी पोहोचले नसल्याने अनेक गावे अद्यापही तहानलेलीच आहेत. हि बाब लक्षात घेता इसापूर धरणातून सहस्रकुंड पर्यंत पाणी सोडण्यात यावे अशी रास्त मागणी केली जात आहे.

गांजेगाव बंधार्याची व पुलाची उंची वाढवावी

हिमायतनगर - ढाणकी मार्गावरील पैनगंगा नदिवरील डोलारी - गांजेगाव येथील बंधारा पुलाची उंची वाढविने गरजेचे आहे. हा बंधारा गेल्या 15 वर्षापूर्वी बांधण्यात आला असून, त्याची साठवन क्षमता कमी असल्यामुळे हा बंधारा लवकरच कोरडा ठक पडत आहे. त्यामुळे दिवाळीपासूनच पाणी टंचाई जाणवते. तसेच या पुलावरून ऊमरखेड, ढाणकी, गांजेगाव, हिमायतगर वाहतुक चालते. पुलाची ऊंची कमी असलयाने पावसाळयात या पुलावर पाणी वाहते. त्यामुळे पावसाळ्यात अनेकदा हा मार्ग बंद पडून वाहतुक विस्कळीत होऊन विदर्भ - मराठवाड्याचा संपक तुटतो. हि बाब लक्षात घेता शासनाने बंधार्याची व पुलाची ऊंची वाढवावी. अशी रास्त मागणी या भागातील चांदराव वानखेडे, नागोराव शिंदे, सिरपल्ली, डोल्हारी, पळसपूर येथील अनेकांनी केली आहे. 

रविवार, 8 मई 2016

सूर्याचे आग ओकु लागला

नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून ढगांची गर्दी आणि त्यांनतर उन सावलीचा खेळ. मध्येच पावसाच्या सारी आणि तळपत्या सूर्याचे आग ओकुने यामुळे गरम - सर्दीचा अनुभव सर्वांनाच येत आहे. त्याचा काळात मावळतीकडे जातानाचे टिपलेले छायाचित्र. छाया - अनिल मादसवार

पैनगंगा नदीपात्र कोरडीठाक

विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदीपात्रात नुकतेच इसापूर धरणातून ५ टी एम.सी. पाणी सोडलेले आहे. परंतु रेती तस्करीमुळे नदी पत्रात पडलेल्या खड्ड्यामुळे उंचवडद पर्यंत पाणी येउन पूर्ण मुरल्याने नदी कोरडीठाक पडलेली दिसत आहे. यामुळे परिसरातील जनावरे गावकर्यांना पाणी तंचैचा सामना करावा लागत आहे. छाया - अनिल  मादसवार 

नालीमुळे भक्तांना सहन करावा लागतो त्रास

लकडोबा मंदिरासमोरील उघड्या नालीमुळे भक्तांना सहन करावा लागतो त्रास 
हिमायतनगर(प्रतिनिधी)शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या रस्त्यावर असलेल्या भगवान लकडोबा मंदिरासमोर नालीचे बांधकाम झाले नसल्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या नागरिक भक्तांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे स्थानिक नगरपंचायतीने लक्ष देवून तत्काळ नालीचे बांधकाम करावे अशी मागणी महिला - पुरुष भक्त मंडळीतून केली जात आहे.

हिमायतनगर शहर हे देवी देवतांचे शहर म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जाते. त्यामुळे शहराला तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. तरीसुद्धा शहरातील अनेक पुरातन मंदिरांची दुरवस्था कायम आहे. असेच शहरातील परमेश्वर मंदिराकडून जाणार्या रस्त्यावर लकडोबा देवाचे मंदिर आहे. या मंदिरात अनेक कोरीव शिलालेख व अनेक देवी देवतांच्या मुर्त्या आहेत. येथील मंदिरात नेहमीचा भक्तांची दर्शनासाठी गर्दी असते. तसेच लागण सोहळे, अमावस्या, पोर्णिमा सन उत्सवात परिसरातील नागरिक भजन कीर्तन, आदी उत्सव साजरे करतात. हि बाब लक्षात घेत गत वर्षी मंजूर झालेल्या निधीतून मंदिराच्या सभागृहाचे काम सुरु असून, ते काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. परंतु मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या ठिकाणी ३ ते ४ फुट अशी भली मोठी नालि आहे. सदर नालीतून  शहरातील घाण पाणी वाहते तर अनेकदा नाली तुंबल्याने साचून राहत आहे. पावसाळ्यात तर हि नालि तुडुंब भरल्याने परिसरातील राहणाऱ्या घरामध्ये याचे पाणी घुसून अनेकांना नुकसान सहन करावे लागते. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नालीतील घाण पाण्यातून पाय बुडवून दर्शनासाठी जावे लागत आहे. परिणामी मंदिराचा परिसर दुषित होऊन पावित्र्य धोक्यात येण्याची शक्यता बळावली आहे. हि बाब लक्षात घेता नगरपंचायतीने या नालीचे बांधकाम करणे गरजेचे होते. परंतु यासाठी निधीची तरतूद नसल्याचे सांगण्यात येत असले तरी मंदिर सभागृहाचे बांधकाम पूर्णत्वास आले असताना देखील नालीच्या बांधकामाकडे कुणीच लक्ष दिले नसल्याची खंत  परिसरातील भाविक भक्त व नागरिक बोलून दाखवीत आहेत. आगामी पावसाळ्यापूर्वी सदर नालीचे बांधकाम पूर्ण करून भक्तांना दर्शनासाठी होणारी अडचण दूर करावी अशी रास्त मागणी नागरीकातून केली जात आहे. 

प्रथम प्राधान्य लाकडोबा चौकातील नाली व 
रस्त्याचे कामास देऊ - अ.अखिल 

याबाबत नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमीद यांच्याशी विचारण केली असता ते म्हणाले कि, शहरातील अनेक वस्तीतील ड्रेनेज नाल्या, रस्ते याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी निधी मंजूर होताच प्रथम प्राधान्य लाकडोबा चौकातील नाली व रस्त्याचे कामास देऊन १६ - १७ च्या बजेटमधून पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी दिले.

४२ वर्षीय नराधमास ११ मे पर्यंत पोलिस कोठडी

निरागस बालीकेसोबत वासनेचा खेळ करणाऱ्या 
४२ वर्षीय माणसाला ११ मे पर्यंत पोलिस कोठडी 
नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)सतत आठ वर्षापासून एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून दोनदा तिचा गर्भपात घडवून आणणाऱ्या एका ४२ वर्षीय माणसाला येथील जिल्हा न्यायाधीश जी.ओ.अग्रवाल यांनी ११ मे पर्यंत पोलिस कोठडीत पाठवले आहे. 

मौजे लहान ता.अर्धापूर येथील संजय नामदेव इंगळे (४२) हा सध्या नांदेडच्या भावसार चौक भागातील राजहंस या इमारतीत राहतो.त्याने लहान येथील एका अल्पवयीन बालीकेसोबत लग्न करणार असे सांगून शारीरिक संबंध बनवले.तिला अर्धापूर येथे किरायाची खोली घेवून दिली.सन २००८ पासून सुरु असलेला हा वासनेचा खेळ ५ मे २०१६ पर्यंत सुरु होता.तिच्यावर अर्धापुर व भाग्यनगर,भावसार चौक,नांदेड येथे अनेकदा या संजय इंगळेने अत्याचार केला.या संबंधामुळे ती बालिका गर्भवती झाली.तिला दिड ते दोन महिन्यांचा गर्भ असतांना इंगळेने डॉक्टरांमार्फत गर्भपात केला.बालिकेच्या या अत्याचार हकीकतीनुसार अर्धापूर पोलिसांनी संजय नामदेव इंगळे विरुद्ध  भादवीच्या कलम ३७६,५०४,५०६ आणि लैंगिक अपराधा पासुन बालकांचे संरक्षण अधिनियम कलम ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचे तपासिक अंमलदार पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी संजय इंगळेला ७ मे रोजी अटक केली.आज रविवारी त्यास न्यायालयात हजर करून तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी केली.न्या.अग्रवाल यांनी ११ मे पर्यंत या संजय इंगळेला पोलिस कोठडीत पाठवले आहे. 
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रावणकौठा जंगलात झाली साडे सहा लाखांची लुट


नांदेड(प्रतिनिधी)७ मे रोजी मध्यरात्री एका टेम्पोला रोखून चार जणांनी त्यातील ६ लाख ५० हजार रुपयांची लुट केली आहे. 

यशपाल सुधाकरराव जबडे (२५) हे दिनांक ७ मे रोजी रात्री १.३० ते २ दरम्यान आपला टेम्पो क्रमांक एमएच २६ एडी १६२१ मध्ये समान विक्री  केलेले ६ लाख ५० हजार रुपये ठेवून जात असतांना मौ.रावणकोळा ते प्रकाशनगर चे दरम्यान जंगलातील वळण रस्त्यावर अज्ञात चार इसमांनी नंबर नसलेली स्कार्पीओ गाडीने रस्ता आडवून,काठीने मारहाण करुन,चाकुचा धाक दाखवून,टेम्पोत ठेवलेले रोख  ६ लाख ५० हजार रुपये बळजबरी चोरून नेले आहेत.या प्रकरणी मुक्रमाबाद पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे.तपास सहायक पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे हे करीत आहेत. 
 -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२० तोळे सोन्याची किंमत भाग्यनगर पोलिसांनी दाखवली २ लाख २० हजार.. 
आजच्या भावाप्रमाणे किंमत आहे ६ लाख


नांदेड(प्रतिनिधी)ऑटो रिक्षात प्रवास करतांना तीन अनोळखी महिलांनी एका ६५ वर्षीय महिलेच्या ब्याग मधून २ लाख २७ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरल्याचा प्रकार ७ मे रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास रस्त्यावर घडला आहे.

चंद्रकला पंढरीनाथ येरावार (६५) रा.जुना सराफा देगलूर या महिला शिवाजीनगर ते श्रीनगर असा ऑटो प्रवास करीत असतांना तीन अनोळखी महिलांनी हाथ दाखवून ऑटो थांबवला आणि त्यात बसल्या. त्या ती मधील एका महिलेने येरावार यांच्या कडून पाणी घेवून आपल्या मुलास पाजले तेव्हाच संधी साधून त्यांच्या ब्याग मधील २० तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख ७ हजार ६०० रुपये असा एकूण २ लाख २७ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.भाग्यनगर पोलिसांनी अज्ञात तीन महिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील हे करीत आहेत. भाग्यनगर पोलिसांनी २० तोळे सोन्याची किंमत ११ हजार रुपये प्रती तोळा अशी दाखवली आहे.खरेतर आजच्या बाजार भावाने या २० तोळे सोन्याची किंमत जवळपास ६ लाख रुपये अशी होते. 

परशुराम जयंती

अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या वतीने नांदेड शहरात भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून, त्या निमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी निखिल लातूरकर, विजय जोशी, यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती. छाया - करणसिंह बैस 

कोस्केवार पुरस्कार

श्री कोस्केवार पुरस्काराने गोविंद कदम टेंभीकर सन्मानित 
हिमायतनगर(प्रतिनिधी)ग्रामिता तत्वज्ञान प्रचार आणि प्रसाराचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हिमायतनगर तालुक्यातील मौजे टेंभी येथील गोविंद कदम या युवकाचा श्री कोस्केवार पुरस्काराने नुकताच सन्मान करण्यात आला आहे.

प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी ग्रामगीता तत्वज्ञान प्रसारक मंडळ कोल्हारी (ई) तर्फे दि.२१ ते ३० एप्रिल दरम्यान इस्लापूर, हिमायतनगर परिसरातील वेगवेगळ्या गावात संत तुकडोजी महाराजांचे विचार भजन, कीर्तन, प्रबोधनाच्या माध्यमातून पोचविण्यात आले. तसेच त्या त्या गावात स्वच्छता अभियान राबवून दि.३० रोजी संत तुकडोजी महाराजांचा जन्मदिन तथा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. दरम्यानच्या काळात ग्रामगीतेचा प्रचार प्रसार करून जनसामान्यांच्या मनात उत्साहाचे वातावरण निर्माण करून, समजतील अनिष्ठ रूढी परंपरा पासून परावृत्त केल्या गेले. या कार्यात हिमायतनगर तालुक्यातील टेंभी येथील जयगुरु गोविंद ग्यानबाराव कदम या युवकाने अधिक परिश्रम घेतले. त्यांच्या या कार्याची दाखल घेत संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा श्री कोस्केवार पुरस्कार संस्थेचे प्रमुख गोपाळराव महाराज मुळझरेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठलराव फुलके यांच्या हिमायतनगर येथील संत तुकडोजी महाराज मंदिरात प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी सूर्यवंशी हे होते तर महेंद्र टेंभीकर, विठ्ठलराव कोस्केवार, विठ्ठलराव बुरकुले, एल.पी.कोस्केवार, परमेश्वर अक्कलवाड, परमेश्वर इंगळे, यांची समयोचित भाषणे झाली. याप्रसंगी सौ. द्रोपदाबाई वानखेडे, सौ. अंजनाबाई दगेवाड, सौ.कमलबाई चव्हाण,  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल महारज यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री माने यांनी मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.