दोन महिला गजाआड

६ हजार आणि फक्त १२० रुपयांची लाच
स्वीकारणाऱ्या दोन महिला गजाआड 


हिमायतनगर(अनिल मादसवार)उमरी तालुक्यातील एक ग्रामसेविका आणि हिमायतनगर येथील तहसील कार्यालयाच्या अभिलेख विभागातील एक महिला लिपिक अश्या दोन महिला सरकारी कर्मचार्यांना लाच घेतल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकार्यांनी गजाआड केले आहे. या घटनेमुळे संबंधित विभागात एकच खळबळ उडाली असून, शासनाने लाचखोर अधिकारी, कर्मचार्यांच्या विरोधी कार्यवाहीला अधिक प्रभावीपणे राबवून महसूल, पंचायत समिती, बांधकाम भूमिअभिलेख, दुय्यम निबंधक(रजिस्ट्री)   विभागातील अन्य बड्या माश्यांना जेरबंद करावे अशी मागणी जोर धरत आहे.

पहिल्या घटनेत हिमायतनगर तहसील कार्यालयातील आंदेगाव (पश्चिम) येथील एका शेतकर्यास  फेरफार नक्कल देण्यासाठी महिला लिपिक सुनिता दत्तात्रय गोपेवाड यांनी दोनशे रुपयाची मागणी केली होती. याबाबतची रीतशीर तक्रार आल्यानंतर नांदेडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शहानिशा केली. दरम्यान तक्रारकर्त्या व्यक्तीकडून तडजोडीनंतर १२० रुपयांची लाच सुनिता दत्तात्रय गोपेवाड यांनी स्वीकारली. आणि लगेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना जेरबंद केले. याप्रकरणी सुनिता दत्तात्रय गोपेवाड विरुद्ध हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पंचायत समिती कार्यालय उमरी येथील ग्रामसेविका सुजाता किशनराव शिंदे (२८) या आपणास आपल्या विहिरीचे झालेले काम आणि त्यासाठी शासनाकडून मिळणारा ४२ हजार रुपयांचा धनादेश देण्यासाठी ६ हजार रुपयांची लाच मागत असल्यची तक्रार नांदेडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागात आली. आजच त्या शहानिशा झाली आणि आज दुपारी उमरी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सहा हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या ग्रामसेविका सुजाता शिंदे यांना जेरबंद करण्यात आले.

त्यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कारवाईत पोलीस अधीक्षक डॉ.श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलीस अधीक्षक एस.आर.चव्हाण, उपअधीक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने, पोलीस कर्मचारी अर्जुनसिंह ठाकूर, मारोती केसगीर, सुरेश पांचाळ, महिला पोलीस अनिता भालेराव आणि चालक अनिल कदम यांनी ही सापळा कारवाई पार पाडली. सादर कारवाईत पोलीस अधीक्षक डॉ.श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलीस अधीक्षक एस.आर.चव्हाण, उपअधीक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बळवंत पेडगावकर, पोलिस कर्मचारी बाबू गाजुलवाड, विनोद साखरकर, इलतगावे, महिला पोलिस सुनिता मैलवाड आणि चालक शेख अन्वर यांनी हि कार्यवाही पार पाडली.

याबाबत महिला कर्मचारी सुनिता गोपेवाड यांच्याशी संपर्क केला असता त्या म्हणाल्या कि, मी केवळ शासनाच्या फिसची रक्कम मागितली. त्याची पावती सुद्धा फाडली आहे, येथे अनेकजण मोठ्या प्रमाणात देवाण - घेवाण करतात. त्यांना अधिकारी - पुढार्यासह सर्वच जन पाठबळ देतात, मात्र माझ्या सारख्या गरीब कर्मचार्यास जाणीवपूर्वक यात गोवण्यात आल्याचे सांगून अश्रूं वात मोकळी करून दिली. .

तर जिल्ह्यातील उमरी येथील पंचायत समिती कार्यालयाची ग्रामसेविका सुजाता किशनराव शिंदे (२८) या आपणास आपल्या विहिरीचे झालेले काम आणि त्यासाठी शासनाकडून मिळणारा ४२ हजार रुपयांचा धनादेश देण्यासाठी ६ हजार रुपयांची लाच मागत असल्यची तक्रार नांदेडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागात आली. आजच त्या शहानिशा झाली आणि आज दुपारी उमरी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सहा हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या ग्रामसेविका सुजाता शिंदे यांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कारवाईत पोलीस अधीक्षक डॉ.श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलीस अधीक्षक एस.आर.चव्हाण, उपअधीक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने, पोलीस कर्मचारी अर्जुनसिंह ठाकूर, मारोती केसगीर, सुरेश पांचाळ, महिला पोलीस अनिता भालेराव आणि चालक अनिल कदम यांनी ही सापळा कारवाई पार पाडली. 

माहिती सोबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी आणि कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी.तसेच लाच मागणीचे मोबाईल फोनवर केलेली रेकार्डिंग,एसएमएस,व्हिडीयो क्लिप असल्यास ती माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला द्यावी.जनतेच्या सवलती साठी विभागाने टोल फ्री क्रमांक १०६४ सुरु ठेवला आहे.तसेच कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२४६२ २५३५१२ जनतेसाठी नेहमीच सुरु आहे. तसेच पोलिस उप अधीक्षक संजय कुलकर्णी यांचा मोबईल क्रमांक ८५५४८५२९९९ यावर सुद्धा जनता आपली तक्रार सांगू शकेल. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वेब साइडवर सुद्धा तक्रार करता येते. जनतेने लाच मागणाऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बाबत आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी