एकलव्यस्टडीच्या विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश
हिमायतनगर(वार्ताहर)एकलव्य स्टडी सर्कलच्या चिमुकल्या विद्यार्थी - विद्यार्थ्यांनी हातही झाडू घेवून शहरातील बस स्थानक परिसरात सफाई करून स्वच्छतेचा संदेश दिला आहे. त्यांचा हा उपक्रम प्रशासकीय अधिकारी व ग्रामपंचायतीला लाजवेल असा यशस्वी झाल्याने त्याचं सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वच्छतेचा संदेश लक्षात घेत शासकीय - निमशासकीय कार्यालयात मोठा गाजावाजा करत अमलात आणत स्वच्छ सुंदर व निरोगी शहर बनविण्याचे प्रयत्न केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिर कॉम्प्लेक्स येथील एकलव्य स्टडी सर्कल क्लासेसचे संचालक एन.टी.सर कामारीकर यांनी शिक्षनाबरोबर विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविने यासह स्वच्छतेचे धडे दिले जात आहे. त्यांच्या मार्गदर्शनाला प्रतिसाद देत दि.०८ रविवारी सकाळी ७ वाजल्य्पासून परमेश्वर मंदिर परिसरात हाती झाडी घेऊन आम्ही सुद्धा स्वच्छतेत मागे नाही हे दाखवून देत परिसरातील केर - कचरा साफ करीत स्वच्छतेची चळवळ गतिमान करण्याचा संदेश दिला आहे.
चिमुकल्यांनी केलेल्या या स्वच्छतेच्या कार्याने बसस्थानक परिसर चकाचक झाला असून, अशीच स्वच्छता नेहमी परिसरात रहावी यासाठी स्थानिक ग्रामपंचायत व मंदिर समितीने लक्ष द्यावे अशी रास्त अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. तसेच चिमुकल्यांनी शहाण्या सुरत्या नागरिकांना परिसर स्वच्छ - सुंदर करून शहरवासियांना दिलेल्या संदेशाचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.