दोन रेतीचे ट्रेक्टर जप्त

तलाठी रातोळीकरांच्या धडक कार्यवाहीत दोन रेतीचे ट्रेक्टर जप्त 


हिमायतनगर(वार्ताहर)मौजे एकंबा कोठा पैनगंगा पत्रातून लाखोची रेती चोरी होत असल्याचे नांदेड न्युज लाइव्हने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दाखल घेवून तहसीलदार यांच्या सूचनेवरून तलाठी रातोळीकर यांनी दि.०६ मार्च रोजी सकाळीच धडक कार्यवाही केली. यात विदर्भातील दोन ट्रेक्टर चोरट्या मार्गाने रेती वाहतूक करताना ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात जमा केल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.

विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीतील अल्प पाणी असलेल्या कोरड्या नदी पत्राचा फायदा घेत रेती तस्करांनी प्रशासनाला लाखोचा गंडा घालत रेतीचा अवैद्य रित्या उपसा सुरु केला आहे. परिणामी पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि शासनाचा लाखोचा बुडत असलेला महसुल असे दुहेरी नुकसान या रेती तस्कराकडून होत असल्याचे वृत्त लिलाव न झालेल्या पेंडावरून सर्रास रेतीचा उपसा सुरु...या मथळ्याखाली नांदेड न्युज लाईव्हने दि.०५ मार्च रोजी प्रसारित केले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत तहसील प्रशासन खडबडून जागे झाले. आणि काल रात्रीपासून रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी रेती घाटावर पाळत ठेवली. त्यावरून दि.०६ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान विदर्भातील बोरी आणि चातारी येथील दोन रेती तस्करीचे ट्रेक्टर पकडून कार्यवाही करत तहसील कार्यालात जमा केले. यात ट्रेक्टर क्रमांक एम.एच.२९ -ए के २५५ चा मालक बालाजी उत्तम माने, चालक अनंता माने रा.चाथारी ता.उमरखेड आणि ट्रेक्टर क्रमांक एम.एच.२९ - व्ही १४ राजू दत्त माने, चालक संदीप माने रा.बोरी, ता.उमरखेड हे चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक करताना आढळून आल्याने तलाठी रातोळीकर यांनी कार्यवाही करून तसा पंचनामा केला आहे.

प्रत्येकी १२ हजारचा दंड लावला 
-----------------------------
आज दोन वाहने रेतीची वाहतूक करताना पकडण्यात आली असून, पकडलेल्या वाहनधारकांना प्रत्येकी १२ हजार ४०० असे एकूण २४ हजार ८०० रुपयाचा दंड लावण्यात आला आहे. वाहन मालकांनी दंड न भरल्यास संबंधितावर पोलिसात कार्यवाही करण्यात येईल. तसेच एकम्बां भागातील कार्यवाहीला जाण्यापूर्वीच त्यांना माहिती मिळत असल्याने कार्यवाही करणे अवघड बनल्याचे तलाठी रातोळीकर यांच्याशी संपर्क केला त्यांनी सांगितले.  

कोठा - एकम्बा परिसरातील वाळू तस्कर मोकाटच
----------------------------------
हिमायतनगर तालुक्यातील कोठा - एकम्बा घाटावरून होत असलेल्या रेती चोरीबाबत माहिती घेतली असता तहसील प्रशासन कार्यवाहीसाठी जात असलेली गुप्त माहिती वाळू दादांना मिळत असल्याने या भागातील तस्कर चोरी करण्यात यशस्वी होत आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने या ठिकाणाहून होत असलेल्या रेती चोरीबाबत ठोस पाऊले उचलावेत अशी रास्त अपेक्षा पर्यावरण प्रेमी नागरिक करीत आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी