बिरसामुंडा अव्वल



हिमायतनगर(अनिल मादसवार)वाढोण्याचे जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्र्वर मंदिर यात्रा महोत्सवात आयोजित कब्बडी स्पर्धेच्या दरम्यान आवकाळी पाउस झाल्याने हि स्पर्धा लांबणीवर पडली होती. ती स्पर्धा दि.०८ रविवारी संपन्न झाली असून, या स्पर्धेत हिमायतनगर आदिवासी वस्तीग्रहातील युवकांच्या बिरसा मुंडा संघाने विजय प्राप्त करून आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी ठेवलेल्या ११ हजार १११ रुपयाचे बक्षिसाचे मानकरी ठरले आहे.

भारतीय खेळात प्रामुख्याने महत्व असलेल्या कब्बडी स्पर्धा महाशिवरात्र यात्रेत दि.२७ फेब्रुवारी रोजी दुपारी सुरु करण्यात आली होती. परंतु अचानक स्पर्धा सुरु असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने खेळ बंद करण्यात आले. त्यानंतर दि.०८ मार्च रविवारी रखडलेली कब्बडी स्पर्धा ठेवण्यात आली होती. ११ वाजता मंदिर समितीचे उपाध्यक्ष महाविर्चंद श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येउन सुरु झाली होती. तळपत्या उन्हात दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत हदगांव, हिमायतनगर,किनवट , माहुर, हदगाव, उमरखेड, आदीसह अनेक तालुक्यातील एकुन २४ क्रीडा संघानी सहभाग नोंदवीला होता. सायंकाळी ६ वाजेला संपन्न झालेल्या अंतिम सामन्यात बिरसा मुंडा क्रीडा संघ हिमायतनगर व रामेश्वर तांडा क्रीडा संघ यां दोघांच्या तुल्यबळ लढतीत झाला. या स्पर्धेत हिमायतनगर येथील बिरसा मुंडा क्रीडा संघ आदिवासी मुलांचे वास्त्रीगृह यांनी रामेश्वर तांडा संघास धूळ चारवीत प्रथम क्रमांकाची बाजी मारली. या विजयी संघास 11111/- रुपयाचे बक्षीस महाविरचंद श्रीश्रीमाळ व राजेश्वर चिंतावार यांच्या हस्ते देण्यात आले. दुसर्‍या क्रमांकाचे पारीतोषीक रामेश्वर तांडा संघास रुपये 7001/- रुपयाचे बक्षीस देण्यात आले. तिसरा क्रमांकाचे पारितोषीक रुपये 4001/- दिपजल क्रीडा संघ सिंदगी यांना देण्यात आले. यावेळी कब्बडीचे पंच म्हणुन क्रीडा समीतीचे अध्यक्ष ऍड दिलीप राठोड, सचिव के.बी.शन्नेवाड, सोनबा पवार, बाबुराव बोड्डेवार, बी.आर.पवार, पावडे सर, ताड्कुले सर, विठ्ठल पार्डीकर, चव्हाण सर, सोमवंशी सर, परशुराम राठोड, यांनी काम पहिले. गुनलेखक म्हणून वाय.एन.गवंडी, एम.जी.बॉरेवाड, प्रभाकर हातमोडे आदींनी काम पहिले. यावेळी मंदिराचे संचालक विठ्ठलराव वानखेडे, अनंता देवकते, माधव पाळजकर, पापा पार्डीकर, प्रकाश साबळकर, सुभाष पाटील, प्रकाश जैन, अनिल मादसवार, वसंत राठोड, धम्मा मुनेश्वर, आदीसह क्रीडा प्रेमी नागरीक व खेळाडु हजारोच्या संख्येने उपस्थीत होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी